"चीनी हार्वर्ड" समोर खरे हार्वर्ड देखील फेल! जाणून घ्या जगातील नंबर वन विद्यापीठ बनण्यासाठी ड्रॅगनने नक्की काय केले? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
China vs Harvard university ranking 2026 : गेल्या अनेक दशकांपासून ‘हार्वर्ड विद्यापीठ’ (Harvard University) हे जागतिक शिक्षणाचे आणि संशोधनाचे सर्वोच्च शिखर मानले जात आहे. मात्र, २०२६ च्या ताज्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत (Global University Rankings) एक मोठा आणि ऐतिहासिक बदल झाला आहे. ज्या संशोधनाच्या जोरावर हार्वर्डने जगावर राज्य केले, त्याच संशोधनात आता चीनच्या तीन विद्यापीठांनी हार्वर्डला चारी मुंड्या चित केले आहे.
‘न्यू यॉर्क टाईम्स’ आणि ‘लीडेन रँकिंग’ (Leiden Ranking) च्या ताज्या आकडेवारीनुसार, संशोधनाच्या गुणवत्तेत हार्वर्ड विद्यापीठ थेट ३० व्या स्थानावर घसरले आहे. याउलट, चीनमधील झेजिआंग विद्यापीठ (Zhejiang University), त्सिंगुआ विद्यापीठ (Tsinghua University) आणि पेकिंग विद्यापीठ (Peking University) यांनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. एकेकाळी अव्वल १० मध्ये अमेरिकेची ७ विद्यापीठे असायची, मात्र आता केवळ हार्वर्ड कसेबसे १० व्या क्रमांकावर तग धरून आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Human Rights: इस्लामचा रक्षक की भक्षक? ‘मशिदींच्या भिंती बोलू लागल्या, कुराणेही जाळली’; बलुच नेत्याने केला पाकिस्तानचा पर्दाफाश
चीनने जगातील नंबर वन शिक्षण केंद्र बनण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून एक सुनियोजित रणनीती राबवली आहे. त्यातील महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत: १. अफाट गुंतवणूक: चीन सरकारने आपल्या सर्वोच्च विद्यापीठांना दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा निधी दिला आहे. विशेषतः STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रात संशोधनासाठी कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतली. २. संशोधन आणि पेटंटवर भर: चीनमधील विद्यापीठांमध्ये पदोन्नती आणि निधी हा केवळ अध्यापनावर नाही, तर किती जागतिक दर्जाचे शोधनिबंध (Research Papers) प्रकाशित झाले, यावर ठरवला जातो. ३. परदेशी प्रतिभेचे आकर्षण: चीनने ‘टॅलेंट प्रोग्राम्स’ अंतर्गत जगातील सर्वोत्तम संशोधकांना, मग ते चिनी वंशाचे असोत वा इतर, त्यांना मोठी पॅकेजेस देऊन मायदेशी परत बोलावले. ४. AI आणि नवी ऊर्जा: भविष्यातील तंत्रज्ञान असलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘रिन्युएबल एनर्जी’ मध्ये चीनने इतके संशोधन केले आहे की, आता अमेरिकाही त्यांच्या मागे पडली आहे.
🚨🇨🇳 BREAKING: Chinese Universities now dominate global research rankings, taking seven of the top 10 spots as Zhejiang University ranks Number 1 pic.twitter.com/tnmmU5d4Ji — Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) January 17, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cold War 2: रशियाचे 50 लष्करी तळ सज्ज! उत्तर ध्रुवावर वर्चस्व मिळवण्यासाठी मित्र राष्ट्रांमध्येच जुंपली; कोण होणार पुढची महासत्ता?
अमेरिकन शिक्षण तज्ज्ञांच्या मते, हार्वर्डची गुणवत्ता कमी झालेली नाही, पण जगातील इतर देश, विशेषतः चीन, वेगाने प्रगती करत आहे. अमेरिकेत संशोधनासाठी लागणारा फेडरल निधी कमी होणे आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावरील कडक निर्बंध यामुळे अमेरिकन विद्यापीठांच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत. दुसरीकडे, चीनने ‘मिशन मोड’ वर काम करून जागतिक शैक्षणिक व्यवस्थेचे केंद्र आशियाकडे वळवले आहे.
आतापर्यंत जगातील हुशार विद्यार्थ्यांचे पहिले स्वप्न हार्वर्ड किंवा स्टॅनफोर्ड असायचे. मात्र, आता उच्च संशोधनासाठी (PhD आणि Post-Doc) विद्यार्थी बीजिंग आणि शांघायची वाट धरताना दिसत आहेत. चीनने देऊ केलेल्या ‘CSC स्कॉलरशिप’ आणि अत्याधुनिक लॅब्समुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओघ आता पूर्वेकडे वळला आहे.
Ans: २०२६ च्या संशोधनावर आधारित 'लीडेन रँकिंग' नुसार, चीनचे झेजिआंग विद्यापीठ (Zhejiang University) जगातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ बनले आहे.
Ans: संशोधनाच्या संख्यात्मक वाढीत चीनने मारलेली भरारी आणि अमेरिकेतील संशोधनासाठीचा निधी कमी होणे, ही हार्वर्डच्या घसरणीची मुख्य कारणे आहेत.
Ans: STEM क्षेत्रात मोठी गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मधील प्रगत संशोधन आणि सरकारचे भक्कम पाठबळ यामुळे चीनची विद्यापीठे अव्वल ठरली.






