Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Hearing Day: श्रवणशक्ती ही निसर्गाची देणगी! जागतिक श्रवण दिनी जाणून घ्या कानांच्या आरोग्याची ए-बी-सी-डी

दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिन साजरा केला जातो. हा दिवस श्रवण आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि बहिरेपणा आणि कानाच्या समस्या रोखण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 02, 2026 | 09:12 AM
world hearing day 2026 ear care tips importance and prevention of hearing loss

world hearing day 2026 ear care tips importance and prevention of hearing loss

Follow Us
Follow Us:
  • आरोग्य जागरुकता
  • बहिरेपणाची वाढती कारणे
  • प्रतिबंधात्मक उपाय

World Hearing Day 2026 Marathi news : आपल्या आयुष्यातील सुंदर आवाज ऐकण्यासाठी कान हे निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट आहे. मात्र, धावपळीच्या जीवनशैलीत आपण सर्वात जास्त दुर्लक्ष कोणाकडे करत असू, तर ते म्हणजे आपल्या कानांकडे. याच संदर्भात जनजागृती करण्यासाठी आज जगभरात ‘जागतिक श्रवण दिन’ (World Hearing Day) साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २००७ मध्ये सुरू केलेला हा दिवस आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरला आहे, कारण तांत्रिक प्रगतीसोबतच आपल्या कानांना होणारा आवाजाचा धोकाही वाढला आहे.

श्रवणशक्ती ही आयुष्यभराची संपत्ती!

एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने ती गोष्ट आपण कायमची गमावू शकतो, हे श्रवणशक्तीच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. श्रवणशक्ती केवळ ऐकण्यासाठी नसून ती आपल्या सामाजिक संवादाचा, आत्मविश्वासाचा आणि मानसिक आरोग्याचा कणा आहे. श्रवण दोष असलेल्या व्यक्तींना अनेकदा एकटेपणा किंवा नैराश्याचा सामना करावा लागतो. म्हणूनच, यंदाच्या जागतिक श्रवण दिनाचे ब्रीदवाक्य “श्रवण काळजी ही सर्वांसाठी आयुष्यभराची गरज” असे ठेवण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Wildlife Day 2026: वन्यजीव संरक्षणाचा जागर! जाणून घ्या ‘जागतिक वन्यजीव दिना’चे काय आहे महत्त्व?

का बिघडतेय आपली श्रवणशक्ती?

आजच्या तरुणांमध्ये इयरफोन आणि हेडफोनचा वाढलेला अतिवापर ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरत आहे. तासनतास मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे कानाच्या आतील नाजूक पेशींना कायमची इजा होऊ शकते. याव्यतिरिक्त, कारखान्यांमधील यंत्रांचा आवाज, ट्रॅफिकचा गोंधळ, डीजेचा दणदणाट आणि फटाके यांमुळे ‘नॉईज इंड्युस्ड हियरिंग लॉस’ (NIHL) होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाढत्या वयानुसार कानाची शक्ती कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी योग्य आहार आणि काळजी घेतल्यास आपण हा धोका लांबणीवर टाकू शकतो.

World Hearing Day 2026 is fast approaching. This year’s theme is Hearing Care for All Children. Support hearing, support learning. https://t.co/6HTqgVF4Rp#Worldhearingday #hearingcare pic.twitter.com/LYWrozrz7Y — Clarity news (@Clarity_vhnews) February 24, 2026

credit – social media and Twitter

लक्षणे ओळखा, वेळीच सावध व्हा!

अनेकदा आपल्याला श्रवण दोष झाला आहे हे लक्षात येत नाही. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे बोलणे समजण्यासाठी खूप कष्ट पडत असतील, वारंवार “काय?” असे विचारावे लागत असेल किंवा कानात सतत गुंजारव (Tinnitus) होत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. लहान मुलांच्या बाबतीत, जर त्यांनी आवाजाला प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांच्या बोलण्यास उशीर होत असेल, तर पालकांनी तात्काळ ईएनटी (ENT) तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट

कशी घ्याल कानांची काळजी? (आरोग्य टिप्स)

१. आवाजाची मर्यादा पाळा: हेडफोन वापरताना आवाज ६० टक्क्यांच्या वर नेऊ नका.

२. सुरक्षित अंतर ठेवा: जिथे मोठा आवाज येत असेल तिथे कानात इयर प्लगचा वापर करा.

३. स्वच्छतेचे भान: कानात काड्या, पिना किंवा टोकदार वस्तू घालणे टाळा. यामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते.

४. संसर्गाकडे दुर्लक्ष नको: कानातून पाणी येणे किंवा दुखणे यांसारख्या समस्या असल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे जा.

५. नियमित तपासणी: विशेषतः ५० वर्षांवरील व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी श्रवण चाचणी करून घ्यावी.

आज या जागतिक श्रवण दिनानिमित्त संकल्प करूया की, आपण स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या कानांची काळजी घेऊ. लक्षात ठेवा, योग्य वेळी केलेली तपासणी तुम्हाला बहिरेपणाच्या अंधारातून वाचवू शकते!

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक श्रवण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?

    Ans: जागतिक श्रवण दिन दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

  • Que: कानांचे आरोग्य जपण्यासाठी हेडफोनचा वापर कसा करावा?

    Ans: हेडफोन वापरताना '६०-६०' नियम पाळावा; म्हणजेच ६०% पेक्षा कमी आवाज आणि सलग ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापर टाळावा.

  • Que: श्रवण समस्या होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत?

    Ans: मोठा आवाज, कानातील संसर्ग, हेडफोनचा अतिवापर, वाढते वय आणि कानात टोकदार वस्तू घालणे ही प्रमुख कारणे आहेत.

Web Title: World hearing day 2026 ear care tips importance and prevention of hearing loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

International Podcast Day: ऑडिओ कंटेंट निर्मितीतील क्रांती म्हणजे पॉडकास्ट; वाचा कसा होता ‘या’ माध्यमाचा रंजक प्रवास?
3

International Podcast Day: ऑडिओ कंटेंट निर्मितीतील क्रांती म्हणजे पॉडकास्ट; वाचा कसा होता ‘या’ माध्यमाचा रंजक प्रवास?

Translation Day : ‘या’ खास दिवशी केला जातो जगाला जवळ आणणाऱ्या ‘ज्ञानदूतांचा’ गौरव; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा रंजक इतिहास
4

Translation Day : ‘या’ खास दिवशी केला जातो जगाला जवळ आणणाऱ्या ‘ज्ञानदूतांचा’ गौरव; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.