Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day: आज भारताचा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या १५ ऑगस्टचा इतिहास..

Independence Day: १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तसेच इस्रोची स्थापना झाली. या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, जन्म आणि मृत्यू दिनविशेष याबद्दलची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 15, 2026 | 08:43 AM
independence day

independence day

Follow Us
Follow Us:

Independence Day: आजचा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन असून हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे.  आज भारताने इंग्रजांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले, हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला आणि आपल्या ऐतिहासिक भाषणात देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं.

१५ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1519 : पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
  • 1664 : शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात खवासखानचा (दुसऱ्यांदा) पराभव केला.
  • 1824 : अमेरिकेतील गुलामगिरीतून मुक्त झालेल्या लोकांनी लायबेरिया राष्ट्राची स्थापना केली.
  • 1862 : मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1914 : पनामा कालव्याद्वारे एस. एस. अँकॉन हे पास होणारे पहिले व्यापारी जहाज होते.
  • 1929 : ग्राफ झेपेलिन, एक्सप्लोरर बलून, जगाच्या सहलीसाठी निघाले.
  • 1945 : दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.
  • 1947 : जवळपास 190 वर्षांच्या ब्रिटीश कंपनी आणि राजसत्तेनंतर भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1947 : ‘पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू’ – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
  • 1947 : मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
  • 1948 : दक्षिण कोरिया देशाची निर्मिती झाली.
  • 1960 : काँगो फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • 1969 : इस्रोची स्थापना झाली.
  • 1971 : अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
  • 1971 : बहरीनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1975 : बांगलादेशात लष्करी उठाव. शेख मुजीबुर रहमान कुटुंबाची हत्या.
  • 1982 : भारतात रंगीत टेलिव्हिजन प्रसारण सुरू झाले.
  • 1985 : आसाम करारावर स्वाक्षरी, भारत सरकारचे प्रतिनिधी आणि आसाम चळवळीच्या नेत्यांमध्ये आंदोलन संपवण्यासाठी एक करार.
  •  1988 : ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ दूरदर्शनवर प्रथमच प्रसारित झाला.
  • 2007 : पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार 8.0 तीव्रतेचा भूकंप. 514 ठार, 1,090 जखमी.
  • 2021 : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला.
UPSC Success Story: KBC मध्ये ५० लाख जिंकल्यानंतर विकासने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा कशी क्रॅक केली? जाणून घ्या

१५ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1769 : ‘नेपोलिअन बोनापार्ट’ – फ्रान्सचा सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 5 मे 1821 – सेंट हेलेना)
  • 1798 : ‘संगोली रायन्ना’ – भारतीय योद्धा यांचा जन्म. (मृत्यू : 26 जानेवारी 1831)
  • 1865 : ‘मिकाओ उस्ईई’ – रेकी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 9 मार्च 1926)
  • 1867 : ‘गणपतराव जोशी’ – रंगभूमी अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1922)
  • 1872 : ‘योगी अरविंद घोष’ – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक यांचा जन्म.
  • 1872 : ‘श्री अरबिंदो’ – भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 5 डिसेंबर 1950)
  • 1873 : ‘रामप्रसाद चंदा’ – भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 मार्च 1942)
  • 1904 : ‘जॉर्ज क्लाईन’ – मोटार व्हीलचेअर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 4 नोव्हेंबर 1922)
  • 1912 : ‘उस्ताद अमीर खाँ’ – इंदौर घराण्याचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 फेब्रुवारी 1974)
  • 1913 : ‘भगवान रघुनाथ कुळकर्णी’ – लेखक कवी यांचा जन्म. (मृत्यू : 7 सप्टेंबर 1953)
  • 1915 : ‘इस्मत चुगताई’ – ऊर्दू कथा, पटकथा लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑक्टोबर 1991)
  • 1917 : ‘सरोजिनी शारंगपाणी’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 13 नोव्हेंबर 2001)
  • 1922 : ‘वामनदादा कर्डक’ – लोककवी यांचा जन्म.
  • 1929 : ‘उमाकांत ठोमरे’ – साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑक्टोबर 1999)
  • 1945 : ‘बेगम खालेदा झिया’ – बांगला देशच्या पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1947 : ‘राखी गुलझार’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1958 : ‘सिंपल कपाडिया’ – अभिनेत्री आणि वेशभूषाकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 2009)
  • 1961 : ‘सुहासिनी मणिरत्नम’ – भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1964 : ‘मेलिंडा गेट्स’ – बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी यांचा जन्म.
  • 1971 : ‘अदनान सामी’ – भारतीय गायक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1975 : ‘विजय भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1992 : ‘भास्करन आडहान’ – भारतीय बुद्धिबळपटू यांचा जन्म.
SSB Interview: लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न आहे का? मग ५ दिवस चालणारी SSB मुलाखत नेमकी कशी असते? जाणून घ्या..

१५ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1057 : ‘मॅक बेथ’ – स्कॉटलंडचा राजा यांचे निधन.
  • 1118 : ‘ऍलेक्सियस (पहिला)’ – कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट यांचे निधन.
  • 1935 : ‘विल रॉजर्स’ – अमेरिकन अभिनेते यांचे निधन.
  • 1942 : ‘महादेव देसाई’ – स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1892)
  • 1974 : ‘स्वामी स्वरुपानंद’ – यांनी समाधी घेतली (जन्म : 15 डिसेंबर 1903)
  • 1975 : ‘शेख मुजीबूर रहमान’ – बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 17 मार्च 1920)
  • 2004 : ‘अमरसिंग चौधरी’ – गुजरातचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1941)
  • 2005 : ‘वेंकट सत्यनारायण’ – भारतीय त्वचाशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1927)

Web Title: 15 august independence day history birth death anniversary marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh
  • Independence Day 2026

संबंधित बातम्या

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव
2

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व
3

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
4

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.