Davos 2026 : 'खुनी राजवटीला जागा नाही!' दावोसने फाडले इराणचे निमंत्रण; परराष्ट्रमंत्री अराघचींची जागतिक नाचक्की ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
WEF Davos 2026 Iran invitation cancelled : जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या ‘जागतिक आर्थिक मंच’ (World Economic Forum – Davos 2026) मधून इराणला (Iran) अपमानित होऊन बाहेर पडावे लागले आहे. इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या रक्तरंजित निदर्शनांची दखल घेत, WEF ने इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांचे निमंत्रण रद्द केले आहे. “ज्या देशाचे रस्ते स्वतःच्याच नागरिकांच्या रक्ताने माखले आहेत, त्या देशाच्या प्रतिनिधीला ‘संवादाच्या’ व्यासपीठावर जागा नाही,” अशा शब्दांत जागतिक समुदायाने इराणला फटकारले आहे.
सुरुवातीला अराघची यांना या परिषदेत भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ८ आणि ९ जानेवारी २०२६ च्या रात्री इराणमध्ये जो हिंसाचार झाला, त्याने जगाचे डोळे उघडले. मानवाधिकार संघटनांच्या दाव्यानुसार, त्या दोन रात्रींत इंटरनेट बंद करून इराणच्या सुरक्षा दलांनी किमान १२,००० हून अधिक निदर्शकांची हत्या केली. या नरसंहाराची तुलना ‘दुसऱ्या महायुद्धातील क्रूरतेशी’ केली जात आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम आणि अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दावोसवर दबाव आणला होता की, जर अराघची येथे आले तर ते ‘हिटलरला आमंत्रित करण्यासारखे’ असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Syria War: सीरियात अमेरिकेचा ‘गेम ओव्हर’! तेल आणि वायूचे साठे सरकारच्या ताब्यात; USच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या ‘SDF’ने टेकले गुडघे
यावर्षीच्या दावोस परिषदेची थीम ‘अ स्पिरीट ऑफ डायलॉग’ (A Spirit of Dialogue) म्हणजेच संवादाची भावना अशी आहे. मात्र, WEF चे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखादे सरकार आपल्याच जनतेवर गोळ्या झाडते, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधणे हे या थीमच्या विरोधात आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून अराघची यांचाही या दडपशाहीत सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच त्यांना स्वित्झर्लंडमध्ये पाय ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
The World Economic Forum disinvited Iran’s foreign minister Abbas Araghchi from Davos, citing civilian deaths during Tehran’s violent crackdown on nationwide protests.
✍️ @DanielleGreyman https://t.co/TqCslFJZH8 — The Jerusalem Post (@Jerusalem_Post) January 19, 2026
credit – social media and Twitter
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याला “पाश्चात्य देशांचा राजकीय दबाव” असे संबोधले आहे. मात्र, जगभरातील इराणी आंदोलकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “इराणची राजवट आता जागतिक स्तरावर अस्पृश्य झाली आहे,” अशी भावना पॅरिस आणि लंडनमधील निर्वासित इराणी नेत्यांनी व्यक्त केली. केवळ दावोसच नाही, तर आगामी ‘म्युनिक सुरक्षा परिषदे’नेही (Munich Security Conference) इराणचे निमंत्रण मागे घेतल्याने इराणची राजनैतिक नाकेबंदी पूर्ण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Summit: ‘माझ्या भावाचे स्वागत!’ UAEअध्यक्षांसाठी PM Modi नी तोडला प्रोटोकॉल; दोन तासांच्या भेटीत झाला ऐतिहासिक ‘पावर’ गेम
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणवर आधीच ‘मॅक्सिमम प्रेशर’ (Maximum Pressure) धोरण जाहीर केले आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठांनीही इराणला वाळीत टाकल्यामुळे तिथल्या राजवटीवर अंतर्गत आणि बाह्य असा दुहेरी दबाव वाढला आहे. इराणमधील निदर्शने थांबण्याचे नाव घेत नसल्याने आणि जगाने पाठ फिरवल्यामुळे आगामी काळ तेहरानसाठी अत्यंत कठीण असणार आहे.
Ans: इराणमध्ये निदर्शकांवर झालेल्या हिंसक कारवाईत हजारो लोक मारले गेल्यामुळे आणि मानवाधिकारांच्या गंभीर उल्लंघनामुळे WEF ने हा निर्णय घेतला.
Ans: सय्यद अब्बास अराघची हे इराणचे परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांचे निमंत्रण दावोसने रद्द केले आहे.
Ans: यामुळे इराण जागतिक स्तरावर राजनैतिकदृष्ट्या एकाकी पडला असून, त्यांच्या राजवटीवर आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला आहे.






