Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

July 27 History: आज सीआरपीएफ स्थापना दिवस; जाणून घ्या २७ जुलैचा इतिहास..

July 27 History: तुम्हाला माहीत आहे का की, २७ जुलै १९३९ रोजी कोणत्या महत्त्वाच्या दलाची स्थापना झाली होती आणि आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या मोठ्या घटना घडल्या होत्या? जाणून घ्या सविस्तर!

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 27, 2026 | 09:26 AM
सीआरपीएफ

सीआरपीएफ

Follow Us
Follow Us:

July 27 History:: दरवर्षी २७ जुलै हा दिवस भारतात ‘सीआरपीएफ स्थापना दिन’ (CRPF Day) म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २७ जुलै १९३९ रोजी ब्रिटिश काळात ‘क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस’ या नावाने या दलाची स्थापना झाली होती आणि स्वातंत्र्यानंतर २७ डिसेंबर १९४९ रोजी याला ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ असे नवीन नाव देण्यात आले. देशातील कायदा व सुव्यवस्था राखणे, अंतर्गत सुरक्षा बळकट करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी हे दल सदैव तत्पर असते. देशाच्या सीमांचे रक्षण, शांततापूर्ण निवडणुका पार पाडणे आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सीआरपीएफचे जवान अत्यंत शौर्याने आपले कर्तव्य बजावतात. आपल्या प्राणांची बाजी लावून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या शूर जवानांच्या अतुलनीय बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

27 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1663 : ब्रिटीश संसदेने एक कायदा संमत केला ज्याने अमेरिकेसाठी बंधनकारक असलेल्या सर्व वस्तू इंग्रजी जहाजांमधून इंग्रजी बंदरांमधून पाठवणे बंधनकारक केले.
  • 1761 : माधवराव बल्लाळ भट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे झाले.
  • 1866 : व्हॅलेन्सिया बेट, आयर्लंड ते ट्रिनिटी बे, कॅनडापर्यंत समुद्राखालील केबल पूर्ण झाली. युरोप आणि अमेरिका यांच्यात टेलिग्राफिक संदेश पाठवणे शक्य झाले.
  • 1890 : डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांनी स्वतःवर गोळी झाडली. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
  • 1921 : टोरंटो विद्यापीठाचे सर फ्रेडरिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांना शुद्ध स्वरूपात इन्सुलिन वेगळे करण्यात यश आले.
  • 1939 : CRPF अस्तित्वात आले.
  • 1940 : अ वाइल्ड हेअर या ॲनिमेटेड शॉर्ट फिल्ममध्ये बग्स बनी हे पात्र दिसले.
  • 1949 : जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललॅंड कॉमेटचे पहिले उड्डाण.
  • 1955 : मित्र राष्ट्रांनी ऑस्ट्रियामधून आपले सैन्य मागे घेतले.
  • 1976 : जपानचे माजी पंतप्रधान काकुई तनाका यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
  • 1990 : बेलारूसने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1997 : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • 1999 : द्रपेट्रोलियम मंत्रालयाने लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
  • 2001 : सार्वजनिक ठिकाणी, सरकारी इमारतींमध्ये सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
  • 2012 : लंडनमध्ये 30व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

27 जुलै रोजी जन्म दिनविशेष 

  • 1667 : ‘योहान बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1748)
  • 1899 : ‘पर्सी हॉर्नी ब्रूक’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1911 : ‘डॉ. पां. वा. सुखात्मे’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1997)
  • 1915 : ‘जॅक आयव्हरसन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1940: ‘भारती मुखर्जी’ – भारतीय- अमेरिकन लेखिका यांचा जन्म.
  • 1954 : ‘जी.एस. बाली’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1955 : ‘अ‍ॅलन बॉर्डर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ – महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1963 : ‘नवेद अंजुम’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1967 : ‘राहुल बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1983 : ‘सॉकर वेल्हो’ – भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.
Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास

27 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1844 : ‘जॉन डाल्टन’ – इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 6 सप्टेंबर 1766)
  • 1895 : ‘उस्ताद बंदे अली खाँ बीनकार’ – किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादक यांचे निधन.
  • 1975 : ‘मामासाहेब देवगिरीकर’ – गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले यांचे निधन.
  • 1980 : ‘मोहम्मद रझा पेहलवी’ – शाह ऑफ इराण यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1919)
  • 1992 : ‘अमजद खान’ – हिन्दी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 12 नोव्हेंबर 1940 – गझनी, अफगाणिस्तान)
  • 1997 : ‘बळवंत लक्ष्मण वष्ट’ – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते यांचे निधन.
  • 2002 : ‘कृष्णकांत’ – भारताचे 10वे उपराष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1927)
  • 2007 : ‘वामन दत्तात्रय पटवर्धन’ – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1917)
  • 2015 : ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम’ – भारताचे 11 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1931)
Pralhad Joshi: शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त पदभार; पण पगार का वाढणार नाही? जाणून घ्या नेमके कारण..

Web Title: July 27 history crpf foundation day important events birthdays deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • apj abdul kalam
  • CRPF
  • day history

संबंधित बातम्या

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..
1

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..

Country Music Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय कंट्री म्युझिक दिन? जाणून घ्या रंजक इतिहास
2

Country Music Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय कंट्री म्युझिक दिन? जाणून घ्या रंजक इतिहास

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
3

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Patient Safety Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो जागतिक रुग्ण सुरक्षा दिन? जाणून घ्या यामागील इतिहास
4

World Patient Safety Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो जागतिक रुग्ण सुरक्षा दिन? जाणून घ्या यामागील इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.