फोटो सौजन्य: गुगल
“येवा कोकण आपलाच आसा” असं म्हणणारी कोकणची माणसं ही शहाळ्यासारखी मधूर असतातात हे कायमच कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी अनुभवलेलं आहे. कोण्या एके काळी याच कोकणाचा गोवा देखील अविभाज्य भाग होता. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण गोवा मात्र तरीही पोर्तुगीजांच्या सत्तेखाली होता. खरंतर गुलामगिरीची वागणूकीच्या चटके नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने पुरेपुर सहन केले होते. याच कारणाने पारतंत्र्यात न राहता आणि अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारण्याचं सामर्थ्य असण्यास गोवेकर अपवाद नव्हते. 1947 च्या स्वातंत्र्यानंतर ही तब्बल 14 वर्षांच्या संघर्षाने गोव्याने पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळालं . त्यानंतर गोव्याला राज्याच्या दर्जा प्राप्त झाला आणि तो दिवस म्हणजे 30 मे 1987.
पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळालं तो दिवस म्हणजे 19 डिसेंबर 1961 या दिवशी भारताने पोर्तुगीज सत्तेपासून गोव्याची मुक्तता केली त्यामुळे हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन विजय’द्वारे गोवा मुक्त झाला. आणि हीच गोव्याच्या स्वातंत्र्याची नांदी ठरली.
इतिहासातील नोंदी प्रमाणे 1498 साली पोर्तुगीज खलाशी ‘वास्को द गामा’ हा गोव्यात दाखल होणारा पहिला पोर्गुगीज होता. व्यापारासाठी आलेल्या या पोर्तुगीजांनी हळूहळू सागरी प्रदेश स्वत:च्या ताब्यात घेतला, जिथे समुद्र तो प्रदेश म्हणजे पोर्कुगीजांची सत्ता हे समीकरणच बनलं होतं आणि यामध्ये पोर्गुगीजांची सर्वात प्रबळ सत्ता होती ती गोव्यात. ही सत्ता इतकी बळावली होती की, पोर्तगीजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गोवा राज्याला1947च्या स्वातंत्र्यानंतर ही पुढे 14 वर्ष संघर्ष करावा लागला होता. या गोवा मुक्तीसंग्रामात फक्त गोव्याचे नागरिक किंवा समाजसुधारक इतके नव्हते तर या मोलाच्य़ा कामगिरीत शाहिरांचं देखील तितकंच योगदान होतं. गोवा मुक्तीसाठी जी चळवळ उभी राहिली होती त्या चळवळीत लोकशाहीर कृष्णराव गणपत साबळे यांचा देखील सक्रीय सहभाग होता.
देशाच्या स्वातंत्र्याचा सखोल अभ्य़ास केल्यास असं लक्षात येतं की, संपूर्ण देशावर ब्रिटीशांचं राज्य होतं आणि गोवा प्रदेशावर पोर्तुगीज म्हणूनच1947 चं स्वातंत्र्य देशाला मिळालं ते ब्रिटीश राजवटीपासून. मात्र पोर्तुगीजांचं वास्तव्य गोव्यात भक्कम हे होतंच. खरंतर गोवा आणि हैदराबाद मुक्तीचा संग्राम यशस्वी झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. गोवा मुक्त व्हावा यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांची बाजी लावली. गोवा मुक्तीला हा वणवा पेटून उठला ते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे. डॉ. राम मनोहर यांच्या मित्राने त्यांना गोव्यात काही दिवस विश्रांतीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यावेळी पोर्तुगीजांनी सामान्य जनतेवर लादलेली अमानुष निर्बंध आणि पोर्तुगीजांच्या जाचाला कंटाळलेली जनता पाहून गोवा मुक्तीची ती पहिली ठिणगी पेटली होती. पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस या सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचा यात सहभाग होता.
पोर्तुगीजांची सत्ता गोव्यातून नामशेष झाल्यानंतर गोवा, दिव-दमण आणि अंदमान प्रमाणे केंद्रशासीत प्रदेश व्हावा अशा आशयाचे वारे वाहू लागले. मात्र गोव्यातील नागरिकांना हे मान्य नव्हते. गोव्याला स्वत:ची भाषा, लोकजीवन आणि विशिष्ट संस्कृती आहे जी गोव्याला वेगळी ओळख देते. हीच बाब लक्षात घेत 30 मे 1987 रोजी भारत सरकारकडून गोवा केंद्रशासित प्रदेशातून वगळण्यातत आला आणि स्वतंत्र्य गोव्याचा खऱ्या सूर्य़ोदय झाला तो 30 मे 1987 रोजी. याच दिवशी गोवा स्वतंत्र्य राज्य म्हणून घोषित झालं. त्यामुळे 30 मे हा दिवस गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.