Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Temple Protocol: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचा मोठा निर्णय: ४८ तीर्थक्षेत्रांमध्ये गैर-हिंदूंना प्रवेश बंदीची तयारी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या प्रस्तावावर एक निवेदन जारी केले आहे. " देवभूमी उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्रे चालवणाऱ्या संस्था आणि संघटनांच्या मतांवर आधारित सरकार आवश्यक ती कारवाई करेल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2026 | 03:30 PM
Badrinath-Kedarnath Temple Committee (BKTC), Non-Hindu Entry Ban,

Badrinath-Kedarnath Temple Committee (BKTC), Non-Hindu Entry Ban,

Follow Us
Close
Follow Us:
  • चार धाम आणि संबंधित प्रमुख तीर्थस्थळांमध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेश बंदी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल
  • दोन तीर्थक्षेत्रांबरोबरच देशातील ४८ मंदिरे आणि तीर्थक्षेत्र पर्यंटन स्थळांवर गैर हिंदुंना प्रवेशास बंदी
  • उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांनी या निर्णयाचा जोरदार निषेध
 

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) चार धाम आणि संबंधित प्रमुख तीर्थस्थळांमध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेश बंदी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. यापूर्वी देशातील बद्रीनाथ आणि केंदारनाथ या मंदिरांमध्ये गैरहिंदुना प्रवेशबंदी होती. पण आता या दोन तीर्थक्षेत्रांबरोबरच देशातील ४८ मंदिरे आणि तीर्थक्षेत्र पर्यंटन स्थळांवर गैर हिंदुंना प्रवेशास बंदी घालण्यात येणार आहे, या संदर्भात बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदीर समितीच्या वतीने मोठी पाऊले उचलण्यास सुरूवात झाली आहे. या संदर्भात समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी माहिती दिली आहे.

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली

हेमंत द्विवेदी म्हणाले की, “आता केवळ बद्रीनाथ आणि केदारनाथ सारखी तीर्थक्षेत्रे पर्यटन स्थळांसोबतच देशभरातली अनेक मंदिरे, तीर्थस्थाने सनातन धर्माची सर्वोच्च आध्यात्मिक केंद्रे आहेत, जिथे प्रवेश हा नागरी हक्कापेक्षा धार्मिक परंपरा म्हणून पाहिला पाहिजे. सर्व प्रमुख धार्मिक गुरु आणि संताकडून गैर-हिंदूंनी या पवित्र तीर्थस्थळांमध्ये प्रवेश करू नये, अशी मागणी केली जात आहे. सनातन परंपरांचा आदर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. चार धाम ही श्रद्धा आणि आध्यात्मिक साधना केंद्रे आहेत, सामान्य पर्यटन स्थळे नाहीत.”

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या प्रस्तावावर एक निवेदन जारी केले आहे. ” देवभूमी उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्रे चालवणाऱ्या संस्था आणि संघटनांच्या मतांवर आधारित सरकार आवश्यक ती कारवाई करेल. राज्य सरकार या मुद्द्यावर मंदिर समित्यांच्या निर्णयांना प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक असेल,” असं धामी सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Republic Day Parade Live Streaming: प्रजासत्ताक दिनाची परेड घरबसल्या पाहा; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) आपल्या अखत्यारीतील ४८ मंदिरे, तलाव आणि धार्मिक स्थळांवर बिगर-हिंदूंना प्रवेश बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावामुळे उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले असून काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. BKTC च्या या प्रस्तावात केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम, तुंगनाथ, मदमहेश्वर, त्रियुगीनारायण, जोशीमठ येथील नरसिंह मंदिर, गुप्तकाशीतील विश्वनाथ मंदिर, तप्त कुंड, ब्रह्मकपाल आणि शंकराचार्य समाधी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ४८ देवस्थानांचा समावेश आहे.

हरीश रावत यांची भूमिका:

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांनी या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, “जगभरात लोक आपली संस्कृती आणि धर्म इतरांना दाखवण्यासाठी आमंत्रित करतात, मात्र येथे उलट वातावरण तयार केले जात आहे. शातील अनेक मंदिरे आणि कावड यात्रांचे व्यवस्थापन व बांधकाम बिगर-हिंदू बांधवांनीही केले आहे.अशा प्रकारचे निर्बंध लादून भाजप कोणत्या विचारसरणीकडे नेऊ पाहत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सरकारने असे निर्बंध लादण्याऐवजी आपली संस्कृती सर्वांसाठी खुली ठेवायला हवी, असे मत रावत यांनी व्यक्त केले आहे.

 

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती अंतर्गत मंदिरे/तलाव/समाधींची यादी:

१. केदारनाथ धाम २. बद्रीनाथ धाम ३. तुंगनाथ येथील श्री तुंगनाथ मंदिर ४. बद्रीनाथ येथील माता मूर्ती मंदिर ५. बद्रीनाथ येथील ब्रह्म कपाल शिला आणि परिक्रमा संकुल ६. सुभेन येथील भविष्य बद्री मंदिर ७. बद्रीनाथ येथे ताप कुंड (तलाव आणि गरम पाण्याचे झरे) ८. जोशीमठ येथील नरसिंह मंदिर ९. उरगाम येथील ध्यान बद्री मंदिर १०. मध्यमहेश्वर येथील श्री मध्यमहेश्वर मंदिर

११. गुप्तकाशी येथील श्री विश्वनाथजी मंदिर १२. पांडुकेश्वर येथील योग बद्री मंदिर १३. गौरीकुंड येथील श्री गौरी मैया मंदिर १४. बद्रीनाथ येथील श्री आदि केदारेश्वर मंदिर १५. ज्योतिरेश्वर येथील महादेव मंदिर १६. अनिमठ येथील वृद्ध बद्री मंदिर १७. बद्रीनाथ पुरीतील पंच शिला १८. बद्रीनाथ पुरीतील पंचधारा १९. केदारनाथ मंदिर संकुलातील छोटी मंदिरे २०. गुप्तकाशी येथील श्री विश्वनाथ मंदिर परिसरातील लहान मंदिरे

२१. ओंकारेश्वर मंदिर २२. त्रियुगीनारायण येथील श्री त्रियुगीनारायण मंदिर २३. कालीशिला येथील श्री कालीशिला मंदिर २४. वसुंधरा २५. वसुंधरा धबधब्याच्या खाली धर्मशिला २६. केदारनाथमधील उदक कुंड २७. उखीमठ येथील श्री उषा देवी मंदिर २८. उखीमठ येथील श्री बाराही देवी मंदिर २८. बद्रीनाथ येथील श्री वल्लभाचार्य मंदिर ३०. विष्णुप्रयाग येथील नारायण मंदिर

३१. सीता देवी मंदिर ३२. पाखी येथील श्री नरसिंग मंदिर ३३. दरमी येथील श्री नरसिंग मंदिर ३४. नंदप्रयाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३५. कुलसारी येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३६. द्वारहाट (अलमोडा) येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३७. गुडरी (अलमोडा) येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ३८. कालीमठ येथील श्री महाकाली मंदिर ३९. कालीमठ येथील श्री महालक्ष्मी मंदिर ४०. कालीमठ येथील श्री महासरस्वती मंदिर

४१. जोशीमठ येथील श्री दुर्गा मंदिर ४२. ज्योतिरेश्वर येथील भक्तवत्सल मंदिर ४३. केदारनाथ येथील माता पार्वती मंदिर ४४. केदारनाथ येथील ईशानेश्वर मंदिर ४५. केदारनाथ जी मंदिरातील गणेश मंदिर ४६. केदारनाथमधील हंसा कुंड ४७. केदारनाथमधील रेतास कुंड ४८. केदारनाथमधील शंकराचार्य समाधी / श्री भैरवनाथ मंदिर

 

 

 

 

 

 

Web Title: Bktcs major decision proposal to ban entry of non hindus in 48 pilgrimage sites including char dham

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Badrinath Dham
  • hindu-muslim politics
  • Kedarnath Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.