
sunita williams nasa retirement records 608 days in space january 2026
Sunita Williams NASA retirement 2026 : भारतीय वंशाची ‘स्पेस क्वीन’ आणि जगातील सर्वात धाडसी अंतराळवीरांपैकी एक असलेल्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी २७ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर नासामधून (NASA) निवृत्ती घेतली आहे. नासाने मंगळवारी रात्री अधिकृत घोषणा केली की, सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून लागू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका ऐतिहासिक आणि आव्हानात्मक मोहिमेनंतर त्यांनी अंतराळ गणवेश (Space Suit) उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुनीता विल्यम्स यांची शेवटची मोहीम (Boeing Starliner) त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय ठरली. जून २०२४ मध्ये केवळ ८ दिवसांच्या प्रवासासाठी गेलेल्या सुनीता आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तांत्रिक अडचणींमुळे तब्बल ९ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून पडले होते. अखेर मार्च २०२५ मध्ये स्पेसएक्सच्या (SpaceX) ड्रॅगन यानातून त्या सुखरूप पृथ्वीवर परतल्या. या शेवटच्या मोहिमेत त्यांनी सलग २८६ दिवस अंतराळात राहून आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: मध्य-पूर्वेत वादळापूर्वीची शांतता! Iran-US रणभूमीच्या दिशेने; आकाशात B-2 Stealth, समुद्रात ‘USS अब्राहम लिंकन’ची धडक
१९९८ मध्ये नासामध्ये निवड झाल्यापासून सुनीता विल्यम्स यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकूण तीन मोठ्या मोहिमा पूर्ण केल्या: १. STS-116/117 (२००६): पहिली मोहीम, जिथे त्यांनी महिलांमध्ये सर्वाधिक स्पेसवॉकचा विक्रम केला. २. Expedition 32/33 (२०१२): यामध्ये त्यांनी आयएसएसच्या कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. ३. Starliner/Crew-9 (२०२४-२५): त्यांची सर्वात प्रदीर्घ आणि शेवटची मोहीम. त्यांच्या नावावर एकूण ६०८ दिवस आणि २० मिनिटे अंतराळात घालवल्याची नोंद आहे. नासाच्या इतिहासात सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांच्या यादीत त्या दुसऱ्या स्थानी आहेत.
.@NASA astronaut Suni Williams retires after 27 years, effective Dec. 27, 2025. Williams completed three missions aboard the International Space Station, setting numerous human spaceflight records. More… https://t.co/xrxErQKntr pic.twitter.com/CnRS693KSV — International Space Station (@Space_Station) January 21, 2026
credit – social media and Twitter
सुनीता विल्यम्स केवळ अंतराळवीर नव्हत्या तर त्या एक उत्कृष्ट ॲथलीटही आहेत. २००७ मध्ये त्यांनी अंतराळातील ट्रेडमिलवर धावून ‘बोस्टन मॅरेथॉन’ पूर्ण केली होती. अशी कामगिरी करणाऱ्या त्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या. तसेच, त्यांनी एकूण ९ स्पेसवॉक (EVAs) केले असून, त्यांचा एकूण वेळ ६२ तास ६ मिनिटे इतका आहे. महिला अंतराळवीरांमध्ये हा आजही जागतिक विक्रम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Davos 2026 : ‘खुनी राजवटीला जागा नाही!’ दावोसने फाडले इराणचे निमंत्रण; परराष्ट्रमंत्री अराघचींची जागतिक नाचक्की
सुनीता विल्यम्स यांचे वडील डॉ. दीपक पंड्या हे गुजरातमधील झुलासन गावचे होते. सुनीता यांनी नेहमीच आपल्या भारतीय मुळांचा अभिमान बाळगला आहे. अंतराळात जाताना त्यांनी भगवद्गीता, उपनिषद आणि समोसे सोबत नेले होते, ज्याची मोठी चर्चा झाली होती. नासाचे प्रशासक जेरेड इसाकमन यांनी त्यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सुनीता यांनी केवळ विक्रम केले नाहीत, तर त्यांनी चंद्रावरील आर्टेमिस (Artemis) आणि मंगळ मोहिमांसाठी भक्कम पाया रचला आहे.”
Ans: सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या तीन मोहिमांमध्ये मिळून एकूण ६०८ दिवस २० मिनिटे अंतराळात घालवले आहेत.
Ans: त्यांनी एकूण ९ स्पेसवॉक केले असून, ६२ तास ६ मिनिटे स्पेसवॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे, जो महिलांमध्ये सर्वाधिक आहे.
Ans: नासाने जाहीर केल्यानुसार, सुनीता विल्यम्स २७ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे निवृत्त झाल्या आहेत.