Fertility Rate In India: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जनतेला तीन मुले जन्माला घालण्याचे आवाहन केलं आहे. पण त्यांच्या तीन मुले जन्माला घालण्याच्या या विधानाने प्रजनन दर आणि लोकसंख्या संतुलनाबाबत नवा वाद सुरू झाला आहे. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत असतानाच मोहन भागवतांच्या म्हण्यानुसार जर भारतीयांनी तीन मुले जन्माला घातली तर त्याचे काय परिणाम होतील,याकडे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत तीन दिवसांचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेवटच्या दिवशी बोलताना मोहन भागवत म्हणाले होते की, एका कुटुंबात तीन मुले पुरेशी आहेत. जर तीन मुले असतील तर ते पालक आणि मुलांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. देशानुसारही तीन मुले योग्य आहेत. त्यांना तीनपेक्षा जास्त मुले वाढवण्याची आवश्यकता नाही.” असं भागवत यांनी म्हटलं होते. पण मोहन भागवत यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. लोकसंख्या नियंत्रणासोबतच पुरेशी लोकसंख्या असणे देखील आवश्यक आहे, जी समाज आणि देशाचे संतुलन राखू शकेल. जर प्रत्येक पुरुषाने तीन मुलांना जन्म दिला तर देशाची लोकसंख्या किती असेल आणि प्रत्यक्षात देशातील प्रजनन दर किती असेल? याबाबत माहिती असणेही गरजेचे आहे.
‘Nari 2025’ report: ‘नारी २०२५’ अहवाल: ४०% भारतीय महिला स्वतःला असुरक्षित; ही शहरे सर्वात सुरक्षित
चीनला मागे टाकत, भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताची लोकसंख्या आता १.४३ अब्ज पेक्षा जास्त झाली आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा देशात तीन मुलांची चर्चा होते, तेव्हा तेव्हा असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे की त्याचा भारताच्या लोकसंख्येवर काय परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्षात, लोकसंख्या वाढ किंवा घट हे प्रजनन दराने मोजले जाते. प्रजनन दर म्हणजे एक महिला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुलांना जन्म देते.
भारतात प्रजनन दर पूर्वी खूप जास्त होता. १९५० च्या दशकात, एक महिला सरासरी चार ते पाच मुलांना जन्म देत असे. परंतु कालांतराने ही संख्या हळूहळू कमी होत गेली. नव्य आकडेवारीनुसार, भारताचा प्रजनन दर जवळजवळ २.० पर्यंत खाली आला आहे. म्हणजेच जर प्रजनन दर २.१ च्या खाली आला तर असे मानले जाते की लोकसंख्या आता वेगाने वाढणार नाही, तर हळूहळू स्थिर होऊ लागेल. सध्या भारतात ही परिस्थिती आहे.
National Sports Day: याच दिवशी सुरुवात झाली होती ‘खेलो इंडिया चळवळीला’ वाचा यामागचा रंजक इतिहास
लोकसंख्याशास्त्रज्ञांच्या मते, जर समाजात तीन मुलांची कल्पना पुन्हा सामान्य झाली तर प्रजनन दर २.१ च्या वर जाईल. यामुळे लोकसंख्या पुन्हा वाढू लागेल. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासारख्या क्षेत्रांवर आधीच मोठा दबाव आहे; अशा वेळी लोकसंख्या आणखी वाढल्यास ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सध्या केरळ, तामिळनाडूसारख्या दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये प्रजनन दर १.६ ते १.७ या पातळीवर स्थिरावला आहे. याचा अर्थ तेथील लोकसंख्या स्थिर झाली असून येत्या काळात ती घटण्याची शक्यता आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रजनन दर तुलनेने जास्त आहे. बिहारमध्ये तो सुमारे २.९ तर उत्तर प्रदेशात सुमारे २.४ इतका आहे. या राज्यांमुळे भारताची एकूण लोकसंख्या वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये मात्र कुटुंबे एक किंवा दोन मुलांवर समाधानी होत आहेत. पण जर तीन मुलांची प्रवृत्ती पुन्हा वाढू लागली तर लोकसंख्येचा दबाव झपाट्याने वाढेल आणि संसाधनांवरचा ताण आणखी वाढून लोकसंख्या पुन्हा ओझे बनण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.