Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : साहित्य क्षेत्रात ध्रुवपद मिळवणारे रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 07 ऑगस्टचा इतिहास

साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने रवींद्रनाथ टागोर यांना सन्मानित केले आहे. नोबेल मिळणारे हे पहिले भारतीय आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली साहित्य आणि संगीताला नवी दिशा दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 07, 2025 | 10:51 AM
First Indian to win the Nobel Prize in Literature Rabindranath Tagore death anniversary 07 August 

First Indian to win the Nobel Prize in Literature Rabindranath Tagore death anniversary 07 August 

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्य क्षेत्रामध्ये एक धुव्रपद मिळवले आहे. साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले आहे. नोबेल मिळणारे हे पहिले भारतीय आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली साहित्य आणि संगीताला नवी दिशा दिली. टागोर यांनी कविता, लघुकथा, नाटके, कादंबऱ्या, निबंध आणि गाणी यांसारख्या विविध साहित्य प्रकारात लेखन केले. त्यांची ‘गीतांजली’ ही प्रसिद्ध साहित्यकृती आहे, ज्यासाठीच त्यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांग्ला’ हे देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिले आहे. आजच्या दिवशी 07 ऑगस्ट रोजी 1941 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

07 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1789 : यूएस सरकारच्या युद्ध विभागाची स्थापना झाली.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्य पॅसिफिक महासागरातील ग्वाडालकॅनल कालव्यावर उतरले आणि द्वितीय विश्वयुद्धातील सर्वात भयंकर लढाई खेळली गेली. या घटनेपासून जपानची माघार सुरू झाली.
  • 1947 : मुंबई महानगरपालिकेने बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी ताब्यात घेतली.
  • 1947 : थोर हेयरडाहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोन टिकी नावाच्या बाल्सा वुड राफ्टमधून 101 दिवसांत प्रशांत महासागर ओलांडून 7,000 किमी प्रवास केला.
  • 1981 : वॉशिंग्टन स्टार वृत्तपत्र सलग 128 वर्षांच्या प्रकाशनानंतर बंद झाले.
  • 1985 : ताकाओ डोई, मोमोरू मोहोरी आणि चिकी मुकाई यांची जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून निवड झाली.
  • 1987 : लिन कॉक्स अमेरिकेतून सोव्हिएत युनियनमध्ये पोहणारी पहिली व्यक्ती ठरली.
  • 1990 : आखाती युद्धासाठी अमेरिकेचे पहिले सैन्य सौदी अरेबियात आले.
  • 1991 : पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • 1997 : चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावावर असलेला व्हिटोरियो डी सिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2000 : ब्रिटीश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संकल्प मोडवालने नऊ वर्षांखालील गटात संयुक्त विजेतेपद पटकावले.
  • 2020 : एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1344 ने भारतातील केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी ओव्हरशूट केली आणि क्रॅश झाला, त्यात 190 पैकी 21 जणांचा मृत्यू झाला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

07 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1702 : ‘नसीरुद्दीन मुहम्मद शाह’ – मुघल सम्राट जन्म
  • 1871 : ‘अवनींद्रनाथ टागोर’ – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका यांचा जन्म. (मृत्यू : 5 डिसेंबर 1951)
  • 1876 : ‘माता हारी’ – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1917)
  • 1912 : ‘केशवराव कृष्णराव दाते’ – हृदयरोगतज्ञ यांचा जन्म.
  • 1925 : ‘एम. एस. स्वामीनाथन’ – पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री यांचा जन्म.
  • 1935 : ‘राजमोहन गांधी’ – भारतीय चरित्रकार, इतिहासकार, महात्मा गांधींचे नातू यांचा जन्म.
  • 1936 : ‘डॉ. आनंद कर्वे’ – दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते यांचा जन्म.
  • 1948 : ‘ग्रेग चॅपेल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1966 : ‘जिमी वेल्स’ – विकिपीडियाचे सह-संस्थापक यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

07 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1934 : ‘जोसेफ मॅरी जाकॉर्ड’ – जॅक्वार्ड लूम चे शोधक यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1752)
  • 1848 : ‘जेकब बर्झेलिअस’ – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 ऑगस्ट 1779)
  • 1941 : ‘रवींद्रनाथ टागोर’ – भारतीय कवी, शिक्षणतज्ञ, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म : 7 मे 1861)
  • 1974 : ‘अंजनीबाई मालपेकर’ – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन.
  • 2018 : ‘एम.करुणानिधी’ – तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष यांचे निधन.

Web Title: First indian to win the nobel prize in literature rabindranath tagore death anniversary 07 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास
1

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास
2

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास
3

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास

जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन; जाणून घ्या 25 सप्टेंबरचा इतिहास
4

जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन; जाणून घ्या 25 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.