Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वाच्या इतिहासाला नवे वळण; पुण्याच्या संशोधकांनी लावला 12 अब्ज प्रकाशवर्षांवरील ‘अलकनंदा’चा शोध

जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने भारतीय संशोधकांनी ‘अलकनंदा’ ही 12 अब्ज प्रकाशवर्षांवरील प्राचीन पण पूर्ण विकसित सर्पिल आकाशगंगा शोधून काढली आहे. हा शोध प्रारंभीच्या विश्वावरील समज बदलणारा ठरत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2025 | 12:23 PM
विश्वाच्या इतिहासाला नवे वळण; पुण्याच्या संशोधकांनी लावला 12 अब्ज प्रकाशवर्षांवरील ‘अलकनंदा’चा शोध

विश्वाच्या इतिहासाला नवे वळण; पुण्याच्या संशोधकांनी लावला 12 अब्ज प्रकाशवर्षांवरील ‘अलकनंदा’चा शोध

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संशोधकांचा मोठा शोध
  • दीड अब्ज वर्षांतच पूर्ण विकसित सर्पिल आकाशगंगेचा लावला शोध
  • १० अब्ज सूर्याएवढे तारे, दोन सर्पिल बाहू, तेजस्वी मध्यभाग आणि दरवर्षी ६३ सूर्याएवढी ताऱ्यांची निर्मिती
विश्वाच्या जन्मानंतर अवघ्या दीड अब्ज वर्षांत पूर्णपणे विकसित झालेली भव्य सर्पिल आकाशगंगा भारतीय संशोधकांनी शोधून काढली आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) च्या मदतीने झालेल्या या शोधाला अलकनंदा असे नाव देण्यात आले आहे. हा शोध पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स (NCRA) आणि टाटा इस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथील खगोलशास्त्रज्ञ राशी जैन आणि योगेश वडदेकर यांनी केला आहे. त्याचा अहवाल एस्ट्रॉनॉमी आणि एस्ट्रोफिजिक्स या प्रतिष्ठित जर्नलमध्य प्रसिद्ध झाला आहे.

बॅकिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँक दिन केला जातो साजरा; जाणून घ्या 04 डिसेंबरचा इतिहास

अलकनंदा आकाशगंगा पृथ्वीपासून सुमारे १२ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. तिचा रेडशिफ्ट सुमारे ४ असल्याने तिचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला १२ अब्ज वर्षे लागली आहेत. त्यामुळे आपण तिला विश्वाच्या अत्यंत प्रारंभीच्या काळात जशी होती तशी पाहत आहोत. अलकनंदा नदीवरून या आकाशगंगेला नाव देण्यात आले आहे.

अनेक तपशील उघडकीस

जेडब्ल्यूएसटीच्या इनफ्रारेड क्षमतेमुळे या आकाशगंगेचे अनेक तपशील उघडकीस आले आहेत. तिच्यात १० अब्ज सूर्याच्या वस्तुमानाइतके तारे आहेत. मिल्की वेपेक्षा अनेकपट जलद अशी दरवर्षी ६३ सूर्याएवढी ताऱ्यांची निर्मिती होते. दोन सुंदर सर्पिल बाहू, तेजस्वी मध्यभाग आणि एका माळेवर रचलेल्या मणी स्वरूपातील ताऱ्यांचे समूह तिची रचना अधिक आकर्षक बनवतात. सुमारे ३० हजार प्रकाशवर्षाच्या व्यासाची ही आकाशगंगा विश्वाच्या इतिहासासाठी ‘अतिशय परिपक्व दिसते. पूर्वीचे खगोलशास्त्रीय सिद्धांत सांगतात की प्रारंभीच्या विश्वात आकाशगंगा अस्ताव्यस्त, ढवळाढवळयुक्त असाव्यात, पण अलकनंदा त्या धारणेला आव्हान देत आहे.

Navy Day 2025: 54 वर्षापूर्वी समुद्रातील ‘ते’ युद्ध, जेव्हा भारतीय नौदलाने विणले जाळे आणि पाकिस्तानचे झाले 2 तुकडे

विश्वाचे नवे आकलन

काहीशे दशलक्ष वर्षांत इतकी मोठी आणि स्थिर डिस्क तयार होणे हे विद्यमान मॉडेल्सना प्रश्न पडेल असेच आहे. या निरीक्षणात जेडब्ल्यूएसटीची उच्च स्पष्टता आणि अबेल २७४४ या विशाल गॅलेक्सी क्लस्टरमुळे मिळालेल्या गुरुत्वीय लेन्सिंगचा मोठा वाटा आहे. संशोधक लवकरच पुढील निरीक्षणांद्वारे अलकनंदा गरम की थंड डिस्क आहे हे तपासणार आहेत. हा शोध प्रारंभीच्या विश्वाच्या विकासाविषयीचे आकलन नव्याने घडवू शकतो.

Web Title: A new turn in the history of the universe pune researchers discovers alaknanda spiral galaxy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Pune
  • science news
  • Space

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.