
meghalaya manipur tripura statehood day 2026 history and significance
Meghalaya Manipur Tripura Statehood Day 2026 : भारताच्या नकाशावर आपल्या निसर्गसौंदर्याने आणि समृद्ध संस्कृतीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ईशान्येतील तीन राज्यांसाठी आजचा दिवस (special day) अत्यंत खास आहे. २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या तीन राज्यांची पूर्ण राज्ये म्हणून स्थापना झाली. आज ही तिन्ही राज्ये आपला ५४ वा स्थापना दिवस साजरा करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या निमित्ताने तिन्ही राज्यांतील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“मेघालय” या शब्दाचा अर्थच मुळी ‘ढगांचे निवासस्थान’ असा होतो. १९७२ पूर्वी मेघालय हा आसाम राज्याचा एक स्वायत्त भाग होता. मात्र, खासी, गारो आणि जैंतिया या जमातींच्या स्वतंत्र ओळखीसाठी आणि प्रशासकीय सोयीसाठी २१ जानेवारी १९७२ ला मेघालयाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. चेरापुंजी आणि मावसिनराम सारखी जगात सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणे याच राज्यात आहेत. येथील ‘लिव्हिंग रूट ब्रिजेस’ (Living Root Bridges) हे मानवी बुद्धिमत्ता आणि निसर्ग यांच्या संगमाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.
मणिपूरला ‘भारताचे मणी’ (Jewel of India) म्हटले जाते. स्वातंत्र्यापूर्वी हे एक संस्थान होते, जे १९४९ मध्ये भारतात विलीन झाले आणि १९७२ मध्ये त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. मणिपूरची ओळख केवळ त्याच्या नैसर्गिक सौंदर्यापुरती मर्यादित नाही, तर हे राज्य भारतीय शास्त्रीय नृत्यातील ‘मणिपुरी’ नृत्यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. तसेच, आधुनिक पोलो खेळाचा उगमही याच भूमीत झाला आहे. मेरी कोम आणि मीराबाई चानू सारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंनी या राज्याचे नाव जगभरात रोखले आहे.
आज नॉर्थ ईस्ट के तीन राज्य मणिपुर, मेघालय और त्रिपुरा अपना स्थापना दिवस मना रहे हैं। इस अवसर पर यहां के अपने सभी भाई-बहनों को मेरी बहुत-बहुत शुभकामनाएं। अपने प्रयासों से जीवन के हर क्षेत्र में उन्हें सफलता मिले, यही कामना है। चरैवेति चरैवेति चरन्वै मधु विन्दति। सूर्यास्य पश्य… pic.twitter.com/N7WIyxV60d — Narendra Modi (@narendramodi) January 21, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Summit: ‘माझ्या भावाचे स्वागत!’ UAEअध्यक्षांसाठी PM Modi नी तोडला प्रोटोकॉल; दोन तासांच्या भेटीत झाला ऐतिहासिक ‘पावर’ गेम
त्रिपुरा हे ईशान्येतील तिसरे सर्वात लहान राज्य असले तरी त्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. १९४९ पर्यंत येथे राजेशाही होती. २१ जानेवारी १९७२ रोजी त्रिपुराला केंद्रशासित प्रदेशावरून पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. हे राज्य आपल्या हाताने विणलेल्या कापडांसाठी (Handloom) आणि बांबूच्या हस्तकलेसाठी ओळखले जाते. त्रिपुराचा ‘उज्जयंत पॅलेस’ आणि ‘नीरमहाल’ पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून, येथील आदिवासी आणि बिगर-आदिवासी समुदायातील सलोखा हे विविधतेत एकतेचे उत्तम उदाहरण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Ranking: ड्रॅगनची कमाल! संपूर्ण जगात जिथे हार्वर्डच होता शिक्षणविश्वाचा निर्विवाद सम्राट, तिथेच चीनने फडकवला विजयध्वज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येतील राज्यांना भारताची ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून संबोधले आहे. गेल्या काही वर्षांत ‘ऍक्ट ईस्ट’ (Act East Policy) धोरणामुळे या राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी, रेल्वे नेटवर्क आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार झाला आहे. आजच्या दिवशी या तिन्ही राज्यांच्या राजधानीत (शिलाँग, इम्फाळ आणि आगरतळा) विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि परेडचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये स्थानिक लोक आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होतात.
Ans: या तिन्ही राज्यांची स्थापना २१ जानेवारी १९७२ रोजी 'ईशान्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम १९७१' अंतर्गत झाली.
Ans: स्थापनेपूर्वी मणिपूर आणि त्रिपुरा हे केंद्रशासित प्रदेश होते, तर मेघालय हा आसाम राज्याचा एक स्वायत्त भाग होता.
Ans: ही राज्ये त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती, मणिपुरी नृत्य (मणिपूर), बांबू हस्तकला (त्रिपुरा) आणि निसर्ग पर्यटन (मेघालय) यासाठी प्रसिद्ध आहेत.