Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Switzerland Train Accident : स्वित्झर्लंडमध्ये एक बर्फवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. सोमवारी (१६ फेब्रुवारी) जोरदार बर्फवृष्टीमुळे एका ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. ही ट्रेन ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन निघाली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 05:39 PM
switzerland train accident

switzerland train accident

Follow Us
Follow Us:
  • स्वित्झर्लंडमध्ये बर्फवृष्टीचा कहर
  • जोरदार वादळामुळे ८० प्रवाशांना घेऊन जाणार ट्रेन रेल्वेरुळावरुन घसरली
  • अपघातात अनेकजण जखमी
Switzerland Train Accident News in Marathi : बर्न : स्वित्झर्लंडमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये सुरु असलेल्या वादळामुळे एक प्रवासी ट्रेन रेल्वे रुळावरुन घसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ही ट्रेन ८० प्रवाशांना घेऊन रवाना झाली होती.

थायलंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; धावत्या ट्रेनवर कोसळली भलीमोठी क्रेन, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात स्वित्झर्लंडच्या गोपेनस्टाईनजवळील स्टॉकग्राबेन परिसरात सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. स्विस रेल्वे कंपनींनी देखील या अपघाताची पुष्टी केली असून जोरदार हिमवादळामुळे रेल्वे रुळावरुन घसरली असल्याचे सांगितले जात आहे. ट्रेन सकाळी स्पीझहून ब्रिगेडियरकडे रवाना झाला होती.

मदत आणि बचाव कार्याला सुरुवात

या अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. बचाक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजेपर्यंत प्रवाशांना सुरक्षितपणे रुळावरुन घसरलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका आणि बचाव हेलिकॉप्टरही दाखल झाले होते.

सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच किरकोळ जखमी झालेल्यांना मलमपट्टीकरुन घरी पाठवण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले होते. परंतु अद्याप अधिकृत संख्या स्पष्ट झालेली नाही. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. बर्फवृष्टी आणि कठीण डोंगराळ प्रदेशा मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत होते.

अपघाताचे कारण

बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार बर्फवृष्टीमुळे रेल्वे ट्रॅकवर बर्फ जमा झाला आहे. यामुळे रेल्वे रुळावरुन घसरून अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरु आहे. तसेच रेल्वेचे डब्बे रुळावरुन हटवण्याचे कार्यही सुरु आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तवर गोपेनस्टाईन आणि ब्रिगेडियर दरम्यान रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. शिवाय ट्रॅक दुरुस्ती आणि अपघाताच्या तपासणीमुळे सध्या सेवा मंगळवार (१७ फेब्रुवारी) पर्यंत बंद राहण्याची शक्यता असल्याचे स्विस रेल्वे कंपनीने म्हटले आहे.

स्वित्झर्लंड हे तेथील रेल्वे नेटवर्क आणि त्याच्या वक्तशीरपणासाठी ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येतात. परंतु सततच्या खराब हवामानामुळे रेल्वे सेंवावर परिणाम होत राहतो. यापूर्वी २०२३ मध्ये बर्नजवळ बर्फवृष्टीमुळे २० मिनिटांत दोन ट्रेन रुळावरुन घसरल्या होता. या अपघाता १५ प्रवासी जखमी झाले होते.

Spain हादरलं! दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक, 70 हून अधिक जखमी, थरारक VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वित्झर्लंडमध्ये कुठे आणि कधी झाले रेल्वे अपघात?

    Ans: स्वित्झर्लंडमध्ये सोमवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी ७ च्या सुमारास गोपेनस्टाईनजवळील स्टॉकग्राबेन परिसरात रेल्वे अपघात झाला आहे.

  • Que: स्वित्झर्लंडमधील रेल्वे अपघातात किती जीवितहानी झाली?

    Ans: स्वित्झर्लंडमधील रेल्वे अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. परंतु अनेकजण जखमी झाले असून जखमींची संख्या सध्या अस्पष्ट आहे.

Web Title: Snowfall wreaks havoc in switzerland train carrying over 50 passengers derails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • switzerland
  • Train Accident
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.