Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaheed Diwas 2026: राष्ट्रपिता गांधी ते सीमेवरील जवान! एकाच धाग्यात गुंफलेला बलिदानाचा इतिहास

भारतात ३० जानेवारी रोजी शहीद दिन साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे, ज्यांची ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 30, 2026 | 09:45 AM
shaheed diwas 30 january mahatma gandhi death anniversary history and significance

shaheed diwas 30 january mahatma gandhi death anniversary history and significance

Follow Us
Close
Follow Us:
  • बापूंची पुण्यतिथी
  • देशव्यापी श्रद्धांजली
  • अहिंसेचा संदेश

Shaheed Diwas 30 January 2026 Marathi : आज ३० जानेवारी! कॅलेंडरवरची ही तारीख भारतीय इतिहासातील सर्वात दुःखद आणि तितकीच महत्त्वाची मानली जाते. आजचा दिवस संपूर्ण देश ‘हुतात्मा दिन’ (Shaheed Diwas) म्हणून साजरा करतो. आजच्याच दिवशी १९४८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेला जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गांधीजींच्या अहिंसेच्या प्रवासाचा हा शेवट असला, तरी त्यांच्या विचारांची ज्योत आजही अखंड तेवत आहे.

तो काळा दिवस: ३० जानेवारी १९४८ चा इतिहास

३० जानेवारीची ती संध्याकाळ आजही इतिहासात रक्ताळलेली आहे. नवी दिल्लीतील बिर्ला भवनाच्या आवारात गांधीजी नेहमीप्रमाणे प्रार्थना सभेसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत मनु आणि आभा या त्यांच्या नाती होत्या. तितक्यात गर्दीतून नथुराम गोडसे समोर आला आणि त्याने गांधीजींच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. “हे राम…” हे शब्द बापूंच्या मुखातून निघाले आणि भारताचा हा महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला. गांधीजींच्या बलिदानाची ही आठवण म्हणून केंद्र सरकारने ३० जानेवारी हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून घोषित केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ISRO : जेव्हा रात्र भयाण झाली आणि नभ रक्तवर्णी; लडाखमध्ये जे घडलं ते पाहून शास्त्रज्ञही हादरले, ‘AdityaL1’ ठरले सुरक्षाकवच

दोन मिनिटांचे मौन: साऱ्या देशाचे स्तब्ध होणे

हुतात्मा दिनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सकाळी ११ वाजता पाळले जाणारे ‘मौन’. या दिवशी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि तिन्ही दलांचे प्रमुख राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर जाऊन पुष्पहार अर्पण करतात. सकाळी ११ वाजता संपूर्ण देशभरात सायरन वाजवला जातो, ज्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळले जाते. हे दोन मिनिटांचे मौन केवळ गांधीजींसाठीच नाही, तर देशाच्या सीमांचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या प्रत्येक सैनिकासाठी आणि क्रांतीकारकासाठी असते.

Martyrs’ Day 2026: Every year Shaheed Diwas or Martyrs’ Day is commemorated on 30 January in India to mark Mahatma Gandhi’s death anniversary who was assassinated by Nathuram Godse. This day is also observed to pay tribute to all the freedom fighters who had lost their lives in… pic.twitter.com/eKc7nGZpar — SA News Channel (@SatlokChannel) January 30, 2026

credit – social media and Twitter

तरुणांसाठी हा दिवस का महत्त्वाचा आहे?

आजच्या धावपळीच्या युगात ‘हुतात्मा दिन’ तरुणांना आपल्या मुळांकडे पाहण्याची संधी देतो. आपण आज ज्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, ती मिळवण्यासाठी किती जणांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला आहे, याची जाणीव हा दिवस करून देतो. लोकशाही, अहिंसा, राष्ट्रीय एकता आणि त्याग या मूल्यांचा स्वीकार करणे हीच खऱ्या अर्थाने त्या शहीदांना दिलेली मोठी श्रद्धांजली ठरेल. केवळ सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापेक्षा, देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्याची प्रेरणा हा दिवस आपल्याला देतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gold Street : ‘सिटी ऑफ गोल्ड’ मध्ये बनणार सोन्याचा रस्ता; जाणून घ्या कुठे आहे ‘ही’ सुवर्णनगरी? पहिलाच VIDEO झाला रिलीज

भारतात दोनदा साजरा होतो शहीद दिन?

अनेक वाचकांच्या मनात हा गोंधळ असतो की शहीद दिन नक्की कधी असतो? भारतात मुख्य दोन तारखांना हा दिवस पाळला जातो. ३० जानेवारी हा महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो, तर २३ मार्च हा दिवस भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतीकारकांच्या बलिदानाप्रीत्यर्थ ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे महत्त्व आणि भावना एकच आहे – देशाप्रती समर्पण!

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतात ३० जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो?

    Ans: ३० जानेवारी हा दिवस 'हुतात्मा दिन' (Martyrs' Day) म्हणून साजरा केला जातो, जो महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन आहे.

  • Que: शहीद दिनी दोन मिनिटांचे मौन का पाळले जाते?

    Ans: देशाच्या स्वातंत्र्य आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळले जाते.

  • Que: ३० जानेवारी आणि २३ मार्चमध्ये काय फरक आहे?

    Ans: ३० जानेवारी ही महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे, तर २३ मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा हौतात्म्य दिन आहे. दोन्ही दिवसांना शहीद दिन म्हटले जाते.

Web Title: Shaheed diwas 30 january mahatma gandhi death anniversary history and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Corpse Flower: ‘हे’ आहे जगातील अत्यंत दुर्मिळ फूल; ज्याचा प्रेताच्या वासाशी ‘असा’ संबंध, रहस्य वाचून अंगावर येईल काटा
1

Corpse Flower: ‘हे’ आहे जगातील अत्यंत दुर्मिळ फूल; ज्याचा प्रेताच्या वासाशी ‘असा’ संबंध, रहस्य वाचून अंगावर येईल काटा

29 January History: जेव्हा 2 इंजिनांची ‘जंबो ट्रेन’ पहिल्यांदा धावली अन् भारताचा नकाशाच बदलला, वाचा ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास
2

29 January History: जेव्हा 2 इंजिनांची ‘जंबो ट्रेन’ पहिल्यांदा धावली अन् भारताचा नकाशाच बदलला, वाचा ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास

National Puzzle Day 2026: मेंदूची शक्ती वाढवा! आज आहे ‘नॅशनल पझल डे’; जाणून घ्या कोडी सोडवण्याचे ‘हे’ 10 मोठे फायदे
3

National Puzzle Day 2026: मेंदूची शक्ती वाढवा! आज आहे ‘नॅशनल पझल डे’; जाणून घ्या कोडी सोडवण्याचे ‘हे’ 10 मोठे फायदे

Peaceful Coexistence Day: शांततेचा नवा अध्याय! जाणून घ्या ‘आंतरराष्ट्रीय शांततापूर्ण सहअस्तित्व दिन’ का आहे खास
4

Peaceful Coexistence Day: शांततेचा नवा अध्याय! जाणून घ्या ‘आंतरराष्ट्रीय शांततापूर्ण सहअस्तित्व दिन’ का आहे खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.