Sanjay Raut News: 'पंतप्रधानपद सोडण्याची वेळ...; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर 2025 रोजी मिझोराम दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच दौऱ्यात मिझोराममध्ये नवीन बैराबी-सैरंग रेल्वेचे उद्घाटन करणार आहेत. मिझोरामहून ते मणिपूरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मणिपूरच्या हिंसाचारानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. मे २०२३ पासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात किमान २६० लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक बेघर झाले.
आरसीएफएल अप्रेंटिस भरती २०२५! तरुणांसाठी उत्तम संधी; आजच करा अर्ज
या वृत्तानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ” जर पंतप्रधान मणिपूरला जात असतील तर ती मोठी गोष्ट आहे का, ते पंतप्रधान आहेत. हिंसाचारानंतर ते दोन-तीन वर्षांनी जात आहेत. जेव्हा मणिपूर जळत होते, हिंसाचार भडकत होता, तेव्हा त्यांना तिथे जाण्याची हिंमत झाली नाही. आता मोदीजींची पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली आहे, म्हणून ते पर्यटनासाठी तिथे जात आहेत.” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.
मणिपूरमध्ये सुमारे अडीच वर्षांपूर्वी हिंसाचाराचा काळ सुरू झाला. त्यावेळी २७ मार्च २०२३ रोजी मणिपूर उच्च न्यायालयाने एका आदेशात राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या यादीत मैतेई समुदायाचा समावेश करण्याबाबत त्वरीत विचार करण्यास सांगितले होते. या आदेशानंतर काही दिवसांनीच, ३ मे २०२३ रोजी, राज्यातील कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचार झाला. यामध्ये अनेक लोकांचे प्राणही गेले.
मणिपूरमध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने आयोजित केलेल्या सार्वजनिक रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर, प्रशासनाने दिसताच गोळीबार करण्याचे आदेशही जारी केले. त्यानंतर, राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला होता. पंतप्रधानांकड मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही.,अशी टिकाही त्यांच्यावर कऱण्यात आली होती.
अजित पवारांना थेट भिडणाऱ्या कोण आहेत IPS अंजना कृष्णा? अवैध मुरुम उपसा होणाऱ्या ठिकाणी केली धडक
दरम्यान, वर्षभरापूर्वी मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यांनी म्हटले होते, “देशाचे गृहमंत्री इकडे-तिकडे फिरत आहेत, पण मणिपूरमधील स्थिती सर्वांनाच माहिती आहे. त्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. मात्र ते मुंबईत राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. लालबागच्या राजाला भेट देण्यासाठी आले होते, निवडणूक सभा घेत होत्या. पण त्यांच्यासाठी मणिपूरची अंतर्गत सुरक्षा जणू संपल्यासारखी झाली आहे. तिथे रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत, युद्धासारखी स्थिती आहे. अशा वेळी गृहमंत्रालय आणि एनएसए (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) कुठे आहेत?”
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधताना राऊत म्हणाले होते, “पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी तिथे जातील, फोटो काढतील. पण त्यांनी मणिपूरच्या रस्त्यांवर चालत जाऊन आपली उपस्थिती दाखवावी. तिथे उघडपणे गोळीबार, रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत, पण पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गप्प बसले आहेत.” या गंभीर परिस्थितीसंदर्भात त्यांनी एनडीएतील इतर नेत्यांवरही टीका केली. “या सर्व घटनांसाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू जबाबदार आहेत, कारण त्यांनी देशाची सूत्रे अशा लोकांच्या हाती दिली आहेत जे आज या सगळ्यावर पूर्णपणे मौन बाळगून आहेत,” असंही राऊत म्हणाले.