धावपळीच्या जीवनात महिलांना होतात 'हे' गंभीर आजार?
हल्ली धावपळीच्या जगात महिला सतत काम आणि घरातील जबाबदाऱ्यांमुळे थकून जातात. ज्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मात्र महिला चूल आणि मुलं एवढीच गोष्टी न करता कामाच्या ठिकाणी आघाडीवर आहेत. महिला त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांना हव्या असलेल्या पदावर काम करत आहेत. पण कामाच्या धावपळीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यात टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शारीरिक आरोग्य बिघडल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसू लागणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते ,पण कालांतराने हेच आजार मोठे स्वरूप घेतात. त्यामुळे शरीर सामान्य लक्षणे दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)
नजर अंधुक झाली आहे? सतत डोळे दुखतात? मग आठवड्यातून एकदा करा ‘या’ भाजीचे सेवन, नजर होईल तीक्ष्ण
कामाचा तणाव, आहारात निर्माण झालेली विटामिनची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांमध्ये प्रामुख्याने कोणते गंभीर आजार दिसून येतात? या आजारांची लक्षणे काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हल्ली महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर हा आजार सामान्य झाला आहे. वयाच्या चाळिशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. मात्र अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. पण महिलांना या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. भारतामध्ये प्रत्येक चौथ्या मिनिटाला ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आढळून येतात. ज्यामुळे महिलांना बऱ्याचदा मृत्यू होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर उपचार घेताना महिला मानसिक दृष्ट्या खचून जातात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
भारतासह इतर सर्व देशांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरातील अवयव हळूहळू कमकुवत होऊन जातात. गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये एचपीवी वॅक्सीन घेऊ शकता. सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. मासिक पाळीमध्ये जास्त ब्लीडींग होणे, मेनोपॉजनंतरही रक्तस्त्राव होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, चवीसोबत आरोग्याला होतील अनेक फायदे
जगभरातील अनेकांना मधुमेह या गंभीर आजाराने वेढले आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे आहारात साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. साखर, पॅकिंग फूड, फळांचा रस इत्यादी पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. मधुमेह झाल्यानंतर आहारात पथ्य पाळावे.