संघ स्वयंसेवक ते देशाचे पंतप्रधान असा थक्क करणारा प्रवास
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान प्राप्त
आपल्या कार्यकाळात घेतले अनेक मोठे निर्णय
PM Narendra Modi 75th Birthday Special: मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…! भारतात 2014 साली हे शब्द ऐकायला मिळाले. अनेक वर्षांनंतर भारतात सत्ताबदल झाला होता. इतक्या वर्षांच्या कॉँग्रेसच्या सत्तेला छेद देत भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आला. तिथून आज 2025 वर्ष सुरू आहे. देशात सलग तिसऱ्यांदा भाजपप्रणीत एनडीए सरकार स्थापन झाले आहे. मात्र यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका खूप महत्वाची ठरली. आज देशाचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस (Birthday wishes to PM Narendra Modi) आहे. आज पंतप्रधान मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. गुजरातमधील वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत चहा विकत आयुष्याची सुरुवात केली. तेव्हा कोणालाही वाटले नसेल की, हाच मुलगा कधीतरी भारताचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते देशाचे यशस्वी पंतप्रधान हा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे.
सलग तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. मग ते नोटबंदी असेल, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना दिलेले चोख प्रत्युत्तर असेल, असे अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले. ज्यामुळे भारताची जगभरात लोकप्रिय प्रतिमा निर्माण झाली आहे. जगभरात भारताचा डंका वाजत आहे. योग्य पराराष्ट्रीय धोरण असेल, किंवा अर्थव्यवस्थेचे योग्य नियोजन यामुळे आज आपले भारत देश जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था असलेल्या देश बनला आहे. आज जगभरात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान आज आपण त्यांनी आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांबद्दल जाणून घेणार आहोत.
कलम 370 हटवले: गेले अनेक वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये असलेले कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतला. हा निर्णय अत्यंत धाडसी होता. कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये देखील भारताचे म्हणजे केंद्र सरकारचे अधिकारू लागू झाले. जम्मू काश्मी राज्याला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यात आला.
हा निर्णय राज्यसभेत आणि लोकसभेत मंजूर व्हावा यासाठी मोदी सरकारने याची अत्यंत नियोजनबद्ध आखणी केली होती. त्यानुसार 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्वाचा निर्णय समजला जातो. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमध्ये आमूलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहे. विकासाची अनेक कामे तेथे होत आहेत. दहशतवाद्यांना देखील योग्य धडा शिकवला जात आहे.
पाकिस्तानला शिकवला धडा: 2014 मध्ये देशात भाजपचे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. त्या आधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यातच एक महत्वाचा म्हणजे पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. उरी, पुलवामा आणि पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला पाकिस्तानने घडून आणला. त्यानंतर हा नवीन भारत आहे, घरात घुसून मारतो हे मोदी सरकारने दाखवून दिले. प्रत्येक वेळेस पाकिस्तानमध्ये घुसून शेकडो दहशतवाद्यांचा नायनाट करत चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
आयुष्मान भारत योजना: मोदी सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये आयुष्मान भारत योजनेच्या विस्ताराला मंजूरी दिली. या योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान वंदना कार्ड मिळणार आहे. 29 ऑक्टोबर 2024 मध्ये हे कार्ड लॉंच करण्यात आले. यामध्ये प्रत्येकाला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. या योजनेतून 6 कोटी लोकांना आरोग्य कव्हर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या योजनेमुळे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळाले. या योजनेतून अनेक गरीब नागरिकांना आपले उपचार करून घेता येणार आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना दिलासा देखील मिळाला आहे.