'These' fish have human-like teeth in their mouths only found in one place on Earth
वॉशिंग्टन, डी.सी. : अनेक वेळा काही प्राणी आणि मानव यांच्यात इतक्या गोष्टी साम्य असतात की पाहून आश्चर्य वाटते. म्हणजे माणूस आणि प्राणी यांच्या शारीरिक ठेवणीमध्ये खूप मोठा फरक आहे. परंतु कधी कधी या प्राण्यांमध्ये आपल्याला असे काही गुणधर्म पाहायला मिळतात जे तंतोतंत माणसासारखे आढळतात. नुकताच माणसासारखे दात असणारा मासा एका मासेमाराला सापडला ज्याला पाहून सगळेच थक्क झाले आहेत. जगात असा एकच मासा आहे. हा मासा वरून सामान्य माशासारखा दिसेल, पण तोंडात डोकावताच माणसासारखे दात दिसतील.हा मासा पृथ्वीवर सर्वत्र आढळत नाही, तो फक्त एकाच ठिकाणी आढळतो. आता जाणून घ्या या माशाबद्दल सविस्तर माहिती. यासोबतच हा मासा नुकताच कुठे सापडला हे देखील जाणून घ्या.
मासे कुठे सापडला?
न्यूजबाइटच्या रिपोर्टनुसार, हा मासा अमेरिकेतील सॅनफोर्डच्या लेक मेरेडिथमध्ये एका मच्छिमाराला सापडला आहे. अहवालानुसार, मच्छीमार तलावात मासेमारी करत असताना त्याच्या जाळ्यात एक मासा अडकला जो इतर माशांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या माशाचे दात माणसासारखे होते. ते पाहून त्या मासेमारालाही आश्चर्याचा धक्काच बसला.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
या माशाचे नाव काय आहे?
हा मासा पिरान्हा प्रजातीचा असल्याचे रेड्डीथ एक्वाटिक अँड वाइल्डलाइफ म्युझियमच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला स्थानिक भाषेत पाकू म्हणतात. त्याचे दात हुबेहुब माणसांसारखे आहेत. हे दात माशांना अन्न चघळण्यास मदत करतात. हा मासा सर्वत्र आढळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे फक्त दक्षिण अमेरिकेतील गोड्या पाण्याच्या तलावांमध्ये आढळते. म्हणजेच हा मासा अत्यंत दुर्मिळ आहे असेदेखील म्हणू शकतो.
हे देखील वाचा : गुजरात आहे जगातील सर्वात मोठ्या माशाचे घर; आतापर्यंत 900 शार्कला दिले जीवदान
या माशाचा आकार आणि वजन
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा मासा खूप खोलवर राहतो. त्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात तो सहजासहजी अडकत नाही. सध्या हा मासा रेड्डीथ एक्वाटिक आणि वन्यजीव संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. मात्र आता त्याला पुन्हा पाण्यात सोडण्याचा विचार केला जात आहे. असे सांगितले जात आहे की जेव्हा हा मासा पूर्ण आकारात असतो तेव्हा त्याचे वजन सुमारे 40 किलो असू शकते. म्हणजे या माशाची वाढ अत्यंत उत्तमप्रकारे होते. आणि आकारानेही तो खूप मोठा होतो. या माशाबद्दल असं म्हटलं जातं की हा मासा पहिल्यांदा 1980 मध्ये दिसला होता. मात्र, त्याच्या वेगळेपणामुळे या माशाचीही तस्करी होऊ लागली आहे. लोकांना हे मासे त्यांच्या मत्स्यालयात पाळायचे आहेत. आणि जास्त किंमत देऊन ते विकत घ्यायचे आहेत. त्यामुळे या माशाची प्रजाती धोक्यात येत आहे.