
makar sankranti 2026 date muhurat traditions in different indian states pongal lohri
Makar Sankranti 2026 date and muhurat : भारतातील सण-उत्सवांमध्ये मकर संक्रांतीला (Makar Sankranti) अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२६ मध्ये, मकर संक्रांतीचा मुख्य मुहूर्त बुधवार, १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी आहे. इंग्रजी तारखेनुसार येणारा हा एकमेव हिंदू सण भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या नावांनी आणि संस्कृतींनी ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊया, या एकाच सणाचे देशाच्या विविध भागांत बदलणारे रंग.
उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये मकर संक्रांतीला प्रामुख्याने ‘खिचडी’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी गंगेत किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रयागराजमध्ये कुंभमेळा किंवा माघ मेळ्याचे आयोजन केले जाते. लोक पहाटे स्नान करून तांदूळ, डाळ, गूळ आणि तिळाचे दान करतात. येथे दही-चुडा आणि खिचडीचा आस्वाद घेतला जातो. अशी मान्यता आहे की, या दिवशी दान केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते.
हे देखील वाचा : Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला पतंग का उडविले जाते? उडवण्यामागे काय आहे कारण शास्त्रीय आणि सांस्कृतिक कारण
गुजरातमध्ये या सणाला ‘उत्तरायण’ म्हणतात. हा दिवस आकाशात रंगीबेरंगी पतंगांच्या महोत्सवासाठी ओळखला जातो. अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव भरवला जातो. ‘कापो छे’च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून जातो. राजस्थानमध्येही पतंग उडवले जातात आणि विवाहित महिला ‘बैना’ (उपहार) देऊन वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात. येथे ‘घेवर’ आणि तिळाच्या मिठाईचे विशेष महत्त्व असते.
⚠️ IMPORTANT INFO FOR TOMORROW Makar Sankranti 2026 on Jan 14 coincides with Shattila Ekadashi, a rare event after 23 years (last in 2003), amplifying spiritual potency. Expect Sarvarth Siddhi & Amrit Siddhi yogas for extra blessings via charity, vrat, and Ganga snan. pic.twitter.com/i6R8x5W8LP — Shivani (@Astro_Healer_Sh) January 13, 2026
credit : social media and Twitter
पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ‘लोहरी’ साजरी केली जाते. शेतातील पिकांच्या कापणीचा आनंद साजरा करण्यासाठी लोक शेकोटी पेटवतात. या अग्नीला तीळ, रेवाडी आणि शेंगदाणे अर्पण करून नाच-गाण्यांचा आनंद लुटला जातो. संक्रांतीच्या दिवसाला येथे ‘माघी’ म्हणतात, जिथे लोक गुरुद्वारांमध्ये जाऊन सेवा करतात आणि ऊसाच्या रसात बनवलेली खीर खातात.
तामिळनाडूमध्ये मकर संक्रांत ‘पोंगल’ म्हणून चार दिवस साजरी केली जाते. यामध्ये निसर्ग, सूर्य आणि गुरेढोरे (बैल-गाय) यांची पूजा केली जाते. मातीच्या भांड्यात नवीन तांदूळ, दूध आणि गुळाचा ‘पोंगल’ नावाचा गोड पदार्थ शिजवला जातो. भांड्यातून दूध उतू जाणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही संक्रांतीला शेतीशी संबंधित सण म्हणून मोठे महत्त्व आहे.
हे देखील वाचा : Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, आर्थिक समस्या होईल दूर
महाराष्ट्रात “तीळगूळ घ्या, गोड बोला” म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. सुवासिनी सुगड पूजनाद्वारे वाण लुटतात. थंडीच्या काळात शरीराला ऊब मिळावी म्हणून बाजरीची भाकरी, खिचडी आणि तिळाचे पदार्थ खाल्ले जातात. तर पश्चिम बंगालमध्ये याला ‘पौष संक्रांती’ म्हणतात. येथे प्रसिद्ध ‘गंगासागर मेळा’ भरतो, जिथे लाखो भाविक गंगा आणि सागराच्या संगमावर स्नान करतात.
Ans: २०२६ मध्ये मकर संक्रांत १४ जानेवारी (बुधवार) रोजी आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश दुपारी ३:१३ मिनिटांनी होणार आहे.
Ans: थंडीच्या दिवसांत तीळ शरीराला आवश्यक ऊब देतात. आध्यात्मिकदृष्ट्या तिळाला 'समानतेचे प्रतीक' मानले जाते, म्हणून तीळ-गूळ वाटून कटुता विसरण्याची प्रथा आहे.
Ans: महाराष्ट्रात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला 'किंक्रांत' किंवा 'करिदिन' म्हणतात. या दिवशी संक्रांत देवीने किंकरासुर राक्षसाचा वध केला होता, अशी मान्यता आहे.