Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Today in History : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती; जाणून घ्या १ ऑगस्टचा इतिहास..

Today in History 1st August: १ ऑगस्ट रोजी इतिहासात काय घडले? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी यांसह ऐतिहासिक घडामोडींची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 01, 2026 | 09:33 AM
आण्णाभाऊ साठे

आण्णाभाऊ साठे

Follow Us
Follow Us:

Today in History 1st August: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे) यांची जयंती आज साजरी केली जाते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या लहानशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. कोणत्याही औपचारिक शिक्षणाचा अभाव असतानाही त्यांनी आपल्या अथांग प्रतिभा आणि संघर्षाच्या जोरावर मराठी साहित्यात व लोककलेत क्रांतिकारक योगदान दिले. त्यांनी रचलेल्या लावण्या, पोवाडे, कथा आणि कादंबऱ्यांमधून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी व कामगार वर्गाच्या व्यथा आणि संघर्षाला वाचा फोडली. ‘फकीरा’ ही त्यांची कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते. तसेच, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांच्या शाहिरीने आणि कवनांनी जनतेला जागृत करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

१ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1461 : एडवर्ड चौथा इंग्लंडच्या सिंहासनावर आरूढ झाला.
  • 1774 : जोसेफ प्रिस्टली आणि कार्ल स्कील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन मूलद्रव्य वेगळे केले.
  • 1800 : ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे राज्य युनायटेड किंगडममध्ये विलीन झाले.
  • 1831 : लंडन ब्रिज वाहतुकीसाठी खुला.
  • 1876 : कोलोरॅडो अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
  • 1902 : अमेरिकेने पनामा कालवा बांधण्याचे आणि वापरण्याचे अधिकार फ्रान्सकडून विकत घेतले
  • 1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1920 : असहकार चळवळ सुरू झाली
  • 1944 : पोलंडची राजधानी वॉर्सा येथे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
  • 1960 : बेनिनला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
  • 1960 : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी बनली.
  • 1981 : अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
  • 1994 : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली.
  • 1996 : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते-निर्माते डॉ. दादासाहेब फाळके पुरस्कार राजकुमार यांना जाहीर.
  • 2001 : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 2008 : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर K2 वर अकरा गिर्यारोहकांचा मृत्यू.
  • 2022 : मंकीपॉक्सच्या साथीमुळे केरळमध्ये पहिला मृत्यू नोंदवला गेला.
July 27 History: आज सीआरपीएफ स्थापना दिवस; जाणून घ्या २७ जुलैचा इतिहास..

१ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 10 : 10ई.पूर्व : ‘क्लॉडियस’ – रोमन सम्राट यांचा जन्म.
  • 1744 : ‘जीन बाप्टिस्टे’ – लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 1829)
  • 1835 : ‘महादेव मोरेश्वर कुंटे’ – कवी व संस्कृतचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑक्टोबर – पुणे)
  • 1882 : ‘पुरुषोत्तम दास टंडन’ – भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुलै 1962)
  • 1899 : ‘कमला नेहरू’ – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1936)
  • 1913 : ‘भगवान आबाजी पालव’ – चित्रपट अभिनेते दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 2002)
  • 1915 : ‘श्री. ज. जोशी’ – कथाकार कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1920 : ‘अण्णाभाऊ साठे’ – लोकशाहीर यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1969)
  • 1924 : ‘सर फ्रँक वॉरेल’ – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1967)
  • 1933 : ‘मीना कुमारी’ – हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, गायिका व कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 1972)
  • 1948 : ‘एव्ही अराद’ – मार्वल स्टुडिओ चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1952 : ‘यजुर्वेंद्र सिंग’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1955 : ‘अरुण लाल’ – क्रिकेटपटू समालोचक यांचा जन्म.
  • 1969 : ‘ग्रॅहॅम थॉर्प’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1987 : ‘तापसी पन्नू’ – भारतीय सिने-अभिनेत्री यांचा जन्म.

१ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1137 : ‘लुई (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1081)
  • 1920 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1856 – रत्‍नागिरी)
  • 1999 : ‘निरादसी चौधरी’ – बंगाली साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1897)
  • 2005 : ‘फहाद’ – सौदी अरेबियाचा राजा यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1921)
  • 2008 : ‘हरकिशनसिंग सुरजित’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म : 23 मार्च 1916)
  • 2008 : ‘अशोक मंकड’ – क्रिकेटपटू यांचे निधन.
29 July Dinvishesh: आज गुरुपैर्णिमा: जाणून घ्या 29 जुलैचा इतिहास..

Web Title: Today in history 1st august dinvishesh annabhau sathe jayanti lokmanya tilak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Interventional Cardiology Day: डॉ. अँड्रियास ग्रुंटझिग अन् पहिली अँजिओप्लास्टी… जाणून घ्या ‘या’ ऐतिहासिक शोधाची कथा
1

Interventional Cardiology Day: डॉ. अँड्रियास ग्रुंटझिग अन् पहिली अँजिओप्लास्टी… जाणून घ्या ‘या’ ऐतिहासिक शोधाची कथा

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day : पृथ्वीच्या नैसर्गिक ‘सुरक्षा कवचाचे’ रक्षण का गरजेचे? जाणून घ्या जागतिक ओझोन दिनाचा इतिहास आणि महत्त्व
3

World Ozone Day : पृथ्वीच्या नैसर्गिक ‘सुरक्षा कवचाचे’ रक्षण का गरजेचे? जाणून घ्या जागतिक ओझोन दिनाचा इतिहास आणि महत्त्व

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
4

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.