Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineer’s Day: भारताच्या पहिल्या सिव्हिल इंजिनिअरला समर्पित आहे ‘हा’ खास दिवस; जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

Sir M. Visvesvaraya : राष्ट्रीय अभियंता दिन हा भारताचे पहिले सिव्हिल इंजिनियर म्हणून ओळखले जाणारे एम विश्वेश्वरय्या यांना समर्पित आहे. दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 15, 2025 | 11:30 AM
Engineer’s Day Honoring India’s first civil engineer Sir M. Visvesvaraya

Engineer’s Day Honoring India’s first civil engineer Sir M. Visvesvaraya

Follow Us
Close
Follow Us:
  • १५ सप्टेंबरला राष्ट्रीय अभियंता दिन भारताचे पहिले सिव्हिल इंजिनिअर सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
  • कृष्णराजसागर धरण, म्हैसूर विद्यापीठ, बँक ऑफ म्हैसूरसह अनेक विकासकामे त्यांच्या दूरदृष्टीतून घडून आली.
  • भारतरत्न पुरस्काराने सन्मानित, १०० वर्षांहून अधिक काळ सक्रिय राहणारे सर एमव्ही आजही अभियंत्यांसाठी प्रेरणास्थान आहेत.

Engineers Day 2025 : भारतात अभियंते हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार मानले जातात. आपले जीवन सुकर करण्यासाठी, देशाला आधुनिकतेकडे नेण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधण्यासाठी अभियंत्यांचे योगदान अमूल्य आहे. म्हणूनच दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले सिव्हिल इंजिनिअर आणि महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Sir M. Visvesvaraya) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

 सर एम. व्ही. कोण होते?

१५ सप्टेंबर १८६० रोजी कर्नाटकातील चिक्काबल्लापूर या छोट्याशा गावात एका तेलुगू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची जिद्द असल्याने त्यांनी पुण्यातील सायन्स कॉलेजमधून १८८३ मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर सरकारी सेवेत प्रवेश करून त्यांनी अभियंता म्हणून काम सुरू केले.

Tributes to Bharat Ratna Dr. M. Visvesvaraya on his birth anniversary. On the occasion of #EngineersDay2025, we salute the innovative spirit of our engineers whose brilliance fuels innovation, strengthens defence, and steers India towards self-reliance. pic.twitter.com/xHnUsmxZI2 — DRDO (@DRDO_India) September 15, 2025

credit : social media

म्हैसूरचे दिवाण आणि विकासाचे शिल्पकार

१९१२ ते १९१८ दरम्यान सर एमव्ही यांनी म्हैसूर संस्थानचे दिवाण (पंतप्रधान) म्हणून काम पाहिले. त्या काळात म्हैसूर प्रदेशाचा चेहरामोहरा पूर्ण बदलून गेला.

  • कृष्णराजसागर धरणाची उभारणी करून त्यांनी शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले.
  • भद्रावती पोलाद कारखाना, चंदन तेल व साबण कारखाना उभारून औद्योगिक प्रगतीस चालना दिली.
  • म्हैसूर विद्यापीठ आणि बँक ऑफ म्हैसूर स्थापून शिक्षण व वित्तीय विकास घडवून आणला.

या योगदानामुळे त्यांना “कर्नाटकचे भगीरथ” असे म्हटले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Day of Democracy : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

 अभिनव कल्पना आणि जागतिक योगदान

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश सरकारने सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी समिती नेमली असता, सर एमव्ही यांनी धरणातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी स्टीलचे खास दरवाजे तयार केले. त्यांचे हे तंत्रज्ञान इतके प्रभावी ठरले की आजही जगभर वापरले जाते. याशिवाय, मुसा आणि इसा नद्यांच्या पाण्याचे नियोजन करून त्यांनी सिंचनाच्या समस्या सोडवल्या.

 शिक्षणासाठी असामान्य योगदान

ते निरक्षरतेला गरिबीचे मूळ कारण मानत. म्हणूनच दिवाण असताना त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी सुधारणा घडवून आणली.

  • शाळांची संख्या ४,५०० वरून थेट १०,५०० केली.
  • मुलींसाठी वसतिगृह व महाराणी कॉलेज सुरू केले.
  • म्हैसूर विद्यापीठाची स्थापना करून उच्च शिक्षणाला नवी दिशा दिली.

 भारतरत्न आणि दीर्घायुष्याचा रहस्य

१९५५ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. ते १०० वर्षांपेक्षा जास्त जगले आणि शेवटपर्यंत सक्रिय राहिले. एका मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारले गेले की “आपण इतके सक्रिय कसे राहता?”, त्यावर ते हसून म्हणाले “जेव्हा जेव्हा वृद्धापकाळ माझ्या दारावर ठोठावतो, तेव्हा मी सांगतो विश्वेश्वरय्या घरी नाही. त्यामुळे तो निराश होऊन परत जातो.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस

आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान

आज अभियंता दिन साजरा करण्यामागे उद्देश हाच की, अभियंते केवळ तंत्रज्ञ नाहीत तर राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार आहेत. सर एमव्ही यांचे कार्य आपल्याला सांगते की दूरदृष्टी, कष्ट आणि जिद्द असेल तर विकासाची कोणतीही उंची गाठता येते.

Web Title: Engineers day honoring indias first civil engineer sir m visvesvaraya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • day history
  • National Engineers Day
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास
1

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास

फोन उचलताच Hello का बोललं जात? उत्तर ऐकाल तर विश्वासच बसणार नाही
2

फोन उचलताच Hello का बोललं जात? उत्तर ऐकाल तर विश्वासच बसणार नाही

Boxing Day: नोकरांना दिल्या जाणाऱ्या ‘बॉक्स’वरून पडलं नाव; तुम्हाला ठाऊक आहे का? ख्रिसमस नंतरच्या ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास
3

Boxing Day: नोकरांना दिल्या जाणाऱ्या ‘बॉक्स’वरून पडलं नाव; तुम्हाला ठाऊक आहे का? ख्रिसमस नंतरच्या ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास

Christmas 2025:  केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस
4

Christmas 2025: केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.