HCL Foundation leads nationwide coastal cleanup drive on International Coastal Cleanup Day 2025
HCL फाऊंडेशनने आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 च्या मोहिमेचे भारतातील नेतृत्व केले.
सहाय्यक संस्था, स्थानिक समुदाय आणि स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी सुमारे लाखो किलोग्रॅम सागरी कचरा काढून टाकला.
HCL फाऊंडेशन, भारतीय तटरक्षक दल आणि THT यांची संयुक्त भागीदारी देशातील सागरी परिसंस्थांच्या संवर्धनात महत्त्वाची ठरली.
International Coastal Cleanup Day 2025 : जागतिक तंत्रज्ञान कंपनी असलेल्या HCLटेक च्या कंपनी सामाजिक जबाबदारीचा अजेंडा चालवणाऱ्या HCLफाऊंडेशन ने भारतात आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 (International Coastal Cleanup Day 2025) साजरा करण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या सहा भारतीय राज्यांमध्ये सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.
या उपक्रमामुळे स्थानिक समुदाय, HCLटेक कर्मचारी आणि भागीदार संस्थांना एकत्रित करण्यात आले, ज्यामुळे सुमारे XXX किलोग्रॅम सागरी कचरा XXX पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी काढून टाकला, ज्यामुळे भारताच्या किनारी आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी HCLफाउंडेशनची वचनबद्धता पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली.
हे देखील वाचा : Navarashtra Navdurga : “देह विकला, डान्स केला पण…”, मुंबईतील ‘कृष्ण मोहीनी’ची डोळे पाणावणारी कहाणी
या वर्षीच्या मोहिमेला अॅनिमल वेल्फेअर कन्झर्वेशन सोसायटी, रीफवॉच मरीन कन्झर्वेशन, स्पँडन, एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन, एन्व्हायर्नमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया, डेव्हलपमेंट रिसर्च कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस सेंटर, प्लॅन@टीअर्थ, गल्फ ऑफ मन्नार बायोस्फीअर रिझर्व्ह ट्रस आणि ट्री फाउंडेशन यांसारख्या आघाडीच्या पर्यावरणीय संस्थांचे सहकार्य लाभले. गेल्या चार वर्षांत, HCLफाउंडेशन आणि त्यांच्या भागीदारांनी भारताच्या सागरी किनाऱ्यावरील पाण्यातून 5,60,000 किलोग्रॅमहून अधिक मासेमारीची जाळी आणि सागरी किनाऱ्यावरील कचरा यशस्वीरित्या काढून टाकला आहे.
2024 मध्ये HCLफाउंडेशन, इंडियन कोस्ट गार्ड आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट (THT) यांनी भारताच्या सागरी जैवविविधतेसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली तेव्हा सागरी संवर्धनात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. ही भागीदारी देशाच्या किनारपट्टीवर प्रभावी संवर्धन प्रयत्नांना चालना देण्यासाठी वैज्ञानिक कौशल्य, कार्य करण्याची क्षमता आणि तळागाळातील सहभागाचा वापर करते.
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 रोजी, HCLफाउंडेशन, भारतीय तटरक्षक दल आणि THT यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेत भाग घेतला, ज्यामुळे सागरी संवर्धनासाठी त्यांची एकत्रित वचनबद्धता दिसून आली.
हे देखील वाचा : Shardiya Navratri: ‘याच’ पर्वतावर देवी भवानीने केला होता महिषासुराचा वध; आजही केली जाते ‘या’ ठिकाणी त्या राक्षसाची पूजा
ग्लोबल CSR, HCLटेकच्या SVP आणि HCLफाऊंडेशनच्या संचालिका डॉ. निधी पुंधिर म्हणाल्या, “सुविधाजनक आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयात पर्यावरणीय शाश्वतता केंद्रस्थानी आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “आमचा सागरी किनारा स्वच्छता उपक्रम म्हणजे केवळ कचरा काढणे इतकाच मर्यादित नसून तो सामूहिक जबाबदारीला प्रोत्साहन देतो आणि पर्यावरणीय देखरेखीचा संस्कार सुद्धा निर्माण करतो. आमच्या भागीदारीद्वारे, आम्ही भारताच्या सागरी परिसंस्थांचे संवर्धन आणि पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न मजबूत करत आहोत.”