Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhaava : सुसंस्कृत आणि पराक्रमी युवराज! संभाजी महाराजांची स्तुती करताना थकले नाहीत फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे

भोसले घराणं म्हणजे त्याग, शौर्य आणि पराक्रमाचं दुसरं नाव असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. शौर्य आणि साहज गाजवण्यात भोसले कुळाच्या तिनही पिढ्यांचा इतिहास अभिमानास्पद आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 14, 2025 | 03:52 PM
Chhaava : सुसंस्कृत आणि पराक्रमी युवराज! संभाजी महाराजांची स्तुती करताना थकले नाहीत फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे
Follow Us
Close
Follow Us:

स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली ती राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी ते स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवरायांनी आणि हे स्वराज्य शेवटच्या श्वासापर्यंत पेललं ते छत्रपती संभाजी महाराजांनी. श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते। यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।। छत्रपतींच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर शंभूराजेंनी केवळ स्वत:ची वेगळी राजमुद्राच बनवली नाही तर स्वराज्याच्या विस्तारासाठी रक्ताचं पाणी देखील केलं याला इतिहास साक्ष आहे. खरंतर भोसले घराणं म्हणजे त्याग, शौर्य आणि पराक्रमाचं दुसरं नाव असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. शौर्य आणि साहज गाजवण्यात भोसले कुळाच्या तिनही पिढ्यांचा इतिहास अभिमानास्पद आहे. शिवाजी महाराजांसारखे असामान्य पिता लाभल्यावर केवळ पुस्तकी शिक्षणच शंभूराजेंना कसं मिळणार होतं?

राज्याच्या राजकारणासाठी केवळ लिहिता वाचता येणंच नाही तर युद्धकलेचं तंत्रशुद्ध शिक्षण शंभूराजेंना मिळाल ते विद्वान केशव पंडित यांच्या देखरेखीखाली. युवराजपदावर असतानाच शंभूराजेंनी ‘बुधभूषण’ ग्रंथ लिहिला. या ग्रंथात निष्ठावान सैनिक कसा असतो, सैनिकाची कर्तव्य, शौर्य आणि साहस म्हणजे काय, या सगळ्याबाबत महाराजांनी त्यांना ग्रथांत नमूद केले. विशेष म्हणजे हा ग्रंथ स्वराज्याच्या या धाकल्या धन्याने वयाच्या केवळ 14 वर्षी लिहिला. शंभूराजेंच्या शौर्याबाबात सांगताना फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे याने नमूद केलं की, शिवरायांनी शंभूराजेंना वयाच्या 14 ते 15 वर्षी राज्यकारभाराचे धडे देण्यास सुरुवात केली होती. युद्धासाठी फक्त शक्तीच नाही तर युक्ती देखील तितकीच महत्वाची असते. शंभूराजे 15 वर्षांचे असताना शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचे विभाग करुन शत्रूवर हल्ला चढवला होता. त्यावेळी दहा हजार सैन्याचा एक विभाग त्यांनी युवराज शंभूराजेंच्या ताब्यात दिला. युवराज वयाने लहान असले तरी त्यांचं शौर्य, त्यांचं साहस हे वीराप्रमाणेच होतं. कसलेल्या सेनापतीशी बरोबरी करेन इतकं इतकं प्रावीण्य त्यांनी लहान वयातंच युद्ध कलेत मिळवलं होतं.

शौर्य साहस रयतेवरचं अपार प्रेम आणि धर्मनिष्ठा या शंभूराजेंच्या गुणांमुळे सैन्यातीस हरएक मावळा त्यांना पाहून प्रभावित होत असे. मात्र या सगळ्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग होता ते म्हणजे या वीरपुत्राचं तेजस्वी सौंदर्य. स्वराज्यातील फक्त मावळेच नाही तर प्रत्येक सर्वसामान्य कुटुंब हे शंभूराजेंवर पोटच्या मुलासारखं प्रेम करत होते. शंभूराजेंवर मावळ्यांची इतकी अपार निष्ठा होती की, त्यांना राजांच्या आज्ञेखाली परकीय आक्रमणांशी लढण्यात सैन्याला धन्यता वाटत असे. वीरता आणि त्यागाचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शत्रूशी लढताना पोलादासारखा कणखर असणारा हा योद्धा बापाच्या मायेच्या छायेत मात्र लोण्यासारखा विरघळत असे. जन्माला आल्यापासून शंभूराजेंना संघर्ष पाचवीला पुजला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षीचं जन्मदात्या माऊलीचं छत्र हरपलं, अनेक मोहीमा,मनसुबे यात शिवाजीराजेंना शंभूराजेंसाठी फार वेळ देता आला नाही तरी या बाप लेकाचं नातं सह्याद्रीसारखं अढळं होतं. अंतर असलं तरी ते एकमेकांना कधीच दुरावले नव्हते. शंभूराजेंचं वर्णन करताना फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे याने नमूद केले आहे.

सदर लेख हा नवराष्ट्रच्या स्वराज्याचा छावा या मासिकावर आधारित आहे.

 

Web Title: Chhaava a cultured and powerful prince french traveler abb carr never tires of praising sambhaji maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • Chhaava
  • Chhatrapati Sambhaji Maharaj
  • India History

संबंधित बातम्या

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी
1

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार
2

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?
3

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’
4

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.