Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navrashtra Navdurga: मूर्ती लहान पण कीर्ती महान..! अवघ्या १३ वर्षीय अक्साने धनुर्विद्यात मिळवले कांस्यपदक

'मूर्ती लहान, पण कीर्ती महान' ही म्हण १३ वर्षांच्या अक्सा शिरगावकरने खरी करून दाखवली. सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडलसह कांस्य पदक पटकावून अक्सा हिने संपूर्ण देशभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2025 | 07:39 AM
सिंधुकन्या अक्सा शिरगावकरचा सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णवेधसह डबल धमाका

सिंधुकन्या अक्सा शिरगावकरचा सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णवेधसह डबल धमाका

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णवेध करतानाच कांस्यपदक पटकावून डबल मेडल जिंकले आहे. तिचे यश हे कौतुकास्पद, तेवढेच ऐतिहासिक. तिला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. जिद्द, सातत्य आणि अफाट मेहनत करण्याची तयारी असेल, तर यशाला गवसणी घालणे मुळीच अशक्य नसते हे अक्साच्या कामगिरीवरून लक्षात येते. अक्साच्या यशात तिचे प्रशिक्षक माजी सैनिक प्रवीण सावंत यांचा सर्वात मोठा वाटा आहे.

अपार मेहनत, जिद्द आणि एकाग्रता असा त्रिवेणी संगम असला की, मग यश तुमच्या पायाशी लोळण घेते. सिंधुदुर्गातील १३ वर्षीय अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने 14 वर्षाखालील वयोगटात सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडलसह कांस्य पदक पटकावले आहेत. तिचे यश हे जेवढे ऐतिहासिक, तेवढेच कौतुकास्पद. एका सामान्य कुटुंबातील मुलगी सुवर्ण आव्हानांचा लीलया वेध घेते तेव्हा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरते. पंजाब मधील संगरूर येथे 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातून राज्यात अव्वल आलेले एकूण 72 स्पर्धक सहभागी झाले होते. अवघ्या साडेतीन वर्षांच्या आपल्या धनुर्विद्या करिअर मध्ये अक्सा हिने यापूर्वीही आर्चरी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक तसेच सिल्व्हर मेडल प्राप्त केली आहेत.

Navdurga: ‘कष्टाला पर्याय नाही, पण स्वतःवर प्रेम करायला शिका’, मराठमोळ्या YouTuber ऐश्वर्या पेवालचा प्रेरणादायी प्रवास

सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडलसह कांस्य पदक पटकावून अक्सा हिने संपूर्ण देशभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. 14 वर्षाखालील वयोगटात अक्सा ने हे सुवर्णयश प्राप्त केले आहे. अक्सा शिरगावकर हिने स्कोअरिंग राउंड मध्ये सुवर्णपदक तर इलिमीनेशन राउंड मध्ये कांस्यपदक पटकावले.

कणकवली शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली अक्सा ही मागील अडीच वर्षे सातारा येथील माजी सैनिक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत यांच्या दृष्टी निवासी अकादमीमध्ये आर्चरीचे प्रशिक्षण घेत आहे. कणकवली कलमठ गावातील प्रतिथयश शासकीय ठेकेदार, एम्पायर रिअलइन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा मुद्स्सरनझर शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसहाय्यता संघ आणि जिजाऊ प्रभाग संघाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणाऱ्या तन्वीर शिरगावकर यांची जेष्ठ सुकन्या असलेल्या अक्सा हिने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे जिल्ह्यासह राज्यभरातील क्रीडा वर्तुळातून अभिनंदन होत आहे.

गुंटूर (राज्य मध्यप्रदेश) येथील एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशीप २०२४ – २५ स्पर्धेत १३ वर्षांखालील ‘कंपाऊंड आर्चरी’‌ प्रकारात देशभरातील सर्वच राज्यांतून ‘सिलेक्टेड’ १०० खेळाडू सहभागी झाले होते. गतवर्षी ‘गोल्ड‌ मेडल’ प्राप्त झालेल्या स्पर्धकाचाही या स्पर्धेत सहभाग होता. अक्सा हिने सर्व स्पर्धकांमधून १६० पैकी १५५ गुण मिळवत पहिले गोल्ड मेडल मिळविले. त्यानंतर टॉप ३२ स्पर्धकांमध्येही अक्सा हिने अन्य स्पर्धकांना मागे टाकले. फायनल टाय झाल्यानंतर शेवटच्या प्रयत्नात वन ॲरो फ्लाय राऊंड मध्ये अक्सा हिने १० गुण मिळवले तर अक्सा हिच्या स्पर्धकाला ९ गुण मिळाले. त्यामुळे या नॅशनल स्पर्धेतील इलिमिनेशन राऊंड मध्येही अक्सा हिने गोल्ड मेडलवर स्वतःचे नाव कोरले.

लहानपणापासूनच नेमबाजीची आवड लागलेल्या अक्सा हिने दोन वर्षांपूर्वी सातारा येथील प्रविण सावंत यांच्या दृष्टी ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षांमध्येच तिने विविध स्पर्धांमध्ये पदकांना गवसणी घातली. यात वरील सर्व स्पर्धांसह इतरही अनेक स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डातर्फे पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘पाचवी रँक’ प्राप्त करुन तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली होती. तीच राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली, तेथेही अक्सा हिने सहावी ‘रँक’ प्राप्त केली. नादियाड (राज्य गुजरात) येथे झालेल्या ‘नॅशनल‌ स्कुल गेम्स ऑफ आर्चरी २०२४ – २५’मध्ये अक्सा हिने ‘कंपाऊंड’ प्रकारात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाने स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल’ प्राप्त केले होते. १५ वर्षांखालील‌ स्पर्धेत देशभरातील मातब्बर खेळाडूंचा सहभाग असला तरीही आपण ‘मेडल’ मिळवूच, असा विश्वास अक्सा हिने व्यक्त केला आहे. भविष्यात जगभरात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरणे व ‘सुवर्णपदक’ मिळवणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याची प्रतिक्रिया अक्सा हिने विजयानंतर दिली आहे.

अक्साच्या यशाबद्दल वडील तथा प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर आणि आई तथा बचतगटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या, अनेक ‌महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या तन्वीर शिरगांवकर यांनीही समाधान व्यक्त केले आहे. अक्सा हिच्यापासून प्रेरणा घेऊन सिंधुदुर्गातही ‘आर्चरी’चे‌ खेळाडू‌ तयार होतील. तर भविष्यात अक्सा आंतरराष्ट्रीय स्पर्धाही गाजवेल. पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातही प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून सिंधुदुर्गातही आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार होतील, असे‌ आवाहनही तन्वीर शिरगांवकर यांनी ‌केले आहे. अक्सा हिचे यशस्वी कामगिरीबद्दल राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Navrashtra Navdurga: “..आणि तो दृष्टिहीन मुलगा मोटार रेसिंगमध्ये दुसरा आला”, नंदिनी हंबर्डे सांगतायत दृष्टिहीन मुलांची ‘डोळस’ गोष्ट

Web Title: Aksa mudassarnarzhar shirgaonkar double blast with gold medal at cbse national archery championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 07:39 AM

Topics:  

  • Navratri
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे
1

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज
2

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ
3

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ

BCCI President Salary: बीसीसीआय अध्यक्षांना किती मिळतो पगार? त्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि अधिकारांविषयी जाणून घ्या
4

BCCI President Salary: बीसीसीआय अध्यक्षांना किती मिळतो पगार? त्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि अधिकारांविषयी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.