फोटो सौजन्य - Social Media
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL)मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अनेक उमेदवार या भरतीची प्रतीक्षा करत होते. अखेर या भरतीसंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी प्रतीक्षा करत असलेले उमेदवार तसेच HCL मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी लवकरच अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत जाहीर करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबर २०२४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया केवळ १९ पदांसाठी आहे. या पदांमध्ये मॅनेजर पदांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : शिका या प्रोग्रामिंग लँग्वेज; मिळेल उच्च वेतनाची नोकरी, कमवाल मोठ्या रक्कमेत
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL)द्वारे आयोजित या भरतीच्या प्रक्रियेमध्ये मॅनेजर पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवारांना दिलेल्या वेळोमर्यादेच्या आत या भरतीसाठी अर्ज करावे लागणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL)च्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL)च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. hindustancopper.com हे HCL चे अधिकृत संकेतस्थळ आहे.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL)च्या या भरती प्रक्रियेत डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर तसेच असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त जागांसाठी उमेदवार नियुक्त केला जाणार आहे. या भरतीसाठी आयोजित असलेल्या निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश आहे. असिस्टंट मॅनेजर तसेच ट्रेनी मॅनेजरच्या पदासाठी नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा दयावी लागणार आहे. तसेच त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. तसेच डेप्युटी जनरल मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार आहे.
हे देखील वाचा : भारतीय सैन्यामध्ये भरतीला सुरुवात; ९० रिक्त जागांना भरण्यासाठी उमेदवारांची नियुक्ती
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतील तसेच OBS आणि EWS आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये म्हणून अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर इतर आरक्षित प्रवर्गातील ऊमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहेत.