Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Crises:’ जमाव माझ्या मागे लागला..’.; भारतीय महिलेने सांगितले नेपाळमधले भयावह वास्तव, पाहा Video

या सगळ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या एका भारतीय महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. महिलेने एक व्हिडीओच्या माध्यमातून नेपाळमधील परिस्थिती सांगितली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 10, 2025 | 02:17 PM
Nepal Crises:

Nepal Crises:

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळ हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे
  • भारतीय महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली मदतीची याचना
  • आणखीही लोक अडकले आहेत

Nepal Protest: गेल्या तीन-चार दिवसांपासून भारताच्या शेजारील देश नेपाळ हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया अॅप्स बंद केल्यानंतर देशात हिंसाचाराची ठिगणी पडली. सोशल मीडियावरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील ‘जेन जी’ निदर्शन सुरू झाले. आंदोलकांनी अनेक मंत्र्यांचा पाठलाग केला, मंत्र्यांना, आमदार, खासदारांना मारहाण करण्यात आली. आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली. नेपाळच्या तीन प्रमुख तुरुंगांमधून कैदीही पळून गेले. निदर्शकांनी माजी गृहमंत्री रवी लामिछाने यांची काठमांडूच्या नाखू तुरुंगातून सुटका केली. नेपाळी लष्कराकडूनही देशातील नागरिकांना हिंसाचार थांबवून शांतता आणि संवादाचे आवाहन करण्यात आले.

या सगळ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या एका भारतीय महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. महिलेने एक व्हिडीओच्या माध्यमातून नेपाळमधील परिस्थिती सांगितली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिलेने सांगितले की, ” माझे नाव उपासना गिल आहे आणि मी हा व्हिडिओ प्रफुल्ल गर्गला पाठवत आहे. मी भारतीय दूतावासाला विनंती करते की कृपया आम्हाला मदत करा. जो कोणी आम्हाला मदत करू शकेल त्याने कृपया मदत करा. नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला पोहचला आहे. मी राहत असलेल्या हॉटलेला आंदोलकांनी आग लावली. त्यावेळी मी स्पा मध्ये होते. आंदोलकांचा जमाव माझ्या मागे काठ्या घेऊन लागला होता. ज्यामुळे मी जीव मुठीत धरून पळू लागले.

Nepal Protest : ‘लाठ्या-काठ्या घेऊन पळत होता जमाव…’; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकाने सांगितला हिंसाचाराचा थरार

‘लोक मोठ्या काठ्या घेऊन माझ्या मागे धावत होते’

महिलेने सांगितले की, ‘ मी येथे नेपाळमधील पोखरामध्ये अडकले आहे. मी येथे व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्यासाठी आले होते. मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते. ते जळून खाक झाले. माझे सर्व सामान माझ्या खोलीत होते. आंदोलकांच्या जमावाने संपूर्ण हॉटेलला आग लागली. मी एका स्पामध्ये होते. लोक मोठ्या काठ्या घेऊन माझ्या मागे धावत होते. पण मी तिथून पळ काढत कसाबसा माझा जीव वाचवला.”

‘माझ्यासोबत इथे बरेच लोक अडकले आहेत’

उपासना गिलच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी पर्यटकांनाही सोडले नाही. इथली परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली आहे. सर्वत्र रस्ते पेटवले जात आहेत. कोणी पर्यटक असो वा कोणी कामानिमित्त तिथे गेलेला असो, आंदोलकांना कशाचीही पर्वा नाही. ते विचार न करता सर्वत्र आग लावत आहेत आणि येथील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. आम्हाला माहित नाही की आम्ही किती काळ दुसऱ्या हॉटेलमध्ये राहणार आहोत, परंतु मी फक्त विनंती करते की कृपया हा व्हिडिओ, हा संदेश भारतीय दूतावासाला पाठवा. मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की कृपया आम्हाला मदत करा. माझ्यासोबत येथे बरेच लोक आहेत आणि आम्ही सर्व येथे अडकलो आहोत.

WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL

परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी सल्लागार जारी केला आहे. त्यानुसार, नेपाळमधील भारतीय नागरिकांनी स्थानिक सुरक्षा यंत्रणांकडून तसेच काठमांडूमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही मदतीसाठी काठमांडूमधील भारतीय दूतावासाच्या खालील हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल :

📞 977 – 980 860 2881 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)

📞 977 – 981 032 6134 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)

Web Title: Nepal crises a mob of protesters followed me indian woman tells the horrifying reality in nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • international politics

संबंधित बातम्या

धक्कादायक! नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांदरम्यान Gen Z तरुण डान्स रिल बनवताना; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…
1

धक्कादायक! नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांदरम्यान Gen Z तरुण डान्स रिल बनवताना; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

Nepal Protest : ‘लाठ्या-काठ्या घेऊन पळत होता जमाव…’; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकाने सांगितला हिंसाचाराचा थरार
2

Nepal Protest : ‘लाठ्या-काठ्या घेऊन पळत होता जमाव…’; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकाने सांगितला हिंसाचाराचा थरार

PutinXiHotMic : माणूस अमर होणार? पुतिन-जिनपिंग मानवाला 150 वर्षे जिवंत ठेवणार, जाणून घ्या कसे
3

PutinXiHotMic : माणूस अमर होणार? पुतिन-जिनपिंग मानवाला 150 वर्षे जिवंत ठेवणार, जाणून घ्या कसे

डोनाल्ड ट्रम्प यांना काही झालेच तर चिंता नसावी…; जेडी व्हान्स यांच्या अध्यक्षपदाची धुरा असावी…
4

डोनाल्ड ट्रम्प यांना काही झालेच तर चिंता नसावी…; जेडी व्हान्स यांच्या अध्यक्षपदाची धुरा असावी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.