Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

N फॉर North Korea, N फॉर नरक? इतके कडक निर्बंध, देशात जगणे जणू मरण्यासारखे

North Korea हा जगातील सर्वात बंदिस्त आणि कडक नियम असलेला देश मानला जातो, जिथे नागरिकांवर आणि पर्यटकांवरही अनेक निर्बंध आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 09, 2026 | 02:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशाच्या पाठीवर कुठेही जा पण North Korea फिरण्याचा विचार करत आहात तर आधी त्या देशाचा अभ्यास करून जा. अभ्यास कराल तर स्वतःच म्हणाल, “नको रे बाबा North Korea! कोणत्या तरी दुसऱ्या देशात फिरू.” येथे राहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या तोंडच पाणी पळालंय, त्यात तुम्ही तिथे जाण्याचा विचार तरी करत असाल तर तुम्ही “आ बैल मुझे मार!” करणार आहात. का असं? कारण त्या देशाचा शासक आहे ‘Kim Jong un’! एक असा शासक ज्याचे नियम यमसदनालाही लाजवतील.

Social Media Manager म्हणून करिअर घडवायचंय? पैशाचा पडेल पाऊस, ‘ही’ Process करा फॉलो

North Korea मध्ये पावलापावलावर प्रतिबंध आहेत. चित्रविचित्र नियम आहेत आणि अशामध्ये ते जाणून घेतल्याशिवाय तिथे गेलात तर काय घरी परत येताय की नाही? याचा नेम नाही काही! या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी किम जोंग उनचे वडील आणि आजोबाचे फोटोफ्रेम असणे आवश्यक आहे. एकवेळ तुम्ही तुमच्या आईवडिलांचे घरी फोटो टांगू नका पण Kim Jong un च्या वाडवडिलांची फोटो घरी असणे बंधनकारक आहे आणि नसले तर Kim Jong un च्या वाडवडिलांकडे जायला तयार रहा. फोटोही घरातील सगळ्यात उंच ठिकाणी लावावे आणि ते स्वच्छ करण्यासाठी सरकारने दिलेल्या पांढऱ्याशुभ्र कपड्याचाच वापर करावा अन्यथा दंड होतो. एकदा एका महिलेने घरात आग लागल्यामुळे आपल्या बाळाला कुशीत घेऊन घराबाहेर धाव घेतली अशामध्ये तिने Kim Jong un च्या वाडवडिलांचे टांगलेले फोटो फ्रेम घराबाहेर काढण्याचे राहून गेले त्यामुळे तिला तुरुंगवासाची शिक्षा मिळाली.

Oil Production Top 10 Countries : जगात कोण आहे ‘ब्लॅक गोल्ड’चा किंग? ‘हे’ आहेत जगाला तेल पाजणारे टॉप 10 देश 

देशाची महत्वाची मिटिंग सुरु असेल आणि त्यादरम्यान कुणाला झोप लागली तर समजून जा यमराजाने बोलावणं पाठवलं. २०१५ मध्ये उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांना मीटिंगमध्ये झोप लागली म्हणून चक्क अँटी-एअरक्राफ्ट गनने (विमान उडवण्याच्या तोफेने) सर्वांसमोर उडवून देण्यात आले. नागरिकांसाठी २८ प्रकारचे हेअरस्टाईल निवडण्यात आले आहे, त्यांनी तोच हेअरकट करावा आणि चुकूनही Kim Jong un सारखी हेअरस्टाईल भासली तर वर जाण्याचे दिवस आले. असा अनेक चित्रविचित्र नियमांमुळे North Korea एकंदरीत नरकाची जाणीव करून देते.

Web Title: Dangerous rules of north korea imposed by kim jong un

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Kim Jong Un
  • North Korea

संबंधित बातम्या

Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री
1

Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.