international potato day 2025
घरामध्ये करण्यासाठी काहीही नसेल तरी ही एक भाजी असली तरी देखील स्वयंपाक अतिशय रुचकर असतो. ही भाजी विदेशातील असली तरी तिने भारतीय स्वयंपाकघरात अगदी हक्काचं आणि लाडाचं स्थान मिळवलं आहे. ती म्हणजे बटाटा. कानामागून आली अन् तिखट झाली असं म्हणतात अगदी तसंच. स्वदेशी आणि अनेक रुचकर भाज्यांना मागे टाकत बट्टयाने भारतीय स्त्रियांची मने जिंकली आहेत. आज आंतरराष्ट्रीय बटाटा दिन साजरा केला जात आहे.
दक्षिण अमेरिकन अँडीज प्रदेशामध्ये उगम पावलेला बटाटा हा हजारो वर्षांचा हा अन्नपदार्थ आहे. बटाटा 16 व्या शतकात युरोपमध्ये पोहोचला आणि नंतर जगभर पसरला. ग्रामीण आणि इतर भागात जिथे नैसर्गिक संसाधने, विशेषतः शेतीयोग्य जमीन आणि पाणी मर्यादित आणि महाग आहेत, तिथे बटाटा अगदी चवीने खालला जातो. बटाट्याच्या भाजीचे प्रत्येक रुप हे जेवणाची लज्जत वाढवते. त्यामुळे बहुपयोगी असा बटाटा ते एक फायदेशीर पीक म्हणून गणले जाते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अनुकूल हवामानामध्ये देखील बटाटे हे पीक घेतले जाऊ शकते. तसेच इतर पिकांच्या तुलनेत तो कमी प्रमाणात ग्रीन हाऊस गॅस बाहेर सोडतात. गेल्या दशकात, बटाट्याचे जागतिक उत्पादन 10 टक्क्यांनी वाढले आहे, यामुळे बटाट्याची लोकप्रियता ही तुमच्या लक्षात आलीच असेल. बटाट्याचे वेफर्स असो वा फ्रेंच फ्राईज लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातात. वाढलेल्या मागणीमुळे बटट्याचे उत्पादन आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बटाटा दिन असल्यामुळे हे निश्चित सांगितले जाणे गरजेचे आहे की, जागतिक स्तरावर उपासमार आणि कुपोषण संपवण्याच्या प्रयत्नात बटाटा हे पीक महत्त्वाची भूमिका बजावते. बटाटा हा अँडियन प्रदेशांनी संपूर्ण जगासाठी दिलेल्या सर्वात महत्वाच्या योगदानांपैकी एक आहे, कारण तो जगात वापरल्या जाणाऱ्या पाच मुख्य अन्न पिकांपैकी बटाटा एक आहे. याव्यतिरिक्त, बटाट्याचे उत्पादन घेणाऱ्यांमध्ये लहान स्वरुपातील आणि कौटुंबिक शेती उत्पादन, विशेषतः ग्रामीण शेतकऱ्यांद्वारे, ज्यामध्ये महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामुळे कुपोषण आणि गरिबी कमी होते. त्याचबरोबर अन्न सुरक्षा साध्य करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देते.
का साजरा केला जातो?
2024 यावर्षी पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन साजरा केला गेला. आंतरराष्ट्रीय बटाटा दिन ३० मे रोजी साजरा केला जातो. डिसेंबर २०२३ मध्ये, महासभेने जाहीर केले की दरवर्षी ३० मे हा दिवस आंतरराष्ट्रीय बटाटा दिन म्हणून साजरा केला जाईल. जगभरात वापरल्या जाणाऱ्या पाच प्रमुख अन्नपदार्थांमध्ये बटाट्याचा समावेश आहे. या अन्नपदार्थातून जगाची भूक मिटवली जाते म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
भारतीय स्वयंपाकामध्ये बटाटा महत्त्वाची भूमिका बजावतो. कोणताही लग्न समारंभ असो वा कोणतेही देवकार्य असो बटाट्याची भाजी हमखास केली जाते. भारतामध्ये बटाट्याचे वेफर्स ही खूप मोठी बाजारपेठ आहे. वेगवेगळे फ्लेव्हर वापरुन तयार होणारे वेफर्स हे मोठ्या प्रमाणात विकले जातात. त्याचबरोबर तरुणाईच्या मनावर देखील बटाटा अधिराज्य गाजवतो. त्याचबरोबर व्हेज बर्गरमधील टीकी तयार करण्यासाठी तर फ्रेंच फाईज तयार करण्यासाठी बटाटा मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. तसेच पोटॅटो रोल, बटाट्याची भजी, वडापावसाठी देखील बटाटाच वापरलो जातो. वर्षानुवर्षे भारतीय भूक आणि चटक पुरवणारे अनेक पदार्थ हे बटाट्याचा वापर करुन तयार केले जातात. त्यामुळे परदेशी असून देखील बटाट्याने भारतीय घराघरात अढळ असे स्थान पटकवले आहे.