Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mars : मंगळावरून पृथ्वीवर आला रहस्यमयी पाहुणा; सहारा वाळवंटात सापडला 4.1 अब्ज वर्षे जुना उल्कापिंड; उलगडले पाण्याचे गूढ

Mars : शास्त्रज्ञांना सहारा वाळवंटातील मालीमध्ये ४.१ अब्ज वर्षे जुना मंगळावरील उल्कापिंड सापडला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडल्यानंतर या उल्कापिंडाचे आठ तुकडे झाले. त्यातील सर्वात मोठा तुकडा मानवी मुठीच्या आकाराचा आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 02, 2026 | 08:30 AM
Martian Meteorite Teghaza 001 Sahara Desert Mars Rock

Martian Meteorite Teghaza 001 Sahara Desert Mars Rock

Follow Us
Follow Us:
  • ४.१ अब्ज वर्षे जुना मंगळाचा उल्कापिंड
  • पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे
  • सायन्स जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध

विज्ञान जगतातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. सहारा वाळवंटातील माली देशात संशोधकांना तब्बल ४.१ अब्ज वर्षे जुना मंगळाचा एक उल्कापिंड सापडला आहे. पृथ्वीवर आतापर्यंत सापडलेल्या मंगळाच्या (Mars) तुकड्यांमध्ये हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, या उल्कापिंडाच्या कसून अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात असल्याचा भक्कम पुरावा हाती लागला आहे. या नव्या संशोधनामुळे मंगळावर कधीतरी जीवसृष्टी किंवा अनुकूल परिस्थिती होती का, याविषयीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

 ‘तेगाझा ००१’ (Teghaza 001) उल्कापिंडाचा शोध आणि त्याचे रहस्य

हा दुर्मिळ उल्कापिंड २०२२ मध्ये सहारा वाळवंटात शोधण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित अशा ‘सायन्स’ (Science) जर्नलमध्ये या संशोधनाबाबतचा सविस्तर शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. संशोधकांच्या मते, जेव्हा हा उल्कापिंड ताशी अफाट वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरला आणि पृष्ठभागावर आदळला, तेव्हा त्याच्या घर्षणामुळे आणि धडकेमुळे त्याचे एकूण आठ तुकडे झाले. यातील सर्वात मोठा तुकडा हा मानवी मुठीच्या आकाराएवढा आहे. या उल्कापिंडाला ‘तेगाझा ००१’ असे नाव देण्यात आले असून, याचा नैसर्गिक गुलाबी रंग पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर झालेल्या प्रक्रियेमुळे काहीसा बदलला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran war : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा युद्धखोर पवित्रा; मोजतबा खामेनी यांनी लष्कराला दिली खुली सूट

 मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाण्याच्या प्रवाहाचे संकेत

या उल्कापिंडाच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांना आश्चर्यकारक माहिती मिळाली आहे. मंगळावरील वितळलेला लाव्हा जेव्हा पृष्ठभागाखालील पाण्याच्या संपर्कात आला, तेव्हा थंड होऊन या खडकाची निर्मिती झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या उल्कापिंडातील विविध खनिजांमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वेगवेगळे घटक लपलेले आढळले आहेत. यावरून स्पष्ट होते की, तब्बल ४.१ अब्ज वर्षांपूर्वी मंगळाच्या पोटात किंवा पृष्ठभागाखाली पाणी वाहत होते. मात्र, जसजसे भूगर्भीय बदल होत गेले आणि वितळलेले खडक संपर्कात आले, तसतसे हे पाणी नाहीसे होऊ लागले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran war : 10 मिनिटांत नष्ट करू! निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या मूडमध्ये ट्रम्प, खामेनीने लक्ष्यांची यादी अद्ययावत केली

 मंगळाचे सुरुवातीचे वातावरण ‘ओले आणि उष्ण’ होते?

या महत्त्वपूर्ण अभ्सयाचे नेतृत्व करणारे नासा (NASA) चे खगोलशास्त्रज्ञ यांग लिऊ (Yang Liu) यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, “तेगाझा ००१ हा उल्कापिंड मंगळाच्या सुरुवातीच्या काळातील रहस्य उलगडण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरत आहे.” हा उल्कापिंड या गोष्टीचा पुरावा देतो की, ४.१ अब्ज वर्षांपूर्वी मंगळ आजच्यासारखा कोरडा आणि थंड ग्रह नसून तो एक ओला आणि उष्ण ग्रह होता. वैज्ञानिकांनी या उल्कापिंडात सापडलेल्या अत्यंत सूक्ष्म झिरकॉन स्फटिकांच्या (Zircon Crystals) माध्यमातून त्याचे अचूक वय ४.१ अब्ज वर्षे असल्याचे निश्चित केले आहे.

सध्या या संशोधनामुळे खगोल अभ्यासकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून, येत्या काळात मंगळाच्या इतिहासाबद्दल अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सहारा वाळवंटात सापडलेल्या मंगळाच्या उल्कापिंडाचे नाव काय आहे?

    Ans: सहारा वाळवंटात सापडलेल्या या मंगळाच्या उल्कापिंडाचे नाव 'तेगाझा ००१' (Teghaza 001) असे आहे.

  • Que: हा उल्कापिंड किती वर्षे जुना आहे?

    Ans: वैज्ञानिक संशोधनानुसार हा उल्कापिंड तब्बल ४.१ अब्ज वर्षे जुना आहे, जो पृथ्वीवर सापडलेला मंगळाचा सर्वात जुना तुकडा मानला जातो.

  • Que: या उल्कापिंडामुळे मंगळाबद्दल कोणती नवीन माहिती समोर आली आहे?

    Ans: या उल्कापिंडामुळे ४.१ अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी अस्तित्वात होते आणि मंगळ तेव्हा ओला व उष्ण ग्रह होता असा पुरावा मिळाला आहे.

Web Title: Sahara desert mars meteorite teghaza 001 water discovery hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • meteorite
  • NASA
  • Space News

संबंधित बातम्या

ISRO : अमेरिकन GPS ला भारतीय उत्तर! अचूक नेव्हिगेशनसाठी इस्रोने लाँच केला NVS-03 उपग्रह; पंतप्रधान मोदींकडून कौतुक
1

ISRO : अमेरिकन GPS ला भारतीय उत्तर! अचूक नेव्हिगेशनसाठी इस्रोने लाँच केला NVS-03 उपग्रह; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

2026ED138 : सूर्यमालेत एका नवीन ग्रह! सूर्याभोवती फिरताना दिसलेली एक रहस्यमय वस्तू; बटु ग्रह असल्याचा दावा
2

2026ED138 : सूर्यमालेत एका नवीन ग्रह! सूर्याभोवती फिरताना दिसलेली एक रहस्यमय वस्तू; बटु ग्रह असल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.