फोटो सौजन्य- pinterest
मकरसंक्रांतीचा सण भारताच्या जवळपास सर्वच भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 14 जानेवारी रोजी हा सण भारतात साजरा केला जाणार आहे. या शुभदिवसाच्या शुभ मुहूर्तावर सूर्यनारायणाची उपासना करणे आणि गंगेत स्नान करणे, एकमेकांचा स्नेह वाढावा म्हणून तीळगूळ दिले जात हेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण त्याचबरोबर मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे कोणती परंपरा आहे, यामागे कोणते धार्मिक कारण आहे, शास्त्र आहे का? कोणत्या राज्यात सर्वाधिक ही परंपरा जपली जाते, जाणून घेऊया
मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा भगवान रामाशी संबंधित आहे. असे मानले जाते की भगवान रामाने मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाशात पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. दुसर्या एका आख्यायिकेनुसार असे सांगितले जाते की, जेव्हा भगवान रामाने पतंग उडवला तेव्हा तो पतंग इंद्रलोकात गेला. यानंतर मकरसंक्रांतीच्या दिवशी जवळपास सर्वत्र पतंग उडवण्याची प्रथा सुरू झाली. पतंगबाजीलाही नवीन पिकाच्या अनुषंगाने पाहिले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी लोक पतंग उडवण्यासाठी एकत्र येतात. ज्यामुळे सामाजिक एकता वाढते. पतंग उडवणे हा मुलांसाठी एक मजेदार मनोरंजन आहे, जो त्यांच्या बालपणीच्या आठवणी निर्माण करतो आणि प्रौढांसाठी बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो.
पतंग उडविणे किती आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने सूर्यापासून शक्तीदेखील मिळते. कारण हिवाळ्यात सूर्यप्रकाशात बसणे किंवा खेळणे योग्य मानले जाते. पतंग उडवताना मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांचा जसे हातांचा वापर जास्त होतो, त्यामुळे थंडीत आखडलेले स्नायू ही मोकळे होतात. त्यामुळे एकप्रकारे व्यायामही होतं असतं. पतंग उडवणे हे बहुतांश तरुण करतात. ज्यामुळे त्वचा आणि इतर आजार दूर होतात. पतंग उडवताना दिवसभर सूर्यकिरणांच्या संपर्कात राहिल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.
मकरसंक्रांत हा सण आनंद, उत्साह आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्सव आहे. पतंगबाजीमुळे वातावरण आनंदी होते. हा एक खेळाचाही प्रकार आहे. त्यामुळे लहान मुले, तरूण मुले यात पतंग काटा, काटीचेही खेळ खेळतात. त्यामुळे काही ठिकाणी आता याला स्पर्धात्मक स्वरूप आले आहे. गुजरातमध्ये आता पतंग उडवण्याच्या स्पर्धाही होत असतात. मकरसंक्रांतीच्या या काळात हवामान पतंग उडवण्यासाठी अनुकूल असते, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने सूर्यदेवाचे स्वागत आणि उत्सव साजरा करण्यासाठी पतंग उडवण्याची परंपरा आहे.
Ans: हिवाळ्यात सकाळी सूर्यप्रकाशात राहणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पतंग उडवताना सूर्यप्रकाश शरीरावर पडतो, व्हिटॅमिन-D मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Ans: होय. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पतंग उडवणे सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि उत्साह वाढवणारे मानले जाते






