Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : राजकारणातील लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडेंनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 03 जूनचा इतिहास

भाजप पक्ष महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहचवण्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण नेत्यांनी बहुमुल्य योगदान दिले त्यापैकी एक नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. समाजकारणसह त्यांनी केलेल्या राजकारणामुळे लोकांच्या मनात मुंडेंचे विशेष स्थान आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 03, 2025 | 10:44 AM
BJP Beed leader Gopinath Munde death anniversary 03 June History Dinvishesh

BJP Beed leader Gopinath Munde death anniversary 03 June History Dinvishesh

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेही काही राजकारणी होऊन गेले ज्यांनी सत्तेतील आणि विरोधी बाकांवरील नेत्यांची मने जिंकली. असे भाजपचे बीडचे नेते गोपीनाथ मुंडे. त्यांनी भाजप पक्ष महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहचवण्यामध्ये शर्तीचे प्रयत्न केले. त्यांच्या भाषण आणि सभांना उफाळणारी लोकांची गर्दी ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत असत. आमदार, खासदार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांनी 03 जून 2014 साली जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने बीडच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी झालेल्या दिसून आल्या.

03 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1818 : शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले, नंतर इंग्रजानी शनिवार वाड्यावर कब्जा करून तिथे युनियन जॅक फडकावला.
  • 1889 : ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
  • 1916 : महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
  • 1940 : डंकर्कची लढाई – जर्मन विजय. दोस्त फौज पळाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – जर्मन हवाई दलाने पॅरिसवर बॉम्ब टाकला.
  • 1947 : हिंदुस्थानच्या फाळणीसाठी माउंटबॅटन योजना जाहीर करण्यात आली.
  • 1950 : मॉरिस हर्झॉग आणि लुई लाचेनल यांनी 8091 मीटर अन्नपूर्णा शिखरावर पहिले यशस्वी चढाई केली.
  • 1979 : मेक्सिकोच्या आखातातील एहटॉक तेलाच्या विहिरीला आग लागली. 600000 टन तेल समुद्रात सांडले.
  • 1984 : ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
  • 1989 : चीनने थियानमन स्क्वेअरवर सात आठवड्यांपासून तळ ठोकलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सैन्य पाठवले.
  • 1998 : जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ‍या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.

    महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

03 जून जन्म दिनविशेष
  • 1865 : ‘जॉर्ज (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1936)
  • 1890 : ‘बाबूराव पेंटर’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 जानेवारी 1954)
  • 1890 : खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी – यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1988)
  • 1892 : ‘आनंदीबाई शिर्के’ – लेखिका तसेच बालसाहित्यिका यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1986)
  • 1895 : ‘के.एम. पण्णीक्कर’ – चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत यांचा जन्म. (मृत्यू: 10 डिसेंबर 1963)
  • 1924 : ‘एम. करुणानिधी’ – तामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1930 : ‘जॉर्ज फर्नांडिस’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1966 : ‘वासिम अक्रम’ – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

03 जून मृत्यू दिनविशेष

  • 1657 : ‘विल्यम हार्वी’ – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 1 एप्रिल 1578)
  • 1932 : ‘सर दोराबजी टाटा’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1859)
  • 1956 : ‘वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1881)
  • 1974 : ‘कृष्ण बल्लभ सहाय’ – बिहारचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म:31 डिसेंबर 1898)
  • 1989 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरू आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1902)
  • 1990 : ‘रॉबर्ट नोयिस’ – इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1927)
  • 1997 : ‘मीनाक्षी शिरोडकर’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
  • 1977 : ‘आर्चिबाल्ड विवियन हिल’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 2010 : ‘अजय सरपोतदार’ – मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1959)
  • 2011 : ‘भजन लाल बिश्नोई’ – भारतीय राजकारणी, हरियाणाचे सहावे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1930)
  • 2013 : ‘अतुल चिटणीस’ – जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1962)
  • 2013 : नफिसा खान उर्फ ‘जिया खान’ – बॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन.
  • 2014: ‘गोपीनाथ मुंडे’ – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1949)
  • 2016 : ‘मुहम्मद अली’ – अमेरिकन बॉक्सर यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1942)

Web Title: Bjp beed leader gopinath munde death anniversary 03 june history dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • Dinvishesh news
  • gopinath munde
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातल्याचा चव्हाणांचा दावा
1

‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातल्याचा चव्हाणांचा दावा

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
2

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.