फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 18 ऑगस्ट. आज चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. आज श्रावणातील शेवटचा सोमवार देखील आहे. आजचा दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र असेल. चंद्र मिथुन राशीत गुरु आणि शुक्र यांच्यासोबत त्रिग्रह योग तयार करणार आहे. त्यासोबतच मृगशिरा नक्षत्राच्या संयोगाने हर्षण आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहे. तर चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी योगही तयार होईल. त्रिग्रह योग आणि महादेवाच्या आशीर्वादाने कन्या राशीसह या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. यावेळी तु्म्हाला प्रलंबित कामांना गती मिळेल. तसेच कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित यश आणि सहकार्य मिळू शकते. तुम्हाला व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास करणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील. पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. माध्यमे, संवाद, प्रकाशन इत्यादी क्षेत्राशी संबंधित लोकांना आज फायदा होऊ शकतो. कुटुंबातील लहान भावंडांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबतचे तुमचे नाते दृढ राहील.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला राहील. परदेशाशी संबंधित कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला आयात-निर्यात कामात अपेक्षित यश मिळेल. करिअरसाठी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असलेल्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढले. तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल. लोक तुमचे ऐकतील आणि तुमचे म्हणणे समजून घेतील. राजकारण आणि समाजसेवेत असलेल्यांना आदर मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप खास राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. तुमची प्रलंबित कामे अनपेक्षितपणे पूर्ण होतील. जर तुमचे बाजाराच पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. तुमच्या सुखसोयी वाढतील. व्यवसायानिमित्त तुम्ही लांबचा प्रवास करु शकता. तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले मतभेद दूर होतील.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. कंटेंट रायटिंग, जाहिरात, मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. कामांच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त चांगली नोकरी मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)