Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr Narendra Dabholkar death anniversary: आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २० ऑगस्टचा इतिहास..

Dr Narendra Dabholkar death anniversary : आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन आहे. त्याचबरोबर, जागतिक आणि भारतीय इतिहासातील आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, प्रसिद्ध व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू यांबद्दलची सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 20, 2026 | 09:47 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dr Narendra Dabholkar death anniversary:  आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन आहे. ते एक प्रख्यात भारतीय डॉक्टर, समाजवादी कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारवंत होते. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

त्यांनी १९८९ मध्ये ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची’ (अंनिस) स्थापना केली आणि बुवाबाजी, जादूटोणा, अमानुष प्रथा व अंधश्रद्धांविरुद्ध लढा दिला. त्यांनी महाराष्ट्र शासनाला ‘जादूटोणा विरोधी कायदा’ करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या याच विचारांमुळे आणि कार्यामुळे २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीविरोधी त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे ते महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक इतिहासात कायम स्मरणात राहतील.

२० ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1666 : छत्रपती शिवाजी राजाने दख्खनमध्ये प्रवेश करण्यासाठी बनावट कागदपत्रांसह ठाणे येथील नरवीर घाटी पार केली.
  • 1828 : राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
  • 1897 : सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
  • 1914 : पहिले महायुद्ध – जर्मन सैन्याने ब्रुसेल्स शहर ताब्यात घेतले.
  • 1920 : जगातील पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेशन 8MK (आताचे WWJ) डेट्रॉईट, मिशिगन येथे उघडले.
  • 1920 : नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भूमिगत चळवळ चिरडण्यासाठी जर्मन लोकांनी एका दिवसात 50,000 नागरिकांना अटक केली.
  • 1953 : सोव्हिएत युनियनने कबूल केले की त्यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
  • 1960 : सेनेगलने मालीपासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1977 : व्हॉयेजर 1 चे प्रक्षेपण.
  • 1988 : 8 वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली.
  • 1991 : एस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र घोषित केले.
  • 1992 : भारतात, मीतेई भाषा (अधिकृतपणे मणिपुरी भाषा म्हणून ओळखली जाते) अनुसूचित भाषांच्या यादीत समाविष्ट केली गेली आणि भारत सरकारच्या अधिकृत भाषांपैकी एक बनली.
  • 1995 : फिरोजाबाद रेल्वे अपघातात 258 ठार.
  • 2008 : कुस्तीपटू सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.
Courses After Retirement: रिटायरमेंटनंतर घरी बसून कंटाळलात का? मग ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात तुमच्यासाठी फायदेशीर!

२० ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1779 : ‘जेकब बर्झेलिअस’ – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑगस्ट 1848)
  • 1833 : ‘बेंजामिन हॅरिसन’ – अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1901)
  • 1896 : ‘गोस्त पाल’ – भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 1976)
  • 1940 : ‘रेक्स सेलर्स’ – भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर यांचा जन्म.
  • 1941 : ‘स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया’ – युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 11 मार्च 2006)
  • 1944 : ‘राजीव गांधी’ – भारताचे 6वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान  यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू : 21 मे 1991)
  • 1946 : ‘एन. आर. नारायण मूर्ती’ – इन्फोसिस चे सहसंस्थापक  यांचा जन्म.
  • 1986 : ‘तनिया सचदेव’ – भारतीय बुद्धिबळपटू यांचा जन्म.
  • 1987 : ‘झाकीर खान’ – भारतीय स्टँड-अप कॉमेडियन, लेखक, कवी, प्रस्तुतकर्ता आणि अभिनेता यांचा जन्म.
Aditya Education: आदित्य शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन साजरा; सुभाषचंद्र सारडा यांनी विद्यार्थ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

२० ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1939 : ‘एग्नेस गिबर्ने’ – भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1845)
  • 1984 : ‘रघुवीर भोपळे’ – सुप्रसिद्ध जादूगार यांचे निधन. (जन्म : 24 मे 1924)
  • 1985 : ‘हरचंदसिंग लोंगोवाल’ – अकाली दलाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 जानेवारी 1932)
  • 1988 : ‘माधवराव शिंदे’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक यांचे निधन.
  • 1997 : ‘प्रागजी डोस्सा’ – गुजराथी नाटककार लेखक यांचे निधन. (जन्म : 7 ऑक्टोबर 1907)
  • 2000 : ‘प्राणलाल मेहता’ – चित्रपट निर्माते यांचे निधन.
  • 2001 : ‘एम. आर. यार्दी’ – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष यांचे निधन.
  • 2011 : ‘राम शरण शर्मा’ – भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1919)
  • 2013 : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर’ – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक यांचे निधन.
  • 2013 : ‘जयंत साळगावकर’ – ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1929)
  • 2014 : ‘बी. के. अय्यंगार’ – भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1918)

Web Title: Dr narendra dabholkar death anniversary 20 august history marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh
  • narendra dabholkar murder case

संबंधित बातम्या

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..
1

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..

5 ऑक्टोबरला का साजरा केला जातो World Teachers Day? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि डिजिटल युगातील शिक्षकांचे स्थान
2

5 ऑक्टोबरला का साजरा केला जातो World Teachers Day? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि डिजिटल युगातील शिक्षकांचे स्थान

No Disposable Cup Day : कॅफे आणि टी-स्टॉलवर स्वतःचा कप वापरल्यास काय होतात फायदे? वाचा ‘हा’ विशेष लेख
3

No Disposable Cup Day : कॅफे आणि टी-स्टॉलवर स्वतःचा कप वापरल्यास काय होतात फायदे? वाचा ‘हा’ विशेष लेख

World Animal Day : ‘हेनरिक झिमरमन ते संत फ्रान्सिस…’ जाणून घ्या कसा सुरू झाला जागतिक प्राणी दिनाचा रंजक प्रवास?
4

World Animal Day : ‘हेनरिक झिमरमन ते संत फ्रान्सिस…’ जाणून घ्या कसा सुरू झाला जागतिक प्राणी दिनाचा रंजक प्रवास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.