देशात गेल्या काही वर्षांपासून हिंदू-मुस्लिम वाद उफाळला आहे. अनेकदा यावरून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. पुढील काही दशकात भारतातही मुस्लिमांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे. अशा चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. २५ वर्षांनंतर, जगभरातील हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येत मोठा फरक दिसून येईल. सध्या, ख्रिश्चन लोकांव्यतिरिक्त, मुस्लिमांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे आणि हिंदू चौथ्या क्रमांकावर आहेत.
प्यू रिसर्चच्या अहवालानुसार, २०५० पर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या २ अब्ज ७६ कोटींपेक्षा जास्त होईल, तर हिंदूंची लोकसंख्या १ अब्ज ४० कोटींच्या जवळपास असेल. प्यू रिसर्चच्या अहवालानुसार, हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येत सुमारे १.५ अब्जचा फरक असेल, म्हणजेच मुस्लिमांची लोकसंख्या संपूर्ण जगात हिंदूंपेक्षा १.५ अब्ज जास्त असेल. अहवालात २०१० आणि २०५० मध्ये दोन्ही धर्मांच्या लोकसंख्येचे आकडे देण्यात आले आहेत आणि ४० वर्षांत दोन्ही धर्मांची लोकसंख्या किती टक्के वाढेल हे सांगण्यात आले आहे.
Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका
अहवालात दोन्ही धर्मांच्या प्रजनन दराच्या आधारे लोकसंख्येचे आकडे सादर करण्यात आले आहेत. अहवालानुसार, २०१० मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १.५९ अब्ज ९७ लाख होती, जी २०५० पर्यंत म्हणजेच पुढील २५ वर्षांत २.७६ अब्ज १४ लाख ८० हजारांपर्यंत वाढेल. अहवालात म्हटले आहे की २०५० मध्ये संपूर्ण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २९.७ टक्के मुस्लिम असतील, जे २०१० मध्ये २३.२ टक्के होते.
अहवालानुसार २०१० मध्ये संपूर्ण जगात १.३ अब्ज २२ लाख १० हजार हिंदू राहत होते, जे २०५० पर्यंत १.३८ अब्ज ४३ लाख ६० हजारांपर्यंत वाढेल. यानुसार, २०५० मध्ये हिंदूंची लोकसंख्या संपूर्ण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १४.९ टक्के असेल, जी २०१० मध्ये १६.४ टक्के होती. या आकडेवारीवरून असे दिसून येते की हिंदूंची लोकसंख्येतील वाढ ही मुस्लिमांपेक्षा कमी असेल.
सेमीकंडक्टर कंपन्यांमध्ये कसे कराल करिअर? वेळेच्या घ्या फायदा; घडवा भविष्य
२०११ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या सुमारे १२१ कोटी इतकी होती. त्यातील ७९.८% जनता हिंदू, तर १४.२% जनता मुस्लिम होती. यानुसार, भारतात हिंदूंची संख्या सुमारे ९६ कोटी, तर मुस्लिमांची संख्या १७ कोटींच्या आसपास होती.प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, २०१० मध्ये जगातील एकूण हिंदूंपैकी ९४% हिंदू भारतात वास्तव्यास होते. तसेच, भविष्यातही भारत हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र राहील.
२०५० पर्यंत, प्यू रिसर्चच्या अंदाजानुसार, भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे ३१ कोटी १० लाख होईल, जी त्या वेळच्या जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या सुमारे ११% असेल. हिंदूंची लोकसंख्या याच काळात सुमारे १ अब्ज ३० कोटी (१.३ अब्ज) इतकी होण्याची शक्यता आहे.
प्यू रिसर्चच्या जागतिक अहवालानुसार, सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे.
२०१० मध्ये जगात सुमारे २ अब्ज १६ कोटी ८३ लाख ख्रिश्चन होते.
२०५० पर्यंत, ही संख्या वाढून २ अब्ज ९१ कोटी ८० लाखांपर्यंत पोहोचेल, म्हणजेच ४० वर्षांत सुमारे ७५ कोटी लोकांची वाढ होईल.
यावेळी ख्रिश्चन धर्मीयांची संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ३१.४% इतकी असेल.