संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावर कार समोरून अचानकपणे भरधाव टँकर आडवा आल्याने झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर होऊन तिघे गंभीर जखमी तर तिघे किरकोळ जखमी होऊन कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भास्कर भानुदास भगत या टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावरुन सोमनाथ मिसाळ हे त्यांची मुलगी, नाती तसेच चालक मित्र यांच्यासोबत त्यांच्या एम एच ०३ झेड ०६४७ या कार मधून पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने जात असताना बजरंगवाडी येथे अचानकपणे एम एच १२ एफ सि ६७७१ हा टँकर भरधावपणे रस्त्यावर आला. यावेळी मिसाळ यांची कार टँकरच्या खाली शिरल्याने कार टँकरच्या खाली अडकली. सदर अपघातात सोमनाथ हरिबा मिसाळ (वय ७२ वर्षे रा. बऱ्हाणपूर ता. भूम जि. धाराशिव), कारचालक सोहम संजयकुमार शहा (रा. बऱ्हाणपूर ता. भूम जि. धाराशिव) तसेच टँकर चालक भास्कर भानुदास भगत (रा. लोणीकंद ता. हवेली जि. पुणे) हे गंभीर झाले आहेत.
तर सोमनाथ मिसाळ यांची मुलगी विद्या बळीराम लोंढे, नात स्वामिनी बळीराम लोंढे व श्रुती बळीराम लोंढे (तिघे रा. देहू पुणे) हे किरकोळ जखमी झाले असून, सदर अपघातात कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, याबाबत सोमनाथ हरिबा मिसाळ (वय ७२ वर्षे रा. बऱ्हाणपूर ता. भूम जि. धाराशिव) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी भास्कर भानुदास भगत (रा. लोणीकंद ता. हवेली जि. पुणे) या टँकर चालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.
दीर- भावजयचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.