• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • National Sports Day The Khelo India Movement Started On This Day

National Sports Day: याच दिवशी सुरुवात झाली होती ‘खेलो इंडिया चळवळीला’ वाचा यामागचा रंजक इतिहास

आज 'हॉकी जादूगार' मेजर ध्यानचंद यांची 120 वी जयंती आहे. 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे जन्मलेल्या ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी देशात क्रीडा दिन साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2025 | 11:41 AM
National Sports Day The 'Khelo India Movement' started on this day. Read the interesting history behind it.

राष्ट्रीय क्रीडा दिन २०२५: मेजर ध्यानचंद यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त भारताचा क्रीडा महोत्सव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

National Sports Day 2025 : दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी विशेष ठरतो. कारण हा दिवस “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिनामागे एक महान क्रीडापटू, “हॉकीचे जादूगार” म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद आहेत. २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद (सध्याचे प्रयागराज) येथे जन्मलेल्या ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०१२ पासून भारताने हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.क्रीडा दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध स्पर्धा, व्याख्याने आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. २०१८ मध्ये याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “खेलो इंडिया” चळवळीची सुरुवात केली, जी आज भारतीय क्रीडा संस्कृतीचा एक महत्वाचा भाग बनली आहे.

मेजर ध्यानचंद: हॉकीच्या इतिहासातील अतुलनीय नायक

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ म्हटला की सर्वात पहिले नाव घेण्यात येते ते मेजर ध्यानचंद यांचे. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या तीन सलग ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. विशेष म्हणजे १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये भारताने जर्मनीवर ८-१ असा दणदणीत विजय मिळवला. हिटलरसारख्या हुकूमशहानेही त्यांच्या खेळाचे कौतुक करत त्यांना जर्मन सैन्यात उच्च पद आणि नागरिकत्वाची ऑफर दिली, मात्र ध्यानचंद यांनी ती विनम्रपणे नाकारली. त्यांच्यासाठी देशच सर्वात मोठा होता.

मेजर ध्यानचंद यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल ४०० हून अधिक आंतरराष्ट्रीय गोल केले. त्यांचा खेळ इतका अप्रतिम होता की चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटून राहतो अशी दंतकथा पसरली होती. नेदरलँड्समध्ये त्यांच्या स्टिकची तपासणी केली गेली आणि जपानमध्ये तर त्यांच्या स्टिकवर गोंद लावले आहे का अशी शंका व्यक्त झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Jong Un China visit : अमेरिकेने तयार राहावे! किम जोंग उन चीन दौऱ्यावर; पुतिनही राहणार उपस्थित

देशभक्तीची खरी जाणीव

१९३६ मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर जेव्हा भारतीय संघाने ब्रिटिश ध्वजाखाली खेळताना विजय साजरा केला, तेव्हा ध्यानचंदांच्या डोळ्यांत अश्रू होते. ते म्हणाले “जर युनियन जॅकऐवजी भारतीय तिरंगा फडकला असता, तर मला खरी आनंदाश्रू आले असते.” हे वाक्य त्यांच्या मनातील देशप्रेमाची खरी साक्ष देऊन जाते.

साधेपणातला थोरपणा

मेजर ध्यानचंद यांनी लष्करात भरती झाल्यानंतर हॉकीकडे वळले. सैनिकी शिस्त, समर्पण आणि राष्ट्रप्रेम या गुणांनी त्यांचा खेळ अधिक तेजस्वी झाला. खेळातील नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांना त्यांनी आयुष्यभर जपले. जेव्हा एका सामन्यात गोल करण्यात ते वारंवार अपयशी ठरत होते, तेव्हा त्यांनी पंचांकडे गोलपोस्ट मोजण्याची मागणी केली. आणि खरंच, गोलपोस्ट नियमांपेक्षा लहान असल्याचे आढळले! ही घटना आजही क्रीडाविश्वात आदर्श ठरते.

क्रीडा दिनाचे महत्त्व

राष्ट्रीय क्रीडा दिन हा फक्त एका महान खेळाडूची आठवण ठेवण्यापुरता नाही, तर देशभरातील तरुणांना क्रीडेचे महत्त्व पटवून देण्याचा दिवस आहे. या दिवशी केंद्र आणि राज्य सरकारे शालेय, महाविद्यालयीन पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करतात. क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्ती या राष्ट्रनिर्मितीसाठी किती आवश्यक आहेत, याची जाणीव या दिवशी करून दिली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Earning From Instagram: कोणत्या देशातील लोक करतात इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई? जाणून घ्या भारताची स्थिती

आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

आज सचिन तेंडुलकर, पी.व्ही. सिंधू, मीराबाई चानू, नीरज चोप्रा यांसारखे खेळाडू भारताला जागतिक स्तरावर नेऊन ठेवत आहेत. पण यासाठी पायाभरणी करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांचा खेळ, त्यांचे शिस्तप्रिय जीवन आणि राष्ट्रासाठीची निष्ठा ही आजच्या तरुण खेळाडूंना नेहमीच प्रेरणा देत राहील. राष्ट्रीय क्रीडा दिन हा दिवस फक्त क्रीडेचा उत्सव नसून देशभक्ती, समर्पण आणि खेळाडूवृत्ती यांचा सन्मान आहे. मेजर ध्यानचंद यांचे जीवन हे दाखवते की खरी महानता केवळ विजयात नसून, राष्ट्रासाठी असलेल्या निष्ठेत आहे.

Web Title: National sports day the khelo india movement started on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Major Dhyan Chand Khel Ratna Award
  • navarashtra special story
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

International Day Against Nuclear Tests : जगभरात होणाऱ्या अणुचाचण्या मानवजातीसाठी अत्यंत हानिकारक; वाचा कसे ते?
1

International Day Against Nuclear Tests : जगभरात होणाऱ्या अणुचाचण्या मानवजातीसाठी अत्यंत हानिकारक; वाचा कसे ते?

BWF World Championships चे भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचे सामने कधी आणि कुठे पाहता येणार? येथे पाहता येईल Live Streaming
2

BWF World Championships चे भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचे सामने कधी आणि कुठे पाहता येणार? येथे पाहता येईल Live Streaming

हिटलरची ऑफर नाकारणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती; जाणून घ्या 29 ऑगस्टचा इतिहास
3

हिटलरची ऑफर नाकारणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती; जाणून घ्या 29 ऑगस्टचा इतिहास

Cheteshwar Pujara Retirement : अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला? चेतेश्वर पुजाराने अखेर मौन सोडलेच, वाचा सविस्तर
4

Cheteshwar Pujara Retirement : अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला? चेतेश्वर पुजाराने अखेर मौन सोडलेच, वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
National Sports Day: याच दिवशी सुरुवात झाली होती ‘खेलो इंडिया चळवळीला’ वाचा यामागचा रंजक इतिहास

National Sports Day: याच दिवशी सुरुवात झाली होती ‘खेलो इंडिया चळवळीला’ वाचा यामागचा रंजक इतिहास

75 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी की नाही? मोदीच्या निवृत्तीच्या चर्चेवर मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं

75 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी की नाही? मोदीच्या निवृत्तीच्या चर्चेवर मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं

Crime News Live Updates : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक

LIVE
Crime News Live Updates : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक

Nagpur Crime: नागपूर हादरलं! सोशल मीडियावर मैत्री, घरात एकटी असतांना अल्पवयीन मुलीने १८ वर्षीय मुलाला घरी बोलावले आणि…

Nagpur Crime: नागपूर हादरलं! सोशल मीडियावर मैत्री, घरात एकटी असतांना अल्पवयीन मुलीने १८ वर्षीय मुलाला घरी बोलावले आणि…

‘मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका’; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

‘मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका’; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

Ganesh Chaturthi 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Ganesh Chaturthi 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

‘Lokah: Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, पहिल्या दिवसाची २.५ कोटींचा गल्ला पार

‘Lokah: Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, पहिल्या दिवसाची २.५ कोटींचा गल्ला पार

व्हिडिओ

पुढे बघा
Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Amaravati : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नवनीत राणा यांचा जरांगेंना सल्ला

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.