बँकिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ०४ डिसेंबर आंतरराष्ट्रीय बँक दिन साजरा केला जातो (फोटो - टीम नवराष्ट्र)
आंतरराष्ट्रीय बँक दिन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 2019 मध्ये हा दिवस घोषित केला, ज्यामागील उद्दिष्ट म्हणजे जागतिक बँकिंग व्यवस्थेच्या महत्त्वाला अधोरेखित करणे आणि टिकाऊ आर्थिक विकासासाठी त्यांचे योगदान ओळखणे होय. बँका आर्थिक स्थिरतेचे आणि प्रगतीचे केंद्रस्थान आहेत. त्या केवळ व्यक्तींना बचत आणि कर्जाच्या सुविधा पुरवण्याचे कार्य करत नाहीत, तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला आधार देतात. लहान व्यवसायांना भांडवल उपलब्ध करून देणे, महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत करणे, आणि गरिबी निर्मूलनासाठी विविध योजना राबवणे या क्षेत्रात बँकांची भूमिका महत्त्वाची आहे.
04 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
04 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष






