Who is Wing Commandor Vyomika Singh: भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६-७ मे च्या मध्यरात्री हवाई हल्ल्यांद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. यानंतर, भारतीय लष्कराकडून एक ब्रीफिंग देखील घेण्यात आले. परराष्ट्र सचिवांव्यतिरिक्त, विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होते.
ब्रीफिंग देताना विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, गुप्तचर यंत्रणांच्या ठोस माहितीनंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथे लष्करच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांचा कणा मोडण्यासाठी कारवाई करण्यात आली. बर्नाळा कॅम्प देखील पाडण्यात आला. सियालकोटमधील महमूना कॅम्प देखील उद्ध्वस्त झाला.
कोण आहे विंग कमांडर व्योमिका सिंग?
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा हवाई दलातील प्रवास एका स्वप्नाने सुरू झाला. व्योमिका यांना शाळेपासूनच विमान उडवायची इच्छा होती. त्यांच्या नावाचा अर्थ – “व्योमिका”, जी आकाशाशी संबंधित आहे. स्वत:च्या नावामुळेच त्यांच्या आकांक्षा आणखी बळकट झाल्या. त्यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील होऊन अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.
व्योमिका सिंग या त्यांच्या कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे जी सशस्त्र दलात सामील झाली आहे. व्योमिका यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले आणि १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले. विंग कमांडर व्योमिका सिंह यांना २५०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव मिळाला आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येसह काही कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता सारखी हेलिकॉप्टर चालवली आहेत.
‘Operation Sindoor’ : भारतासमोर पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?
व्योमिका सिंह यांनी अनेक बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या ऑपरेशनल भूमिकेव्यतिरिक्त, विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सहनशक्ती मोहिमांमध्ये देखील भाग घेतला आहे. २०२१ मध्ये, त्यांनी २१,६५० फूट उंचीवर असलेल्या माउंट मणिरंगवरील त्रि-सेवांच्या सर्व-महिला गिर्यारोहण मोहिमेत सामील झाल्या होत्या. या प्रयत्नाची दखल हवाई दल प्रमुखांसह वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी घेतली.