Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pulwama Attack 2019 Solider Story: आई वाट बघत राहिली, पण वसंत कुमारांचा फोन आलाच नाही…..

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-कश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा मोठा ताफा श्रीनगरच्या दिशेने जात होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 14, 2025 | 04:26 PM
Pulwama Attack 2019 Solider Story: आई वाट बघत राहिली, पण वसंत कुमारांचा फोन आलाच नाही…..
Follow Us
Close
Follow Us:

Pulwama Attack 2019:  14 फेब्रुवारी… संपूर्ण जग जिथे व्हॅलेंटाईन डे साजरा करतं, तिथे भारतात हा दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये या दिवशी भारताने एक भयंकर वेदना सहन केली, जी कधीही विसरली जाऊ शकत नाही. जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाचे 40 वीर जवान शहीद झाले. या घटनेला आता सहा वर्षे पूर्ण झाली असली तरीही, त्या शूरवीरांचा त्याग आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-कश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा मोठा ताफा श्रीनगरच्या दिशेने जात होता. अवंतीपोरा येथील गोरीपोरा भागाजवळ पोहोचताच, एका अज्ञात वाहनाने ताफ्यातील एका बसजवळ संशयास्पद हालचाल सुरू केली. सुरक्षा दलाने त्याला दूर राहण्याचे वारंवार आदेश दिले, परंतु वाहनाने ते आदेश धुडकावले. काही क्षणांतच, 200 किलो RDX ने भरलेल्या त्या वाहनाने बसला जोरदार धडक दिली आणि भीषण स्फोट झाला. या भयंकर हल्ल्यात 40 वीर जवान शहीद झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. CRPFच्या ताफ्यात तब्बल 60 हून अधिक वाहने आणि 2,547 जवान होते, त्यामुळे हा हल्ला अत्यंत विध्वंसक ठरला.

शहीद महेश कुमार

CRPFच्या 118व्या बटालियनचे कॉन्स्टेबल महेश कुमार पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मेजा गावचे रहिवासी असलेले महेश काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून पुन्हा ड्युटीवर परतले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून गावी आणण्यात आले. गावभर शोककळा पसरली. 2011 मध्ये त्यांचा विवाह संजूसोबत झाला होता. त्यांच्या दोन मुलांचा पोटचा गोळा 7 वर्षीय समर आणि 6 वर्षीय समीर यांनी वडिलांना मुखाग्नी दिली.

शिक्रापुरात भीषण अपघात; भरधाव टँकर आडवा आल्याने कारचा चक्काचूर

शहीद सुखजिंदर सिंह

CRPFच्या 76व्या बटालियनचे वीर जवान सुखजिंदर सिंह हे पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील गंगीविंड गावचे रहिवासी होते. पुलवामा येथे त्यांची सात महिन्यांपूर्वीच बदली झाली होती आणि त्याच काळात त्यांना पदोन्नती मिळाली होती. त्यांच्या घरी एका गोंडस बाळाचा—गुरजोत सिंहचा जन्मही झाला होता. ते आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी जाण्याच्या तयारीत होते, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. वाढदिवसाच्या आधीच तो आपल्या वडिलांना कायमचा मुकला.

शहीद वसंता कुमार वी.व्ही.

CRPFच्या 82व्या बटालियनचे कॉन्स्टेबल वसंता कुमार वी.व्ही. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कुन्नाथीडावाका लक्कीडी गावचे होते. हल्ल्याच्या दिवशीच त्यांनी आपल्या आईशी फोनवर बोलून सांगितलं होतं की, ते नवीन पोस्टिंगसाठी पुलवामा जात आहेत आणि श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा संपर्क साधतील. मात्र, हा फोन त्यांचा शेवटचा संवाद ठरला. रात्री उशिरापर्यंत फोन न आल्याने त्यांच्या आईने कार्यालयात चौकशी केली, तिथून तिला कळलं की तिचा मुलगा शहीद झाला आहे. हे ऐकताच त्या जागीच कोसळल्या.

Chhatrapati Shivaji Maharaj : युद्धच नाही तर ‘या’ कारणांमुळे शिवरायांना रयतेचा राजा म्हणायचे, याचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ?

जैश-ए-मोहम्मदने घेतली जबाबदारी

देशभरात लोक शहीद जवानांसाठी शोक व्यक्त करत असताना, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि जल्लोष साजरा केला. स्फोटानंतरचा परिसर इतका भयावह होता की संपूर्ण रस्ता रक्ताने माखलेला होता, जवानांचे मृतदेह तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरले होते. नंतर या वीरांचा सन्मानाने तिरंग्यात लपेटून अंत्यसंस्कार करण्यात आला.

हा हल्ला देशाच्या सुरक्षेवरील मोठा घाव होता

पुलवामा हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भयंकर दहशतवादी हल्ला ठरला. या क्रूरतेने संपूर्ण भारताला एकत्र आणले आणि देशाने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली. या हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने (IAF) 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उध्वस्त केलं.

आजही, पुलवामाच्या त्या वीरांचा त्याग अजरामर आहे आणि त्यांची शौर्यगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे

 

शहीद जवानांचा त्याग अजरामर!

या वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाची सेवा केली. त्यांचा त्याग आणि शौर्य भारत कधीही विसरणार नाही. पुलवामा हल्ल्यातील प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांसाठी संपूर्ण देश आजही कृतज्ञ आहे आणि कायम राहील.  

Web Title: Pulwama attack 2019 solider story mother kept waiting but vasant kumars call never came nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 04:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.