फोटो सौजन्य- istock
ऑगस्ट महिन्याचा तिसऱ्या आठवड्यामध्ये (18 ते 24 ऑगस्ट) शुक्र, बुध आणि चंद्राची युती कर्क राशीमध्ये होत असल्याने त्रिग्रही योग तयार होईल. या शुभ युतीमुळे हा संपूर्ण आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी व्यवसायामध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे या लोकांना आर्थिक बाबतीतही फायदा होऊ शकतो. कर्क, सिंह, मकर या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर राहणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्याची प्रशंसा होईल. जीवनामध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. संपूर्ण आठवड्यामध्ये कुटुंबातील वातावरण चांगले राहील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यामध्ये तुमची प्रगती होऊ शकते. तसेच तुमचा समाजामध्ये आदर वाढेल. आर्थिक बाबतीत तुमचा हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत तुमची हळूहळू प्रगती होईल. व्यवसायामध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मात्र तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला कुटुंबात अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते.
मिथुन राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला जाईल. आर्थिक गोष्टींसाठी हा आठवडा सामान्य राहील. आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे. भविष्यात समस्या उद्भवू शकतात. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता. कुटुंबातील एखाद्याच्या बोलण्यामुळे तुम्हाला दुःख वाटू शकते. एखाद्या गोष्टींवरुन तुमच्यावरील ताण वाढू शकतो.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा राहील. तुम्ही दीर्घकाळापासून घेतलेल्या मेहनेतीमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यात तुमचा मानसिक ताण कमी होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत तुमचे नाते चांगले राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. व्यवसायासाठी हा आठवडा शुभ राहील. तुम्हाला क्षेत्रात प्रगती मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही थोडी जोखीम घेऊ शकता. या आठवड्यात तुमचे प्रवास पुढे ढकलणे तुमच्यासाठी चांगले राहील, अन्यथा तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी बॉसकडून काहीतरी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी शांतता आणि संयमाने काम केल्याने निश्चितच फायदा होईल. व्यवसायानिमित्त तुम्ही प्रवास करु शकता.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. एखाद्या नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये जे लोक कार्यरत आहे ते व्यस्त राहू शकतात. या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या जीवनामध्ये समृद्धी वाढू शकते. जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक मजबूत राहू शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांचा हा आठवडा सामान्य राहील. कठोर मेहनत घेतल्याने तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करणे टाळावा अन्यथा समस्या उद्भवू शकता. व्यवसायानिमित्त तुम्ही प्रवास करु शकता. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद निर्माण होईल.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही थोडे दुःखी असू शकता. या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. या आठवड्यात प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कुटुंबात एक नवीन सुरुवात होऊ शकते, ज्यामुळे शांती मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. समाजामध्ये तुमचा आदर वाढेल. तुमच्या प्रकल्पावर जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके जास्त यश तुम्हाला मिळेल. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. कामासाठी प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तुमचे जोडीदारासोबतचे नाते अधिक चांगले राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो. कुटुंबामध्ये थोडे काळजीचे वातावरण राहील. व्यवसायानिमित्त प्रवास करणे फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचा अधिक फायदा होईल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुमचा आदरही वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. कामाच्या ठिकाणी अनेक संधी उपलब्ध होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)