Jahanara Begum daughter of Shah Jahan and Mumtaz Mahal was a wise and beautiful Mughal princess
Mughal Princess Jahanara Begum : मुघल इतिहासात सौंदर्य, विद्वत्ता आणि कर्तृत्व यांची अनोखी सांगड घालणाऱ्या राजकन्यांमध्ये जहांआरा बेगम यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज महल यांची ही लाडकी कन्या केवळ अप्रतिम सौंदर्याच्या बळावर नव्हे, तर तिच्या कर्तृत्वानेही इतिहासात अढळ स्थान निर्माण करून गेली.
जहांआरा बेगमचा जन्म २३ मार्च १६१४ रोजी झाला. ती शाहजहानच्या १४ मुलांपैकी सर्वात लाडकी होती. फ्रेंच इतिहासकार फ्रँकोइस बर्नियर यांनी आपल्या “ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर” या ग्रंथात जहांआराच्या सौंदर्याचे आणि तिच्या वडिलांशी असलेल्या जवळच्या नात्याचे उल्लेख केले आहेत. शाहजहान आपल्या या मुलीवर अपार प्रेम करायचा आणि तिला विशेष सन्मान दिला जात असे.
मुमताज महलचा मृत्यू आणि जहांआरावर आलेल्या जबाबदाऱ्या
१६३१ मध्ये मुमताज महलचा मृत्यू झाला तेव्हा जहांआरा अवघ्या १७ वर्षांची होती. आईच्या मृत्यूनंतर ती केवळ एक राजकन्या न राहता, मुघल दरबारातील महत्त्वाची व्यक्ती बनली. तिच्याकडे केवळ कुटुंबाच्या देखभालीची जबाबदारीच नव्हती, तर तिला मुघल साम्राज्याच्या काही प्रशासनिक कार्यातही महत्त्वाची भूमिका बजावावी लागली. शाहजहानने तिला “पादशाह बेगम” हा सन्मान दिला आणि मुघल साम्राज्याच्या अंतर्गत कारभारात तिचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनकडे आता 600 Nuclear Weapons; जगातील सर्वात वेगवान अणुबॉम्ब बनवल्याचा ड्रॅगनचा खुलासा
श्रीमंती आणि वैभवशाली जीवनशैली
जहांआरा बेगम जगातील सर्वात श्रीमंत स्त्रियांपैकी एक मानली जात असे. तिच्या दैनंदिन खर्चासाठी वार्षिक दोन कोटी रुपये मिळत असत, तसेच तिच्या मालकीच्या अनेक संपत्ती आणि जमीनी होत्या. विशेषतः शाहजहानने तिच्यासाठी दिलेल्या संपत्तीमुळे ती अफाट संपत्तीची मालकीण बनली. इतकेच नव्हे, तर चांदनी चौक हा दिल्लीतील प्रसिद्ध बाजार शाहजहानने जहांआराच्या खरेदीसाठीच उभारला होता. या ठिकाणाचा नकाशा स्वतः जहांआराने तयार केला होता, असे उल्लेख आढळतात.
जहांआरा आणि शाहजहानचे नाते
इतिहासकार बर्नियर यांच्या म्हणण्यानुसार, शाहजहानचे जहांआरावर अपार प्रेम होते. इतकेच नव्हे, तर काही दरबारींनी त्यांच्यातील नात्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या होत्या. तथापि, या सर्व चर्चांना वगळून पाहिले तरीही, जहांआराने आपल्या वडिलांप्रती दाखवलेली निष्ठा अद्वितीय होती. औरंगजेबाने जेव्हा शाहजहानला आग्रा किल्ल्यातील मुसम्मान बुर्जमध्ये नजरकैदेत ठेवले, तेव्हा जहांआरा आपल्या वडिलांसोबत आठ वर्षे राहिली. तिने त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग व्यापारी युद्धाच्या छायेत; लवकरच इतिहासातील सर्वात मोठी बाजारपेठ घसरण होण्याची शक्यता
जहांआराचे व्यक्तिमत्त्व आणि योगदान
जहांआरा बेगम केवळ सुंदर आणि श्रीमंतच नव्हती, तर ती एक बुद्धीमान आणि सुसंस्कृत स्त्री होती. तिला वास्तुशास्त्र, साहित्य आणि कलेचा गाढा अभ्यास होता. इस्लामिक तत्त्वज्ञानात तिची विशेष गती होती आणि तिला सूफी परंपरेची विशेष आवड होती. तिने अनेक ग्रंथांची रचना केली आणि कवी-लेखकांना आश्रय दिला. तिच्या आयुष्याबद्दल अनेक ऐतिहासिक नोंदी आढळतात, परंतु एक गोष्ट निश्चित आहे – जहांआरा बेगम ही मुघल इतिहासातील एक अद्वितीय राजकन्या होती, जिने सौंदर्य, बुद्धीमत्ता आणि प्रेम यांचा एक सुंदर मिलाफ घडवला.