PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा
नवराष्ट्र नवदुर्गा या मालिकेत अशा नवदुर्गा महिला ज्या ‘आयएमए’ महाराष्ट्रच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत.डॉ. मंजुषा प्रमोद गिरी (साकला) यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून इतिहास घडवला आहे. हा विजय केवळ त्यांचा वैयक्तिक मैलाचा दगड नाही, तर नागपूरसाठीही अभिमानाचा क्षण आहे. यावेळी डॉ. मंजुषा गिरी यांनी गर्भधारणा, पीसीओडी , मासिक पाळी अशा अनेक विषेय वर चर्चा केली. या विशेष मुलाखतीत आजकाल कमी वयातच अनेकींना पीसीओडीचा त्रास होताना दिसतो. या आजाराचे प्रमाण खूप वाढलेले दिसत आहे. हा त्रास कोणत्या कारणांमुळे होतो ते जाणून घेऊया.
पीसीओडीमध्ये जीवनशैलीत बदल करणे, सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आहारात संपूर्ण धान्य, भाज्या, फळे आणि प्रथिनांचा समावेश करावा, तर प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर आणि चरबीयुक्त अन्न टाळावे. वजन कमी करणे, पुरेशी झोप घेणे आणि तणाव कमी करणे यामुळे पीसीओडीची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
PCOD हा इन्सुलिन आणि एन्ड्रोजनच्या वाढलेल्या पातळीमुळे होत असल्याने, आहारात या हार्मोन्सचं उत्पादन कमी करणाऱ्या गोष्टींचा समावेश असावा. अशा गोष्टीदेखील खाल्ल्या पाहिजेत ज्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेन हार्मोन्सचे उत्पादन वाढू शकतं.प्रत्येक व्यक्तीने तंतुमय पदार्थ खाल्ले पाहिजेत. तंतुमय पदार्थाने युक्त असलेलं अन्न इन्सुलिन नियंत्रित करण्यात मदत करतं, म्हणून तंतुमय पदार्थयुक्त अन्न खा.
बहुतेक मुलींना वयाच्या ९ ते १५ वर्षांच्या दरम्यान पहिली मासिक पाळी येते, ज्याचा सरासरी वया 12 ते 13 वर्षे असते. याला मेनार्चे असे म्हणतात. तथापि, हे वय प्रत्येक मुलीसाठी वेगळे असू शकते, कारण काही मुलींना लवकर तर काही मुलींना उशिरा पाळी येऊ शकते.
मासिक पाळी सुरू होण्याची चिन्हे: स्तन विकसित होणे, शरीरातील इतर बदल आणि योनीमार्गातील स्त्राव आहे. पण वयाच्या 9 वर्षाच्या आधीच मासिक पाळी येत असेल तर डॉक्टरांशी नक्कीच संपर्क केला पाहिजे, कारण 9 वर्षाच्या आधी मासिक पाळी येणं हे असामान्य आहे. वेळेआधीच मासिक पाळी येण्यामध्येही दोन प्रकार आढळतात. मासिक पाळी येण्याआधी मुलींच्या शरीरात नैसर्गिक असे जैविक बदल होतात. या बदलांना सुरुवात होते ती हार्मोनल बदलांनी. हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं मुलींमध्ये स्तनांची वाढ होण्यास सुरुवात होते.
वयाच्या 25 ते 30 या वयात पहिलं बाळ झालं पाहिजे. त्यानंतर 3 वर्षाच्या अंतरानंतर दुसरा बाळाचा विचार करू शकता. यासाठी नियमित मासिक पाळी असलेल्या महिलांसाठी, ओव्हुलेशनचा काळ साधारणपणे मासिक पाळीच्या 14 व्या दिवशी येतो, त्यामुळे मासिक पाळीनंतरचे काही दिवस आणि ओव्हुलेशनचा दिवस महत्त्वाचा असतो. तुमच्या प्रजननक्षमतेचा कालावधी समजून घेण्यासाठी ओव्हुलेशन कॅलेंडर किंवा इतर पद्धती वापरता येतात.
जेवताना आजकाल घरोघरी लहान मुलांना टिव्ही किंवा मोबाइल पाहायची सवय आहे. त्याशिवाय मुलं एक घासही खात नाहीत. ही सवय फार घातक आहे. टीव्ही किंवा मोबाइल पाहताना लक्ष संपूर्णपणे दुसरीकडे जातं. त्यामुळे आपण किती खात आहोत, काय खात आहोत याचं भान राहत नाही. अनेक वेळा गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं किंवा अन्न नीट चावून न खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात.
तसेच जेवताना सर्व संवेदना जागृत राहिल्या पाहिजेत, जेणेकरून मुलांना जेवणाची चव, पदार्थाची ओळख, जेवणाचा सुगंध,पोट भरलयं आहे का याची जाणीव होते. मोबाईल स्क्रीनमुळे ब्रेन काम नाही करत. या सवयीमुळे लठ्ठपणा, अपचन, अॅसिडिटी यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं. लहान मुलांच्या बाबतीत ही समस्या आणखी गंभीर ठरते. मुलं अन्नाकडे दुर्लक्ष करतात, आणि फक्त स्क्रीन समोर असल्यावरच खाण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या भुकेची नैसर्गिक भावना कमी होते. शिवाय, स्क्रीनच्या सततच्या संपर्कामुळे डोळ्यांचे आजार, झोपेच्या समस्या, चिडचिड, संवादक्षमता कमी होणे अशा अनेक मानसिक आणि शारीरिक त्रासांना ते तोंड द्यावे लागते.
जेव्हा तुम्ही जास्त हालचाल किंवा उष्ण हवामानात असता तेव्हा दररोज तीन लिटर पाण्याचे सेवन केल्याने हायड्रेशन वाढू शकते. यामुळे टेम्परेचर रेग्युलेशन, सांधे आणि पोषक तत्वांच्या ट्रान्सपोर्टेशन यासारख्या शारीरिक कार्यांना फायदा होतो.पुरुषांसाठी सुमारे ३.७ लिटर आणि महिलांसाठी २.७ लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जात असली तरीही शरीराच्या वजन, हवामान आणि ॲक्टिव्हिटीजनुसार पाणी पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. म्हणूनच प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी अंदाजे ३०-३५ मिलीलीटर पाणी पिणे योग्य आहे.