Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सव 2024 : मुठा नदीच्या पात्रामध्ये सापडलेला; मातीचा गणपती

पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक गणपती मंदिर आहेत. त्यातील एक म्हणजे माती गणपती मंदिर. येथील गणरायाची मूर्ती मातीची असल्यामुळे आणि नदीच्या पात्रामध्ये सापडल्यामुळे या गणपतीला माती गणपती हेच नाव पडले. पेशवाईच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 13, 2024 | 10:46 AM
pune maticha ganapati

pune maticha ganapati

Follow Us
Close
Follow Us:

प्रिती माने : पुणे शहर मुठा नदीच्या तिरावर वसले आहे. आता नदीचे आणि शहराचे रुपडे पालटले असले तरी काही आठवणी आजही तशाच आहेत. मुठा नदीच्या किनाऱ्यावर ओंकारेश्वर मंदिरासारखी अनेक मंदिर वसलेली आहे. आता धरणामुळे नदीचं पात्र कमी झालं असल्यामुळे रस्ता वाढला आहे. पण पूर्वी नदीच्या किनाऱ्यावर मातीचा गणपती मंदिर होते. पुण्यातील नावाप्रमाणे मातीचाच असणारा या मातीचा गणपतीला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे.

मुठा नदीच्या किनाऱ्यावर मातीचा गणपतीचे मंदिर होते. सध्या केळकर रोडवर नारायण पेठ पोलिस चौकीच्या पुढे डाव्या बाजूला हे मातीचा गणपती मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एक जुनी दगडी दीपमाळ दिसते. ही दिपमाळ मंदिराची खूण समजू शकतो. तिथेच माती गणपतीचे सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. मंदिराला गणराय मातीचा असल्यामुळे या गणपतीला मातीचाच गणपती म्हणून ओळखले जाते. गणरायाचे निस्सिम भक्त असलेल्या मोरया गोसावी यांच्या सूचनेने लहान मुलांनी ही गणरायाची मूर्ती घडवण्यात आल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते. तसेच ही मूर्ती मुठा नदीच्या पात्रातील मातीमध्ये शिवरामपंथ श्रोत्री या गृहस्थांना सापडली असल्याचे देखील म्हटले जाते.

मातीचा गणपती मंदिर पेशवेकालीन आहे. पेशव्यांच्या काळापासून हा गणपती अस्तित्वात आहे. या मंदिराचा उल्लेख पेशवाईत देखील मिळतो. सवाई माधवराव पेशव्यांच्या जन्मानंतर पुण्याच्या अनेक देवळांमध्ये दक्षिणा ठेवल्या गेल्या तेव्हा याही मंदिराला दक्षिणा देण्यात आली होती. आता मंदिराचे स्वरुप पक्के असून मंदिराला सभागृह, मंडप आणि गाभार आहे. पूर्वी मात्र मातीचा गणपती मंदिर कौलारु होते. शिवरामपंथ श्रोत्री यांना मूर्ती सापडल्यानंतर त्यांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आताही मंदिराचा मालकी हक्क श्रोत्री कुटुंबाकडेच आहे. या मंदिराला पानशेतच्या पुराचा फटका बसला होता. मंदिराच्या कळसापर्यंत पाणी शिरले होते. मात्र मंदिरातील मूर्ती मातीची असून देखील मूर्तीला काहीच झाले नव्हते.

मातीच्या गणरायाची ही सुंदर मूर्ती मातीच आहे. त्यावर शेंदूर लेपन केलेले आहे. गणरायाची ही चतुर्भूज मूर्ती साधारणतः चार फुटांची आहे. गणरायाची ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये पितळी देव्हाऱ्यात स्थापन करण्यात आली आहे. गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. मूर्तीच्या वरच्या डाव्या हातात फुल असून उजवा हात अभय देणारा आहे. तर खालच्या हातात परशू आणि खालचा डावा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. याच हातावर सोंड देखील टेकली आहे. मातीचा गणपती पुण्याच्या ऐतिहासिक मंदिरांपैकी एक असून आपले वेगळेपण टिकवून आहे.

Web Title: Ganeshotsav 2024 mathicha ganesha found in mutha river bed in pune ganapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
1

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
2

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
3

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत
4

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.