Climate change is rapidly heating two regions near 40° latitude in both hemispheres
नवी दिल्ली – हवामान बदलाचा धोका दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. जगभरात अति हवामान घटनांचे प्रमाण वाढत असतानाच, शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. डॉ. केविन ट्रेनबर्थ यांच्या नेतृत्वाखालील एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून असे उघड झाले आहे की, पृथ्वीच्या महासागरातील दोन विशिष्ट क्षेत्रं अतिशय वेगाने गरम होत आहेत. ही प्रक्रिया न केवळ सागरी परिसंस्थेसाठी हानिकारक आहे, तर ती मानवजातीसाठीही भविष्यात एक मोठं संकट बनू शकते.
जगप्रसिद्ध Journal of Climate या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, ही दोन्ही क्षेत्रं पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण गोलार्धात सुमारे ४० अंश अक्षांशावर स्थित आहेत.
1. दक्षिण गोलार्धात, न्यूझीलंड, तस्मानिया आणि अर्जेंटिनाच्या पूर्व अटलांटिक महासागरातील ४० ते ४५ अंश दक्षिण अक्षांश दरम्यान सर्वाधिक तापमानवाढ आढळून आली आहे.
2. उत्तर गोलार्धात, अमेरिका आणि जपानच्या पूर्व किनाऱ्याजवळील ४० अंश उत्तर अक्षांश दरम्यानचा समुद्री भाग अतिशय वेगाने गरम होत आहे.
या तापमानवाढीमुळे महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमान इतके झपाट्याने वाढत आहे की त्याचे परिणाम महासागरातील प्रवाह, वादळे आणि वातावरणातील बदलांवर दिसून येत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S-400 डेटा लीकचा संभाव्य धोका; पाकिस्तान-चीन गुप्त करारामुळे भारताची चिंता वाढली
डॉ. ट्रेनबर्थ यांनी स्पष्टपणे सांगितले की, या सर्व प्रक्रियेचे मुख्य कारण म्हणजे हरितगृह वायूंची वाढ. वातावरणात कार्बन डायऑक्साइड, मीथेन आणि इतर ग्रीनहाऊस वायूंचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यातून निर्माण होणारी उष्णता महासागरांनी मोठ्या प्रमाणावर शोषून घेतली आहे. तथापि, त्यांनी हेही मान्य केले की या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक बदलांचाही वाटा आहे, त्यामुळे संपूर्ण दोष मानवनिर्मित वायूंवर देणे योग्य ठरणार नाही. या संशोधन पथकात चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस, ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठ आणि युरोपियन हवामान संस्थांचे शास्त्रज्ञ सहभागी होते.
तापमानवाढीचा सगळ्यात मोठा परिणाम सागरी जीवसृष्टीवर होतो आहे. जलचर प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तापमान वाढल्यामुळे समुद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे, जे अनेक जीवसृष्टींसाठी आवश्यक आहे. तसेच, या तापमानवाढीमुळे समुद्रातून पाण्याचा बाष्प अधिक प्रमाणात वातावरणात जात आहे, आणि तोच वाफ शक्तिशाली हरितगृह वायू म्हणून काम करतो. परिणामी, अतिवृष्टी, वादळे, पूर आणि जेट स्ट्रीममध्ये होणारे बदल यांचे प्रमाण वाढले आहे.
या अभ्यासात २००० ते २०२३ या कालावधीत २००० मीटर खोलीपर्यंत समुद्राचे तापमान आणि ऊर्जा मोजण्यात आली. त्याची तुलना २०००-२००४ या कालखंडाशी करण्यात आली. विशेष म्हणजे, उष्णकटिबंधीय भागांमध्ये तापमानवाढ झाल्याचे आढळले असले तरी, एल निनो आणि इतर हवामान घटकांमुळे तेथील नमुने तितकेसे स्पष्ट नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २० अंश अक्षांशाच्या आसपासच्या उपोष्णकटिबंधीय क्षेत्रांत तापमानवाढ फारशी दिसली नाही, ही बाब संशोधकांसाठीही एक कोडे ठरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S-400 डेटा लीकचा संभाव्य धोका; पाकिस्तान-चीन गुप्त करारामुळे भारताची चिंता वाढली
या संशोधनातून पुन्हा एकदा स्पष्ट होते की हवामान बदलाचा वेग अपेक्षेपेक्षा अधिक आहे आणि त्याचा परिणाम महासागरांवर गंभीर स्वरूपात होत आहे. मानवांनी जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर सागरी परिसंस्थेतील हानीमुळे संपूर्ण हवामान यंत्रणा कोलमडू शकते. हे संकट केवळ पर्यावरणाचे नाही, तर मानवी जीवनशैलीच्या शाश्वततेचेही आहे – त्यामुळे आता *केवळ चर्चा नव्हे, तर कृतीची