
Bird baldness research:
संशोधकांनी साळुंकी, कोकिळ आणि कावळा या तीन वेगवेगळ्या प्रजातींमध्ये आढळलेल्या असामान्य पिसेगळतीचे वास्तव निरीक्षण सादर केले आहे. जून २०१२ मध्ये चिंचवडगाव येथे पूर्णपणे डोके व खांद्यापर्यंत पिसेविहीन झालेली साळुंकी आढळली होती. तिच्या गळ्यावरील पिवळ्या त्वचेवर बुरशी किंवा परजीवींचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये निगडी येथे रेस्क्यू दरम्यान डोळ्यापर्यंत पिसेविरहीत कोकिळ आढळली. तर ऑक्टोबर २०२३ मध्ये औंध येथे संपूर्णपणे टक्कल पडलेला कावळा दिसून आला. वैशिष्ट्य म्हणजे या तिन्ही पक्ष्यांचे वयस्क अवस्थेतील निरीक्षण झाले.
‘माणसांप्रमाणे वयानुसार पक्ष्यांना टक्कल पडत नाही. काही पक्ष्यांमध्ये मॉल्टिंगची (संपूर्ण शरीरावरची किंवा ठराविक ठिकाणाची केसगळती होणे) ही नैसर्गिक प्रक्रिया असते; पण साळुंकी, कोकिळ आणि कावळा यांच्या प्रजातींमध्ये ती होत नाही,’ असे उमेश वाघेला यांनी सांगितले. या पक्ष्यांमधील पिसेगळती बुरशीजन्य वाढ, त्वचेचे आजार किंवा एक्टोपारासाइट्स यांसारख्या कारणांशी संबंधित असू शकते, असे संशोधकांनी नमूद केले. कोकिळ व कावळा हे प्रजनन हंगामाबाहेर आढळल्याने पर्यावरणीय व जैविक घटकांचाही यात वाटा असू शकतो, असा संशय अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
What is Sanchar Saathi App: काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोध असलेले काय आहे संचार साथी अॅप?
पोपट आणि साळुंकीत पिसेगळतीच्या यापूर्वीही काही नोंदी झाल्या आहेत. पण कोकिळ आणि कावळ्यांमध्ये टक्कल पडल्याची ही राष्ट्रीय स्तरावरची पहिली नोंद मानली जात आहे. या अभ्यासात निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे शिक्षक प्रमोद सादुल यांनी सहकार्य केले. शहरी भागातील पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय बदलांचे मूल्यमापन करण्यासाठी अशा निरीक्षणांचे महत्त्व वाढत असल्याचे वाघेला व कांबळे यांनी अधोरेखित केले. भविष्यात पंख गळतीची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणखी सखोल संशोधनाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.