4 वर्षात 4 सत्ताबदल कसे झाले (फोटो सौजन्य - ANI)
भारताचा शेजारी देश नेपाळ सध्या Gen Z च्या आंदोलनाने जळत आहे. संपूर्ण Gen Z रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. धोकादायक निषेधांमुळे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना तडकाफडकरी राजीनामा द्यावा लागला. निदर्शकांनी माजी पंतप्रधान देउबा यांच्यासह सरकारी मंत्र्यांचा आणि नेत्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली आहे.
पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे नेपाळमध्ये सरकारी सत्तापालट झाला आहे. निदर्शकांनी राष्ट्रपती भवनाला आग लावली आणि सगळीकडे जाळपोळ केल्याचेही आता समोर आले आहे. त्यांनी तेथे ठेवलेल्या मौल्यवान वस्तू लुटल्या. मात्र गेल्या चार वर्षांत भारताच्या चार शेजारी देशांमध्ये सत्तेचा पलटवार झाला आहे, याचे नक्की कारण काय आहे आपण समजून घेऊया
१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तानात तालिबानने झपाट्याने अफगाण सरकार ताब्यात घेतले तेव्हा एक सत्तापालट झाला. तालिबानने रस्त्यावर उघडपणे गोळीबार करून हा सत्तापालट घडवून आणला. तालिबानने राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसून मौल्यवान वस्तू लुटल्या. सरकारी निवासस्थानात खूप गोंधळ उडाला. अफगाणिस्तानमधील सत्तापालट अमेरिकन सैन्याच्या माघारीने सुरू झाला.
Nepal News : नेपाळ चीनमध्ये छापून घेतो आपली currency; जाणून घ्या काय आहे यामागचं रंजक कारण?
अफगाणिस्ताननंतर, भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत सत्तापालट झाला. श्रीलंकेत, ९ जुलै २०२२ रोजी लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले. हे सर्व आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले आणि यावेळी खूप गोंधळ झाला. जोरदार निदर्शनांनंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना पायउतार व्हावे लागले. गेल्या चार वर्षामधील ही दुसरी घटना घडली.
भ्रष्टाचार आणि महागाईविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले होते. हा लष्करी सत्तापालट नव्हता, तर ‘अरगलय’ (संघर्ष) चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनतेच्या मोठ्या बंडाचा परिणाम होता. आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि महागाईविरुद्ध लाखो नागरिकांनी केलेल्या निदर्शनांनी सरकार पाडले, ज्यामुळे अनुरा कुमार दिसानायके यांची नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
गेल्या वर्षी बांगलादेशात सत्तापालट झाला. ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. निदर्शकांनी पंतप्रधान भवनाच्या गणभवनात प्रवेश केला. घाईघाईत तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना ढाका सोडून भारतात यावे लागले. निदर्शकांनी पंतप्रधान भवनातील मौल्यवान वस्तू लुटल्या. तेथे खूप गोंधळ झाला.
हसीनांनी राजीनामा देताच अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली. बांगलादेशच्या इतिहासासाठी हा सत्तापालट खूप महत्त्वाचा होता. जिथे अवामी लीग या पक्षाचे अस्तित्व संपले आहे. १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या हसीनाचे सरकार जनआंदोलनाने उलथवून टाकले. पंतप्रधानांनी देश सोडताच, लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी राष्ट्राला संबोधित केले आणि हसीनाच्या राजीनाम्याची पुष्टी केली आणि सांगितले की देशात अंतरिम सरकार स्थापन केले जाईल.
Nepal Crisis : नेपाळमधील अराजकतेच्या मागे अमेरिकेचा हात? राजकीय नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
दरम्यान गेल्या २ दिवसांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या Gen Z च्या आंदोलनामुळे नेपाळच्या पंतप्रधानांना राजीनामा देत पायउतार व्हावे लागले आहे. प्रचंड प्रमाणात जाळपोळ आणि दंगल याठिकाणी घडली असून सध्या केवळ नेपाळचीच सगळीकडे चर्चा चालू आहे
अशाप्रकारे, गेल्या चार वर्षांत भारताच्या चार शेजारील देशांमध्ये सत्तापालट झाले आहेत. अफगाणिस्तानात तालिबानला विरोध दिसून आला तेव्हा नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि काही दिवसांच्या निदर्शने आणि जाळपोळीनंतर सरकारला पायउतार व्हावे लागले आहे.