Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय स्त्रीला ‘देवी’, ‘आदर्श’ आणि ‘त्यागाच्या’ चौकटीत अडकवून तिचे माणूसपण नाकारणारी दुटप्पी, पुरुषप्रधान समाजव्यवस्था!

भारतीय समाजात स्त्रियांना 'देवी' किंवा 'घरची लक्ष्मी' म्हणून देव्हाऱ्यावर बसवून, प्रेमाच्या नावाखाली त्यांच्यावर अदृश्य बंधने लादली जातात. कौतुकाचे उदात्तीकरण करून स्त्रियांना विनामूल्य घरकामात अडकवण्याऐवजी, त्यांना स्वतंत्र 'माणूस' मानून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हाच त्यांचा खरा सन्मान ठरेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 19, 2026 | 11:45 PM
भारतीय स्त्रीला ‘देवी’, ‘आदर्श’ आणि ‘त्यागाच्या’ चौकटीत अडकवून तिचे माणूसपण नाकारणारी दुटप्पी, पुरुषप्रधान समाजव्यवस्था!
Follow Us
Follow Us:

भारतीय समाजात एका बाजूला स्त्रियांचा खूप आदर केला जातो, असे दाखवले जाते आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांच्यावर अदृश्य बंधने लादली जातात. प्रेम, आदर आणि ‘देवी’ या शब्दांच्या आड लपलेल्या याच मानसिकतेचा हा एक सखोल आढावा,

१. ‘घरची लक्ष्मी‘ आणि देवाचा दर्जा: एक मानसिक सापळा

भारतात मुलगी जन्माला आली की ‘लक्ष्मी आली’, लग्न झाले की ‘घरची लक्ष्मी’ किंवा ‘घराची देवी’ असे म्हटले जाते. वरवर पाहता हा आदर वाटू शकतो, पण मानसशास्त्रीयदृष्ट्या हा एक खूप मोठा सापळा आहे. जेव्हा आपण एखाद्या स्त्रीला ‘देवी’ बनवतो, तेव्हा नकळत आपण तिच्याकडून सामान्य माणसासारख्या चुका करण्याची, थकण्याची किंवा स्वतःच्या इच्छा असण्याची मुभा हिरावून घेतो. देवी कधी चुकत नाही, देवीला राग येत नाही, ती फक्त त्याग करते—हाच आदर्श तिच्यावर लादला जातो.

२. बेनेव्हलंट सेक्सिझम: प्रेमाच्या नावाखालील दुय्यम वागणूक

‘बेनेव्हलंट सेक्सिझम’ म्हणजे असा भेदभाव जो वरून अतिशय प्रेमळ आणि सकारात्मक वाटतो, पण त्याचे मूळ स्त्रियांना पुरुषांपेक्षा दुय्यम आणि परावलंबी समजण्यात असते. उदा. “स्त्रिया खूप नाजूक असतात, त्यांना जगाची समज नसते, म्हणून पुरुषांनी त्यांचे रक्षण केले पाहिजे.” यामध्ये आदर वाटत असला, तरी स्त्री ही स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम नाही, हीच छुपी भावना असते. हा प्रकार थेट विरोधापेक्षा जास्त धोकादायक असतो, कारण स्त्रियाही याला ‘प्रेम’ समजून स्वीकारतात, आणि चुकतात.

LGBTQ+ समुदाय जुन महिन्यात Pride Month का साजरे करतात? यामागे दडलाय अतिशय विदारक इतिहास!

३. ‘आईच्या हातची चव‘: कौतुकाचा सर्वात मोठा व्यापार आणि आभासी प्रेम

“आईच्या हातच्या जेवणाची चव जगात कुठेच नाही!” हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पण या भावनेच्या आड अनेक मातांनी आपली उभी हयात,आयुष्य स्वयंपाकघरात घालवून दिली आहेत. सत्य तर हे आहे की, अन्न किंवा मसाल्यांमध्ये कोणताही लिंगभेद नसतो. आईच्या जेवणाला चव असते कारण तिने वर्षानुवर्षे घेतलेले कष्ट, सराव आणि अनुभव. याचा अर्थ असाच होतो कि वडिलांनी कधी प्रयत्नच केला नाही.

इथे एक मोठा विरोधाभास आहे: जगातील ९०% फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मुख्य शेफ हे पुरुष असतात. याचा सरळ निष्कर्ष काय? जेव्हा स्वयंपाकाचे पैसे मिळतात, तेव्हा पुरुष स्वयंपाक करतात. पण जेव्हा ते काम विनामूल्य करायचे असते, तेव्हा तिथे आई किंवा स्त्रियांचे कौतुक केले जाते, जेणेकरून त्यांनी आयुष्यभर ते काम करत राहावे. जर आईच्या हाताच्या जेवणात इतकीच जादू आहे, तर तिला हॉटेल्समध्ये शेफ का बनवले जात नाही, जिथे ती स्वतःचे पैसे कमवू शकेल? तिला फक्त घरातल्या मोफत कामापुरते मर्यादित का ठेवले जाते? हा ऐरणीवरचा प्रश्न आहे.

४. देव्हाऱ्यावरून जमिनीवर: त्यागाची सक्ती

देवीच्या देव्हाऱ्यावर बसवलेल्या स्त्रीकडून समाज काय अपेक्षा करतो? तिने नेहमी सहनशील, पवित्र, निस्वार्थी आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी असावे. तिने कुटुंबासाठी स्वतःच्या सुखाचा बळी दिला, तरच ती ‘उत्तम स्त्री’ बनेल. जर तिने स्वतःच्या आरोग्याचा, करिअरचा किंवा विश्रांतीचा विचार केला, तर तिला ‘स्वार्थी’ ठरवले जाते. भारतीय समाजात या दुटप्पीपणाला संस्कारांच्या नावाखाली शह दिला जातो.

५. घरकामाचे उदात्तीकरण

टीव्ही जाहिरातींपासून ते सिनेमांपर्यंत सर्वत्र दाखवले जाते की, आई कशी सकाळी सर्वांच्या आधी उठते, हसतमुखाने सर्वांचे डबे तयार करते आणि रात्री सर्वांच्या शेवटी झोपते. तिच्या या कष्टाचे उदात्तीकरण केले जाते. यामुळे तिचे आयुष्य अत्यंत असुरक्षित आणि थकवणारे बनते. घरकाम हे केवळ तिचे एकटीचे कर्तव्य नसून ती एक जबाबदारी आहे, हे समाज विसरून जातो. एक माणूस म्हणून तिलाही कंटाळा येऊ शकतो, ती थकू शकते हेच लोक विसरतात.

एखादा माणूस बिना अन्न-पाण्याचे किती दिवस जगू शकतो? सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचे वर्ल्ड रेकोर्ड कोणाकडे आहे?

६. ‘स्टॅनफोर्डचा प्रयोग‘ आणि पुरुषसत्ताक पद्धती

प्रसिद्ध ‘स्टॅनफोर्ड प्रिझन एक्सपेरिमेंट’ दाखवतो की, माणसाला जी भूमिका किंवा अपेक्षा दिली जाते, त्याचे वर्तन तसेच घडत जाते. स्त्रीला ‘देवी’ किंवा ‘आदर्श माता’ या भूमिकेत अडकवणे हे पुरुषप्रधान व्यवस्थेचे एक हत्यारचं आहे. या पदवीमुळे स्त्रिया स्वतःहून स्वतःवर बंधने लादून घेतात आणि आपल्या हक्कांसाठी लढणे सोडून देतात. याचे उदाहरण म्हणून तुम्ही पहिले असेल कि ‘आजही बऱ्याच वयस्कर स्त्रिया आपल्या सुना-लेकींना सांगत असतात कि डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे. सुना-लेकींनी बाहेर नोकरी करणे पाप आहे, चुकीचे आहे.’

७. स्वतःसाठी उभे राहिल्यास मिळणारी शिक्षा

जेव्हा एखादी स्त्री या चौकटीबाहेर पडण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या करिअरला प्राधान्य देते किंवा स्वतःच्या आनंदासाठी बोलते, तेव्हा हीच व्यवस्था तिला ‘घमंडी’, ‘संस्कारहीन’ किंवा ‘स्वार्थी’ ठरवते. देवी बनवून ठेवलेली स्त्री जोपर्यंत दुसऱ्यांची सेवा करते, तोपर्यंतच तिचे कौतुक होते.

८. जागतिक संशोधन काय सांगते?

जगभरातील विविध संशोधनांतून असे समोर आले आहे की, विकसनशील देशांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत तब्बल ३ ते ४ पट जास्त वेळ ‘विनामूल्य घरकामात’ घालवतात. यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा येते आणि देशाच्या जीडीपीमध्ये त्यांच्या या कष्टाची कुठेही नोंद होत नाही. परिणामी स्त्रिया मागास राहतात आणि विषारी पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा समाजावर टांगता राहतो.

स्त्रीला ‘देवी‘ नाही, तर ‘माणूस‘ समजण्याची गरज!

आता अशी वेळ आली आहे की आपण स्त्रियांना देव्हाऱ्यातून खाली उतरवून, त्यांना नको असताना देवीचा दर्जा न देता; एक सामान्य ‘माणूस’ म्हणून स्वीकारले पाहिजे. त्यांना चुका करण्याचा, थकण्याचा, स्वतःचे करिअर निवडण्याचा आणि स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्त्रीला त्यागाची मुरत बनवण्यापेक्षा तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि तिच्या कष्टाचा आदर करणे, हाच तिचा खरा सन्मान ठरेल.

Web Title: Treating women as human not goddess

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 11:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.