Life without Earth Big discovery in astronomy Signs of water on ancient planet TOI-1846b
TOI-1846b : पृथ्वीवरील जीवनामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ‘पाणी’. त्यामुळेच शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून आकाशातील अशा ग्रहांचा शोध घेत आहेत, जिथे पाणी असल्याची शक्यता आहे. आता या शोधात मोठे यश मिळाले आहे. एक नवीन ‘सुपर-अर्थ’ ग्रह सापडला असून, त्यावर पाण्याचा साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ग्रहाचे नाव आहे TOI-1846b. या शोधामुळे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हे तर संपूर्ण जगातील विज्ञानप्रेमी उत्साहित झाले आहेत. कारण TOI-1846b हा ग्रह आपल्या पृथ्वीप्रमाणेच धातू, वायू आणि पाण्याचे मिश्रण असलेला असून, त्याच्यावर भविष्यात जीवन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
TOI-1846b ग्रहाचा शोध मोरोक्कोच्या ओकाइमेडेन लॅबचे खगोलशास्त्रज्ञ अब्दुर्रहमान सबकिओ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लावला आहे. त्यांनी अमेरिकेच्या नासाच्या TESS (Transiting Exoplanet Survey Satellite) उपग्रहाचा वापर करून हा शोध लावला.
1. TOI-1846b हा सुमारे ७.२ अब्ज वर्षे जुना आहे. म्हणजे तो आपल्या पृथ्वीपेक्षा खूपच प्राचीन आहे.
2. पृथ्वीपासून १५४ प्रकाशवर्षे दूर असलेला हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा सुमारे दुप्पट मोठा आहे.
3. त्याची त्रिज्या पृथ्वीपेक्षा 1.792 पट अधिक आहे आणि तो 4.4 पट जड आहे.
4. या ग्रहावर एक वर्ष फक्त ३.९३ दिवसांचे असते!
5. ग्रहाचे तापमान 295 डिग्री सेल्सियस (568.1 Kelvin) इतके असल्याचा अंदाज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तैवान-चीन संघर्षात कोण कोणाच्या बाजूने उभे राहणार? ट्रम्प यांचा थेट सवाल,भारताची भूमिका ठरणार निर्णायक
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, TOI-1846b वर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असण्याची शक्यता आहे. हे पाणी द्रव रूपात आहे का, बर्फाच्या स्वरूपात आहे की वायुरूपात हे अजून स्पष्ट झालेले नाही. याचा सखोल अभ्यास करण्यासाठी रेडियल व्हेलॉसिटी (RV) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. RV तंत्रज्ञानाद्वारे ग्रहाच्या रचनेचा अंदाज घेता येतो आणि तिथे पाणी किंवा अन्य जीवनासाठी आवश्यक घटक आहेत का, हे निश्चित करता येते.
TOI-1846b हे यंदा सापडलेले दुसरे ‘सुपर-अर्थ’ आहे. यापूर्वी शास्त्रज्ञांनी HD 20794 d नावाचा ग्रह शोधला होता, जो पृथ्वीपेक्षा ६ पट जड आहे. तो पृथ्वीप्रमाणेच आपल्या ताऱ्याभोवती फिरतो. मात्र, त्याची कक्षा पृथ्वीसारखी स्थिर नसल्याने तिथे जीवन असण्याची शक्यता अजूनही धूसर आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकारणात रंगत! मोहमद युनूस यांच्या जाण्याच्या चर्चांना वेग, ‘या’ पक्षांनी दिले संकेत
TOI-1846b वरील पाण्याच्या शक्यतेमुळे, भविष्यात मानवी जीवनासाठी पर्याय ग्रह म्हणून याचा विचार होऊ शकतो. परंतु तिथले तापमान, गुरुत्वाकर्षण, हवामान, आणि इतर नैसर्गिक घटक अजून अभ्यासायचे बाकी आहेत. या शोधामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की पृथ्वी एकटीच ‘जीवनासाठी योग्य’ ग्रह नाही, आणि अंतराळात अशा अनेक रहस्यमय ग्रहांचा शोध लावणे अद्याप बाकी आहे.