Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

April 29 : कला आणि करुणेचा अनोखा संगम! जाणून घ्या आज ‘या’ दोन खास दिवसांचे महत्च अन् रंजक इतिहास

International Dance Day : आंतरराष्ट्रीय नृत्य दिन दरवर्षी २९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस आधुनिक बॅलेचे जनक मानले जाणारे जगप्रसिद्ध नर्तक जीन-जॉर्जेस नोव्हर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 29, 2026 | 07:58 AM
international dance day and world wish day special report april 29 importance

international dance day and world wish day special report april 29 importance

Follow Us
Close
Follow Us:
  • नृत्यातून अभिव्यक्ती
  • इच्छापूर्तीचा आनंद
  • सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व

International Dance Day 2026 : आज २९ एप्रिल! कॅलेंडरवरची ही तारीख केवळ एक दिवस नसून ती जगभरातील कलाकारांसाठी आणि मानुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी एक मोठा सण आहे. आजचा दिवस दोन अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी जगभर साजरा केला जातो. एक म्हणजे शरीराला चैतन्य देणारा ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ (International Dance Day) आणि दुसरा म्हणजे निरागस इच्छांना पंख देणारा ‘जागतिक इच्छा दिन’ (World Wish Day).

नृत्याचा उत्सव: शब्दांशिवाय व्यक्त होणारी भाषा

‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ दरवर्षी २९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाची निवड करण्यामागे एक खास कारण आहे. १८ व्या शतकातील जगप्रसिद्ध फ्रेंच नर्तक आणि आधुनिक बॅलेचे जनक मानले जाणारे जीन-जॉर्जेस नोव्हर यांची आज जयंती. त्यांच्या सन्मानार्थ १९८२ मध्ये युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेने (ITI) या दिवसाची घोषणा केली.

Dance is a timeless expression of culture, emotion and storytelling. Every movement carries meaning, every rhythm reflects passion and every performance celebrates the beauty of artistic expression. On International Dance Day, Doordarshan honours this vibrant art form that… pic.twitter.com/JdqC3K7CX5 — Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) April 29, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World IP Day: तुमच्या आयडियाची ‘चोरी’ टाळा! आज जागतिक बौद्धिक संपदा दिन; जाणून घ्या पेटंट आणि कॉपीराईटचे महत्त्व

नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही. ही एक अशी अभिव्यक्ती आहे जी भाषा, धर्म आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन थेट हृदयाशी संवाद साधते. भरतनाट्यम असो की हिप-हॉप, लावणी असो की बॅले; प्रत्येक नृत्यशैलीतून मानवी भावनांचे विविध पदर उलगडले जातात. आजच्या धावपळीच्या युगात मानवी आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी नृत्य हा एक उत्तम व्यायाम आणि ‘स्ट्रेस बस्टर’ (Stress Buster) मानला जातो. या दिवशी जगभरात विविध कार्यशाळा आणि कार्यक्रमांतून नृत्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातो.

जागतिक इच्छा दिन: चिमुकल्यांच्या स्वप्नांना बळ

२९ एप्रिलचे दुसरे महत्त्व म्हणजे ‘जागतिक इच्छा दिन’. गंभीर आणि असाध्य आजारांशी लढा देणाऱ्या मुलांच्या मनात अनेक इच्छा असतात, ज्या पूर्ण होणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसते. ‘मेक-अ-विश फाउंडेशन’ (Make-A-Wish Foundation) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो.

या दिवसाची सुरुवात १९८० मध्ये अमेरिकेत एका हृदयस्पर्शी घटनेने झाली. सात वर्षांचा ख्रिस ग्रेच नावाचा मुलगा ल्युकेमियासारख्या भयानक आजाराशी लढत होता. त्याला आयुष्यात एकदा तरी ‘पोलीस अधिकारी’ बनण्याची तीव्र इच्छा होती. स्थानिक पोलिसांनी एकत्र येऊन ख्रिसची ही इच्छा पूर्ण केली, त्याला गणवेश दिला आणि खऱ्याखुऱ्या पोलीस मोहिमेवर नेले. या घटनेने जगाला दाखवून दिले की, एखाद्याची लहानशी इच्छा पूर्ण केल्याने त्याला आयुष्यात किती मोठे सुख आणि जगण्याची उमेद मिळू शकते. तेव्हापासून आजपर्यंत हे फाउंडेशन जगभरातील लाखो मुलांच्या इच्छा पूर्ण करत आहे.

Happy World Wish Day Everyone pic.twitter.com/f4bbf1Skea — Evan Ferguson #FireDavidZaslav (@EvanFer29213130) April 28, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Malaria Day : मलेरियाचा ‘द एंड’ निश्चित! विज्ञानाने शोधली अशी लस की डासांची दहशत संपणार; पाहा विशेष रिपोर्ट

मानवता आणि कलेचा संदेश

हे दोन्ही दिवस आपल्याला जगण्याचे एक नवीन सूत्र शिकवतात. नृत्य आपल्याला स्वतःच्या भावनांशी जोडते, तर इच्छा दिन आपल्याला दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आनंद देण्याची प्रेरणा देतो. जर तुम्ही आज एखादा छोटासा डान्स केला किंवा एखाद्या गरजू मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थाने या दिवसाचे सार्थक होईल. २९ एप्रिल हा दिवस कला, आरोग्य, सहानुभूती आणि माणुसकीच्या त्रिवेणी संगमाचा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?

    Ans: हा दिवस आधुनिक बॅलेचे जनक जीन-जॉर्जेस नोव्हर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

  • Que: जागतिक इच्छा दिन (World Wish Day) ची सुरुवात कधी झाली?

    Ans: या दिवसाची सुरुवात १९८० मध्ये ख्रिस ग्रेच या मुलाची इच्छा पूर्ण झाल्याच्या घटनेपासून झाली.

  • Que: हे दोन्ही दिवस एकाच तारखेला का येतात?

    Ans: योगायोगाने दोन्ही महत्त्वाच्या संस्थांची स्थापना किंवा संबंधित व्यक्तींची जयंती २९ एप्रिल रोजीच असल्याने हे दोन्ही दिवस एकाच वेळी साजरे होतात.

Web Title: International dance day and world wish day special report april 29 importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

World Design Day: केवळ सौंदर्य नाही, तर जगण्याची कला आहे ‘डिझाइन’! जाणून घ्या 27 एप्रिलचा दिवस का आहे खास?
1

World Design Day: केवळ सौंदर्य नाही, तर जगण्याची कला आहे ‘डिझाइन’! जाणून घ्या 27 एप्रिलचा दिवस का आहे खास?

World IP Day: तुमच्या आयडियाची ‘चोरी’ टाळा! आज जागतिक बौद्धिक संपदा दिन; जाणून घ्या पेटंट आणि कॉपीराईटचे महत्त्व
2

World IP Day: तुमच्या आयडियाची ‘चोरी’ टाळा! आज जागतिक बौद्धिक संपदा दिन; जाणून घ्या पेटंट आणि कॉपीराईटचे महत्त्व

World Malaria Day : मलेरियाचा ‘द एंड’ निश्चित! विज्ञानाने शोधली अशी लस की डासांची दहशत संपणार; पाहा विशेष रिपोर्ट
3

World Malaria Day : मलेरियाचा ‘द एंड’ निश्चित! विज्ञानाने शोधली अशी लस की डासांची दहशत संपणार; पाहा विशेष रिपोर्ट

Panchayati Raj Day: ग्रामीण भारताच्या विकासाचे इंजिन, ‘पंचायती राज’! 24 एप्रिलचा दिवस का आहे लोकशाहीसाठी खास? वाचा सविस्तर
4

Panchayati Raj Day: ग्रामीण भारताच्या विकासाचे इंजिन, ‘पंचायती राज’! 24 एप्रिलचा दिवस का आहे लोकशाहीसाठी खास? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.