Six Thousand Prisoners escape from Nepal jail taking advantage of violent protests
Nepal Violence : काठमांडू : नेपाळमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लष्कराने सूत्रे हाती घेतली आहेत, परंतु अद्यापही निदर्शने थांबलेली नाहीत. या हिंसक निरदर्शनांमध्ये आतापर्यंत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. याच वेळी हिंसक निदर्शनांच्या संधीचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार झाले आहेत. तसेच या कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरुन देशात घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. यामुळे सीमेवर हाय अलर्ट देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या तुरुंगातून सुमारे ६ हजार कैद्यांनी पलायने केले आहे. यातील काही कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरुन घुसखोरी करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे सध्या भारतीय लष्कर हाय अलर्टवर आहे. भारताने सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. यामुळे नेपाळच्या कैद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
सध्या या कैद्यांना अकट करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ कैद्यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या सीमेवरील सशस्त्र दलाने कैद्यांना अटक केली आहे. SSB ने अटक केलेल्या कैद्यांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, नेपाळमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कैद्यांना नेपाळमध्ये राहयाचे नाही. यामुळे त्यांनी भारताकडे धाव घेतली. नेपाळचे कैदी भारतीय तुरुंगातही राहायला तयार आहेत.
The Sashastra Seema Bal (SSB) has apprehended five inmates who had escaped from a jail in Nepal while they were attempting to cross into India. The arrests were made along the India-Nepal border in Siddharthnagar area, and the prisoners were subsequently handed over to the police…
— ANI (@ANI) September 10, 2025
सध्या या कैद्यांना भारतात घुसखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या त्यांची पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. सिद्धार्थनगर परिसरातील भारत-नेपाळ सीमेवरुन या कैद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांना पकडण्यात आले.
नेपाळमध्ये का सुरु आहे हिंसाचार?
नेपाळमध्ये सध्या ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरोधात, तसेच भ्रष्टाचार आणि नेपोटिझम विरोधात हिंसाचार उफाळला आहे.
आतापर्यंत हिसाचारात किती जीवितहानी?
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सरकारविरोधात हिंसाचार सुरु असून गेल्या दोन दिवसांत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहे.
नेपाळमध्ये कोण करत आहे आंदोलन?
नेपाळमध्ये सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी विरोधात जनरेशन झेडच्या तरुणांनी निदर्शने सुरु केली आहेत.